HomeArchiveशैक्षणिक प्रगतीत वडिलांच्या...

शैक्षणिक प्रगतीत वडिलांच्या भूमिकेला महत्त्व!

Details

 
hegdekiran17@gmail.com
 
“फादर्स डेच्या पार्श्वभूमीवर ब्रेनलीने भारतातील युझर्ससमध्ये मुलांच्या शिक्षणातील वडिलांची भूमिका जाणून घेण्यासाठी सर्वेक्षण केले. विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसाठीच्या जगातील सर्वात मोठया ऑनलाइन लर्निंग मंचाने २,१३७ सहभागींच्या सर्वेक्षणातून अनेक रंजक गोष्टींवर प्रकाश टाकला. तीन चतुर्थांशांपेक्षा जास्त युझर्सनी (७६.३%) मुलांच्या शैक्षणिक यशात वडिलांची भूमिका महत्त्वाची असल्याचे मत नोंदवले.”
 
“देशभरात लॉकडाउन असल्यामुळे वडिलांच्या भूमिकेत वाढ झाली का याचाही अंदाज घेण्याचा प्रयत्न केला असता याचे सकारात्मक निकाल सर्वेक्षणात दिसून आले. प्रतिसाद दिलेल्यांपैकी एक पंचमांश (२१.४ %) विद्यार्थ्यांनी त्यांच्या वडिलांचा सहभाग नुकताच वाढल्याचे सांगितले. तर ४८.६% विद्यार्थ्यांनी सांगितले की, लॉकडाऊनच्या आधी आणि नंतरच्या स्थितीत त्यांच्या वडिलांची शिक्षणातील भूमिका सारखीच राहिली आहे. मुलांनी अभ्यासात प्रगती करावी, यादृष्टीने पालक सक्रियतेने प्रयत्न करत आहेत, हे महत्त्वाचे आहे. याचे श्रेय एआय-एमएल समर्थित ऑनलाइन मंचांना जाते. यामुळे एकूणच सर्व सहभागींच्या अनुभवात क्रांती आली आहे.”
 
“ब्रेनलीचे मुख्य उत्पादन अधिकारी, राजेश बिसानी म्हणाले की, ब्रेनलीसारख्या ऑनलाइन लर्निंग प्लॅटफॉर्ममुळे केवळ विद्यार्थ्यांमध्येच नव्हे तर त्यांच्या पालकांमध्येही ऑनलाइन शिक्षणाची लोकप्रियता वाढत आहे. शाळा ऑफलाइन मोडवर गेल्यानंतरही हा ट्रेंड कायम राहिल, असा आम्हाला विश्वास आहे. कारण ऑनलाइन लर्निंग टूल्सचा कसा फायदा होतो आणि त्यापासून आनंद घ्यायला पालक शिकले आहेत.”
 

Continue reading

पंतप्रधान मोदी सेशेल्सच्या सर्वोच्च बहुमानाने सन्मानित

व्हिक्टोरिया (सेशेल्स) येथे एका विशेष सोहळ्यात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज सेशेल्सचे अध्यक्ष डॉ. पॅट्रिक हर्मिनी यांच्या हस्ते ‘गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन’ हा पहिला सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला. पंतप्रधानांच्या पर्यावरणपूरक नेतृत्त्वासाठी, विकसनशील देशांच्या हितासाठी केलेले प्रयत्न, सागरी...

उद्या घराबाहेर पडा छत्री आणि रेनकोटसह…

उद्या म्हणजेच गुरूवारीही मुंबईत दिवसभर पाऊस राहणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार उद्या मुंबईत हलका ते मध्यम पाऊस पडेल. ढगाळ वातावरण राहील. कमाल तापमान 29° ते 30°C तर किमान तापमान 27° ते 28°C असेल. वास्तविक तापमान दमटपणामुळे 38° ते 40°C...

एकांकिकांच्या सादरीकरणाने साजरी झाली विनय आपटेंची जयंती

"आजही नाटक संपल्यानंतर प्रेक्षकांकडून ज्या टाळ्या मिळतात, त्यातील पहिल्या शंभर टाळ्या, या विनय सरांच्याच असतात," अशा अत्यंत विनम्र भावना सुप्रसिद्ध अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांनी ठाण्यात व्यक्त केल्या. सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक विनय आपटे यांच्या जयंतीनिमित्त 'विनय आपटे...
Skip to content