HomeArchiveआंतरराष्ट्रीय योग दिनी...

आंतरराष्ट्रीय योग दिनी पंतप्रधानांचा संदेश!

Details

 
hegdekiran17@gmail.com
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश हे आंतरराष्ट्रीय योग दिवस २०२०च्या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असेल. पंतप्रधानांचा हा संदेश २१ जून २०२० रोजी सकाळी ६.३० वाजता प्रसारित केला जाईल. यंदा आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या प्रमाणात साजरा केला जात आहे. आयुष मंत्रालयातर्फे इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मंचाद्वारे मोठ्या प्रमाणावर यावर्षीचा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जाईल.
 
“पंतप्रधानांच्या या संदेशाचे प्रसारण डीडी नॅशनल, डीडी न्यूज, डीडी भारती, डीडी इंडिया, डीडी उर्दू, डीडी स्पोर्ट्स, डीडी किसान, सर्व आरएलएसएस वाहिन्या आणि सर्व प्रादेशिक केंद्रांवर केले जाईल. या आधीच्या वर्षांप्रमाणेच या संदेशानंतर मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्थेच्या पथकाकडून (एमडीएनआयवाय) सामान्य योग क्रियांचे (सीवायपी) ४५ मिनिटे थेट प्रक्षेपण केले जाईल. सामान्य योग अभ्यासक्रम हा वेगवेगळ्या वयोगटातील आणि विविध क्षेत्रातील लोकांना लक्षात ठेवून बनविला गेला आहे. जे सामान्य योग अभ्यासक्रमात प्रशिक्षण घेत आहेत त्यांना योगाबद्दल रूची निर्माण होऊन त्यानुसार त्यांचा दृष्टीकोन विकसित होण्याची शक्यता आहे आणि म्हणूनच ते दीर्घकाळपर्यंत तो आचरणात आणू शकतात.”
 
“मागील काही वर्षांमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन सार्वजनिक ठिकाणी हजारो लोकांच्या सामूहिक प्रात्यक्षिकाद्वारे साजरा झाला. मात्र सध्याच्या कोविड-१९च्या उद्रेकामुळे निर्माण झालेल्या जागतिक आरोग्य आपत्कालीन परिस्थितीमुळे, यावर्षी अशा सामूहिक कार्यक्रमांवर भर नसून संपूर्ण कुटूंबाच्या सहभागाने आपापल्या घरी योगाभ्यास करण्याकडे जास्त कल आहे. सध्याच्या महामारीच्या काळात योगाचे विशेष महत्त्व आहे, कारण त्याचा अभ्यास केल्याने शारीरिक आणि मानसिक तंदुरूस्ती वाढते आणि रोगाचा सामना करण्याची व्यक्तीची क्षमता वाढते.”
 
“आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यासाठी देशभरातील नोडल मंत्रालय आयुष हे गेल्या तीन महिन्यांपासून विविध ऑनलाईन आणि मिश्र-ऑनलाईन उपक्रमाद्वारे कोविड-१९ संकटाच्या वेळी घरीच योगाभ्यास करण्याला प्रोत्साहन व सुविधा देत आहे. या प्रयत्नात बर्यातच आघाडीच्या योग संस्था मंत्रालयाबरोबर सामील झाल्या आहेत. सामान्य योग अभ्यासक्रमाच्या (सीवायपी) प्रशिक्षणाकडे अधिक भर देऊन गेल्या एक महिन्यामध्ये अशा क्रिया अधिक तीव्र झाल्या आहेत, ज्यायोगे दरवर्षीप्रमाणेच आंतरराष्ट्रीय योग दिनी योगाच्या मोठ्या प्रमाणात सादरीकरणात सुसंवाद साधला जाईल.”
 

Continue reading

सोन्याच्या दरात होणार मोठी उलथापालथ?

भारतातील सोन्याच्या बाजारात सध्या मोठी अस्वस्थता पाहायला मिळत आहे. बँकांनी सोन्याच्या नव्या आयातीला पूर्णपणे स्थगिती दिली आहे. यामुळे अनेक टन सोने कस्टममध्ये अडकून पडल्याने देशांतर्गत बाजारात सोन्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. एप्रिल महिन्यातील सोन्याची आयात गेल्या ३० वर्षांतील...

‘नीट’ परीक्षेत ‘फिजिक्स’ने केले विद्यार्थ्यांना हैराण!

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) तर्फे घेण्यात आलेली 'नीट-युजी २०२६' ही वैद्यकीय प्रवेश परीक्षा रविवारी देशभरात पार पडली. यंदा साधारण २३ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. प्राथमिक विश्लेषणानुसार, यंदाचा पेपर गेल्या वर्षीच्या तुलनेत काहीसा कठीण आणि वेळखाऊ होता. विषयनिहाय...

‘तांदळाची कूटनीती’ वापरत भारताची चीन-अमेरिकेला टक्कर

जागतिक स्तरावर ऊर्जा, तंत्रज्ञान आणि संरक्षण क्षेत्रासाठी अत्यावश्यक ठरत असलेल्या “क्रिटिकल मिनरल्स”च्या शर्यतीत भारताने आता आफ्रिकेकडे धोरणात्मक पाऊल टाकले आहे. विशेष म्हणजे, या स्पर्धेत भारत केवळ खनिजांसाठी गुंतवणूक करत नाही, तर “तांदळाची कूटनीती” (राईस डिप्लोमसी) वापरत आफ्रिकन देशांशी संबंध...
Skip to content