HomeArchive‘एमजी मोटर’द्वारे १०...

‘एमजी मोटर’द्वारे १० नव्या शहरांत झेडएस ईव्ही!

Details
  

 
केएचएल न्यूज ब्युरो
 
hegdekiran17@gmail.com
 
“एमजी मोटर इंडियाने नागपूर, लखनौ, आग्रा, देहरादून, लुधियाना, कोलकाता, औरंगाबाद, इंदूर, कोइंबतूर आणि विजाग या नव्या १० शहरांमध्ये इलेक्ट्रिक इंटरनेट एसयूव्ही – एमजी झेडएसचा विस्तार करण्यास सुरूवात केली आहे. यापूर्वी भारतभरातील ११ ऑपरेशनल बेसमध्ये ती उपलब्ध आहे. कारनिर्मात्याने फेब्रुवारी २०२०मध्ये देशात झेडएस ईव्हीची डिलिव्हरी सुरू झाल्यापासून १०००वे युनिट रोल आउट केल्यानंतर हा विस्तार कार्यक्रम हाती घेतला आहे.”
  

 
“कालपासून कंपनी प्री-बुकिंग सुरू केले असून, ५०,००० रुपये अशी बुकिंग किंमत आहे. एमजी मोटर इंडियाची वेबसाइट (mgmotor.co.in)वर तसेच विविध शहरांमधील डीलरशिपवर ती उपलब्ध असेल. नव्या विस्तारामुळे एमजी झेडएस ईव्ही भारतातील २१ शहरांमध्ये उपलब्ध असेल. याचवेळी एमजी या शहरांमध्ये समांतररित्या ईव्ही इकोसिस्टिम विकसित करत असून त्याअंतर्गत सुपरफास्ट चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर आणि ऑन-रोड चार्जिंग सुविधा विस्तारल्या जात आहेत.”
  

 
“एमजी मोटर इंडियाचे मुख्य वाणिज्य अधिकारी गौरव गुप्ता म्हणाले की, हरित ऊर्जा आणि पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात सध्या भारत कौतुकास्पद पावले उचलत आहे. केंद्र आणि राज्य सरकारने अलीकडे घेतलेल्या निर्णयांचे आम्ही स्वागत करतो. भारतातील ईव्हीच्या वाढत्या मागणीसाठी ते अनुकूल आहेत व त्यात त्यांचे योगदानही आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, आमच्या झेडएस ईव्ही विस्ताराचा पुढील कार्यक्रम हाती घेताना आम्हाला आनंद होत आहे. देशात ईव्हीचा चांगल्याप्रकारे स्वीकार होण्याच्या दिशेने आम्ही प्रयत्नरत आहोत.”
  

 
एमजी मोटर इंडियाची टाटा पॉवर आणि फिनलँडमधील क्लिन एनर्जी मेजर फोर्टमसोबत देशभरात फास्ट-चार्जिंग स्टेशनचा विकास आणि देखभालीसाठी सक्रिय भागीदारी केली आहे. हा दिग्गज वाहननिर्माता भारतात प्रगत ईव्ही क्षमता असलेली इकोसिस्टिमदेखील तयार करत आहे. एमजी डेव्हलपर अँड ग्रांट प्रोग्रामचा भाग म्हणून संबंधित नूतनाविष्कारांचा प्रचार करणे हेदेखील कंपनीच्या सर्वांगीण दृष्टिकोनात समाविष्ट आहे. सर्व एमजी डीलरशिप CCS/CHAdeMO फास्ट-चार्जिंग मानकांबाबत सुसज्ज आहेत. तसेच तेथे सर्व सुसंगत ईव्ही उपलब्ध आहेत.
 
“पाच मार्गी ईव्ही चार्जिंग इकोसिस्टिमचा भाग म्हणून, प्रत्येक झेडएस ईव्हीमध्ये कुठेही चार्जिंग होण्यासाठी एक ऑन बोर्ड केबल येते. एमजीचा eChargeBaysशी करार असल्याने ग्राहकांना त्यांचे घर, ऑफिसमध्येही एसी फास्ट चार्जर मोफत इन्स्टॉल करता येते.”

Continue reading

आसाम-बंगालची निवडणूक फळली? पेट्रोल-डिझेलची दरवाढ नाही!

पश्चिम आशियामध्ये निर्माण झालेल्या वाढत्या भू-राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात (एक्साईज ड्युटी) कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत होणारी संभाव्य वाढ आणि त्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेत निर्माण होणारी महागाईची स्थिती रोखण्यासाठी...

नेपाळमध्ये नव्या युगाची सुरुवात; ३५ वर्षीय बालेन शाह पंतप्रधान!

नेपाळमध्ये नव्या युगाची सुरुवात झाली असून ३५ वर्षीय बालेन्द्र शाह (बालेन) यांनी शुक्रवारी नेपाळचे सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आहे. काठमांडूचे माजी महापौर आणि प्रसिद्ध रॅपर ते राजकारणी असा थक्क करणारा प्रवास करणाऱ्या बालेन शाह यांनी सार्वत्रिक निवडणुकीत...

मुंबई विभागीय क्रीडा निपुणता केंद्रासाठी झाल्या निवडचाचण्या जाहीर

महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयामार्फत चालवण्यात येत असलेल्या 'मिशन लक्ष्यवेध'अंतर्गत मुंबई विभागीय क्रीडा निपुणता केंद्रासाठी खेळाडूंची निवडप्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश राज्यातील गुणवंत खेळाडूंना उच्च दर्जाचे प्रशिक्षण, आवश्यक सुविधा व मार्गदर्शन उपलब्ध करून देत...
Skip to content