HomeArchiveखाताबुकचे 'माय स्टोअर'...

खाताबुकचे ‘माय स्टोअर’ अ‍ॅप लॉन्च!

Details
  

 
केएचएल न्यूज ब्युरो
 
hegdekiran17@gmail.com
 
“भारतातील वेगाने वाढणारी फिनटेक स्टार्ट-अप खाताबुकने अजून एक महत्त्वाचा टप्पा पार करत अँड्रॉइडवर ‘माय स्टोअर’ अ‍ॅप लॉन्च केले आहे. हे अ‍ॅप सोप्या साइन-अपसोबत एकीकृत, सहज आणि सुरक्षित इंटरफेससह व्यापाऱ्यांना त्यांचा व्यवसाय १५ सेकंदात ऑनलाईन आणायला सक्षम करते.”
 
खाताबुकचे ‘माय स्टोअर’ अ‍ॅप १३ भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे. हे वापरण्यास सोपे असून पॅन-इंडियाने वापरण्याची खात्री दिली आहे. अ‍ॅप व्यापाऱ्यांना सोशल डिस्टन्सिंगचे निकष राखून व्यवसाय सुरू ठेवायला सक्षम करते. माय स्टोअर अ‍ॅप आधीच देशातील २५ लाखांपेक्षा अधिक व्यापाऱ्यांनी डाऊनलोड केले आहे. अ‍ॅपचा अंदाज आहे की खाताबुकचे एक तृतीयांश वापरकर्ता प्रोफाईल एकाचवेळी माय स्टोअर अ‍ॅप वापरत आहेत.
  

 
“खाताबुकचे सहसंस्थापक आणि सीईओ रवीश नरेश यांनी सांगितले की, आम्ही भारताच्या एमएसएमई विभागाची कार्यक्षमता सुधारित करण्यासाठी आणि व्यवसायात होणारा खर्च कमी करण्यासाठी सतत नवीन मार्ग शोधत आहोत. माय स्टोअरचे लॉन्च आपल्या विद्यमान गोष्टींवर आधारित असून डिजिटल युगात व्यवसाय करण्याच्या अधिक विकसित मार्गासाठी एक मजबूत टेक-ड्रीव्हन पाया प्रदान करत आहोत. विशेषत: या महामारीच्या वास्तवात नवीन जगात व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी सर्व साधने उपलब्ध आहेत. डिजिटलमध्ये रूपांतरित होऊ इच्छिणाऱ्या ऑफलाईन व्यावसायिकांसाठी माय स्टोअर अ‍ॅप वापरणे हा एक आदर्श उपाय आहे.”

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content