HomeArchiveडीमॅट खाते उघडण्याचा...

डीमॅट खाते उघडण्याचा विचार करताय?

Details
  

 
केएचएल न्यूज ब्युरो
 
hegdekiran17@gmail.com
 
“मागील काही वर्षांपासून गुंतवणुकीच्या प्रक्रियेत अमूलाग्र बदल झाला आहे. नव्या तंत्रज्ञानामुळे गोष्टी प्रचंड गतिमान झाल्या आहेत. आज ई-कॉमर्सचा पर्याय हळूहळू सर्वाधिक पसंतीचा होत आहे आणि शेअर बाजारातही हाच प्रकार दिसतोय. इक्विटी किंवा कर्जांसारखे वित्त व्यवस्थापन करणे दैनंदिन कामे करताना आपल्यासाठी त्रासदायक ठरू शकते. सुदैवाने, १९९६च्या डिपॉझिटरी कायद्यामुळे प्रत्येकाला काही क्लिक्सवर आर्थिक सुरक्षिततेचे व्यवस्थापन करणे सोपे झाले आहे. शेअर्स किंवा इतर सिक्युरिटीजच्या प्रत्यक्ष प्रती मिळण्याऐवजी डीमॅट खाते आपल्याला ऑनलाइन ट्रेडिंग प्लॅटफॉर्मचा लाभ घेण्यास मदत करते. तेथे आपली आर्थिक सुरक्षितता प्रमाणित इलेक्ट्रॉनिक सिटिमवर ठेवता येते.”
 
डीमॅट खाते म्हणजे काय?
 
“डीमॅट खाते हे बँक खात्यासारखेच असते. रोख रकमेऐवजी इलेक्ट्रॉनिक स्वरूपात शेअर्सचा व्यवहार करतात. डिमॅट खाते हे ऑपरेटिव्ह फंक्शनसाठी डिमटेरियलाझेशनची संकल्पना वापरते. डिमटेरियलायझेशनच्या पर्क्रियेत भौतिक शेअर सर्टिफिकेट्स इलेक्ट्रॉनिक स्वरूपात रूपांतरीत केली जातात. त्यानुसार, डीमॅट खाते हे तंत्रज्ञान वापरून गुंतवणुकदारांचे सर्व शेअर्स एकाच छताखाली जतन करते. यात सरकार, सिक्युरिटीज, म्युच्युअल फंड, शेअर्स, बाँड्स इत्यादींचा समावेश आहे.”
 
डीमॅट खाते ऑनलाइन उघडण्यासाठीचे टप्पे:
 
१. आपल्या पसंतीच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंट (ब्रोकर)च्या अधिकृत वेबसाइटवर जा.
 
“२. आपले नाव, फोन क्रमांक आणि राहण्याचे शहर ही माहिती विचारणारा सोपा लीड फॉर्म भरा. त्यानंतर रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर आपल्याला एक ओटीपी मिळेल.”
 
“३. पुढील फॉर्म मिळवण्यासाठी ओटीपी टाका. आपले केवायसी डिटेल्स म्हणजेच जन्मतारीख, पॅनकार्ड डिटेल्स, संपर्काचा तपशील, बँक खात्याचा तपशील इत्यादी भरा.”
 
४. आता तुमचे डीमॅट खाते उघडले. आपल्याला ईमेल किंवा मोबाइलवर डीमॅट खात्याच्या क्रमांकाचा तपशील मिळेल.
 
“एका गुंतवणुकदाराकडे अनेक डीमॅट खाती असू शकतात. जी एकाच डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स (डीपी)ची असू शकतात किंवा विविध डीपींची अूस शकतात. जोपर्यंत गुंतवणूकदार सर्व अॅप्लिकेशन्ससाठी आवश्यक केवायसी डिटेल्स प्रदान करू शकेल, तोपर्यंत एकापेक्षा जास्त डीमॅट खाती अर्जदाराकडून ऑपरेट केली जाऊ शकतात.”
 
(स्रोत: एंजल ब्रोकिंग)

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content