HomeArchiveट्रक चालक व...

ट्रक चालक व मालकांसाठी व्हील्सआयचे मदत केंद्र

Details

 
hegdekiran17@gmail.com
 
“लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर ट्रक मालकांच्या सक्षमीकरणावर लक्ष केंद्रित असलेल्या व्हील्सआय या हायपर ग्रोथ स्टार्सअपने ‘ट्रक मालिक सहाय्यता केंद्र’ या ऑनलाइन पोर्टलची सुरूवात केली आहे. या पोर्टलद्वारे ट्रकचालकांना महत्त्वाच्या बातम्या तसेच ट्रान्सपोर्टेशन इंडस्ट्रीसंबंधी धोरणात्मक घोषणांची माहिती देण्याचा कंपनीचा हेतू आहे. या क्षेत्रातील लोकांना येणाऱ्या ईएमआयविषयक अडचणी, अन्न व निवाऱ्याच्या समस्या, अफवांवर आळा घालणे, उद्योगपूरक धोरणांबद्दल जागरूकता निर्माण करणे यासारख्या अडचणी सोडवून या उद्योगाला आधार देणे, ही यामागील संकल्पना आहे.”

महामार्गांवर अडकलेल्या ट्रक मालक आणि चालकांना ऑनलाइन पोर्टलवरून भारतभरातील जवळपासच्या शासकीय अधिकृत व खाजगी अन्न व निवारा केंद्रांचाही शोध घेता येईल. ब्रँडने देशभरातील २ हजारांपेक्षा जास्त केंद्रांवर ट्रक चालकांना अन्न व निवासाची व्यवस्था पुरवली आहे. अनिवार्य लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर सरकार अधिकृत जवळचे मेंटेनन्स वर्कशॉप व दुरूस्ती केंद्रही या पोर्टलवरून शोधता येईल.
 

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content