HomeArchiveआयफॉल्कनकडून क्यूएलइडी आणि...

आयफॉल्कनकडून क्यूएलइडी आणि यूएचडी टीव्ही!

Details
  

 
केएचएल न्यूज ब्युरो
 
hegdekiran17@gmail.com
 
“टीसीएलचा सब ब्रँड ऑयफॉल्कनने आपले नवीन क्यूएलईडी आणि यूएचडी टीव्ही आणले आहेत. एच ७१ आणि के ७१ हे मॉडेल फक्त फ्लिपकार्टवर अनुक्रमे ४९,९९९ रूपये आणि २५,४९९ रूपयांमध्ये उपलब्ध आहे. तसेच पहिल्या २५० ग्राहकांना फ्लिपकार्टच्या काही विशेष बँकिंग ऑफरसह १ वर्षाचे सोनी लाइव्ह सबस्क्रिप्शन मोफत मिळेल. दोन्ही मॉडेलमध्ये हँड्सफ्री व्हॉइस कंट्रोलचा समावेश आहे. फार फील्ड व्हॉइस कंट्रोलसह, यूझर्स टीव्ही कंट्रोल करू शकतात, रिमाइंडर्स सेट करू शकतात आणि बऱ्याच गोष्टी पूर्णपणे हँड्सफ्री करू शकतात.”
 
“आणखी एक सामान्य वैशिष्ट्य म्हणजे मायक्रो डिमिंग. वर्धित आणि अनुकूलित एलईडी पाहण्याच्या अनुभवासाठी स्क्रीनचा विशिष्ट भाग अंधुक करण्यासाठी डिझाईन केला असून उर्वरीत भाग अधिक ब्राइट दिसतो. दोन्हीडी डिव्हाइस अँड्रॉइड पी, अँड्रॉइड ऑरेटिंग सिस्टिम (ओएस)ची दुसरी आवृत्तीसह येतात. यासह यूझर्सना गूगल प्ले स्टोअरवरून ५०००पेक्षा जास्त मनोरंजनाच्या मोठ्या खजिन्यात प्रवेश मिळतो, हादेखील मोठा फायदा आहे.”
 
“टीसीएल इंडियाचे महाव्यवस्थापक माइक चेन म्हणाले की, “आयफॉल्कनमध्ये आम्ही प्रेक्षकांचा पाहण्याचा अनुभव आणि त्यांची मनोरंजनाची पातळी आणखी समृद्ध करण्यासाठी टीव्ही बनवण्याचा प्रयत्न करत असतो. हे टीव्ही मॉडेल्स बनवताना, आम्ही गुणवत्तेच्या बाबतीत तडजोड न करता यूझर्सना ते कसे परवडतील, यावरही भर देतो. त्यामुळेच आमचे सर्व टीव्ही ग्राहकांच्या बजेटवर परिणाम न करणाऱ्या किंमतीत येतात. किंबहुना त्यापेक्षा कमी किंमतीत ऑफर देतात. याच तत्त्वानुसार आमचे दोन नवे टीव्ही बनवण्यात आले आहेत.”

Continue reading

पंतप्रधान मोदी सेशेल्सच्या सर्वोच्च बहुमानाने सन्मानित

व्हिक्टोरिया (सेशेल्स) येथे एका विशेष सोहळ्यात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज सेशेल्सचे अध्यक्ष डॉ. पॅट्रिक हर्मिनी यांच्या हस्ते ‘गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन’ हा पहिला सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला. पंतप्रधानांच्या पर्यावरणपूरक नेतृत्त्वासाठी, विकसनशील देशांच्या हितासाठी केलेले प्रयत्न, सागरी...

उद्या घराबाहेर पडा छत्री आणि रेनकोटसह…

उद्या म्हणजेच गुरूवारीही मुंबईत दिवसभर पाऊस राहणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार उद्या मुंबईत हलका ते मध्यम पाऊस पडेल. ढगाळ वातावरण राहील. कमाल तापमान 29° ते 30°C तर किमान तापमान 27° ते 28°C असेल. वास्तविक तापमान दमटपणामुळे 38° ते 40°C...

एकांकिकांच्या सादरीकरणाने साजरी झाली विनय आपटेंची जयंती

"आजही नाटक संपल्यानंतर प्रेक्षकांकडून ज्या टाळ्या मिळतात, त्यातील पहिल्या शंभर टाळ्या, या विनय सरांच्याच असतात," अशा अत्यंत विनम्र भावना सुप्रसिद्ध अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांनी ठाण्यात व्यक्त केल्या. सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक विनय आपटे यांच्या जयंतीनिमित्त 'विनय आपटे...
Skip to content