HomeArchiveओकिनावाकडून डिलर मार्जिन्समध्ये...

ओकिनावाकडून डिलर मार्जिन्समध्ये ११ टक्क्यांपर्यंत वाढ

Details

 
hegdekiran17@gmail.com
 
ओकिनावा या मेक इन इंडियावर भर असलेल्या भारतीय इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक कंपनीने डिलर मार्जिन्समध्ये प्रतिविक्री ११ टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. कोविड-१९ प्रादुर्भावादरम्यान अनेक कंपन्या व लोकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. ओकिनावाने डिलर मार्जिनमध्ये प्रतिविक्री ८ टक्क्यांवरून ११ टक्क्यांपर्यंत वाढ केल्याची घोषणा केली आहे.
 
“प्रत्येककजण एकत्र येऊन या कठीण काळाचा सामना करत असताना ब्रँडचा त्यांच्या डिलर नेटवर्कने अधिक लाभ प्राप्त करावा, असा उद्द्येश आहे. ही वाढ २७ एप्रिलपासून पुढील सूचना मिळेपर्यंत लागू आहे. ओकिनावाचे सध्या देशभरात ३५०हून अधिक डिलरशिप्सचे विक्री नेटवर्क आहे.”
 
“डिलर मार्जिन्समधील वाढ डिलरच्या उत्पन्नामध्ये प्रतिवाहन २००० रूपयांची भर करण्याची अपेक्षा आहे. एकूण यामुळे डिलर्ससाठी मोठ्या प्रमाणात लाभ होईल. उदाहरणार्थ, डिलरने एका महिन्याला १०० वाहनांची विक्री केली, तर त्याला २,००,००० रूपयांहून अधिक अतिरिक्त लाभ होईल.”
 

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content