HomeArchive'ट्रेल' आता मराठीतही...

‘ट्रेल’ आता मराठीतही उपलब्ध!

Details

 
hegdekiran17@gmail.com
 
“भारतातील वेगाने विस्तारणारा लाईफस्टाइल व कॉमर्स मंच ‘ट्रेल’ने मराठीसह बंगाली आणि कन्नड या तीन नव्या प्रादेशिक भाषांना समाविष्ट केले आहे. आरोग्य आणि फिटनेस, सौंदर्य आणि त्वचेची काळजी, प्रवास, चित्रपट समीक्षण, पाककृती आणि गृहसजावट यासारख्या विविध श्रेणीतील अनुभव, सूचना आणि समीक्षण शेअर करण्यासाठी यूझर्ससाठी ट्रेल हा सहज उपलब्ध होणारा मंच आहे.”
 
“अॅपवरील व्हिलॉगिंगवर यूझर्सना त्यांच्या स्थानिक भाषेत ५ मिनिटांचा व्हिडिओ तयार करता येतो. तसेच अॅपवरील ‘शॉप’ फीचरद्वारे व्हिलॉग्समध्ये सादर केलेले उत्पादन खरेदी करण्यासाठी मदत केली जाते. यासह, अॅपद्वारे यूझर्सना बक्षिस आणि निर्मितीचा आनंद कमावण्याचीही संधी मिळते.”
 
“‘व्हिडिओ पिनटरेस्ट ऑफ इंडिया’ या नावाने लोकप्रिय असलेल्या ट्रेलने यापूर्वी तामिळ, हिंदी, तेलगू, मल्याळम आणि इंग्रजी भाषांमध्ये सामग्री उपलब्ध केली होती. भारतीय लोकांना अर्थपूर्ण सामग्री पुरवण्यासाठीची वचनबद्धता अधोरेखित करत ट्रेलने सामग्री निर्माते आणि ग्राहकांना त्यांच्या भाषिक पार्श्वभूमीवर अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे. समविचारी व्यक्ती, जे स्वत:चा हक्क वापरून ‘की ओपिनिअन लीडर्स’ म्हणून उदयास येऊ शकतात, अशांना एकत्र आणून त्यांचा समुदाय बनवण्याचा मंचाचा उद्देश आहे. १.९ कोटी डाऊनलोड्ससह अॅपवर दर महिन्याला ९० लाखांहून अधिक अॅक्टिव्ह सदस्य असून वर्षभरात ट्रेलने २० पटींनी अधिक वृद्धी अनुभवली आहे.”
 

Continue reading

उद्यापासून अवकाळी पावसाचा जोर ओसरणार!

आयएमडी च्या पुणे आणि नागपूर विभागाने स्वतंत्रपणे वर्तवलेल्या अंदाजानुसार, उद्यापासून पुढच्या पाच दिवसांत अवकाळी पावसाचा जोर ओसरणार आहे. पुढील 5 दिवसांचा (4 एप्रिल - 8 एप्रिल) अंदाज पुढीलप्रमाणेः 4 एप्रिल: पावसाचा जोर हळूहळू ओसरण्यास सुरुवात होईल, मात्र विदर्भ आणि...

न्यायालये माणसे चालवतात, एआय नाही!

"न्यायालयं ही माणसांद्वारे चालवली जातात, कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे (एआय) नाही," अशा कडक शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने एका याचिकाकर्त्याची तातडीच्या सुनावणीची विनंती फेटाळून लावली. २०२१पासून प्रलंबित असलेल्या एका 'प्रथम अपिलावर' प्राधान्याने सुनावणी घेण्याची मागणी न्यायालयात करण्यात आली होती. मात्र, न्यायाधीशांच्या मानवी मर्यादा...

‘जेईई ॲडव्हान्स्ड’ परीक्षा १७ मे रोजी; २३ एप्रिलपासून नोंदणी!

देशातील प्रतिष्ठित भारतीय तंत्रज्ञान संस्थांमधील (आयआयटी) प्रवेशासाठी घेतली जाणारी 'जेईई ॲडव्हान्स्ड २०२६' ही परीक्षा यंदा रविवार, १७ मे २०२६ रोजी होणार आहे. यावर्षी या परीक्षेच्या आयोजनाची जबाबदारी आयआयटी रुरकीकडे सोपवण्यात आली आहे. यासंदर्भातील अधिकृत वेळापत्रक आणि माहितीपुस्तिका प्रसिद्ध करण्यात...
Skip to content