HomeArchiveस्वत:च्या वेबसाइटसाठी एमस्वाईपचे...

स्वत:च्या वेबसाइटसाठी एमस्वाईपचे सहाय्य

Details
 
 
 
केएचएल न्यूज ब्युरो
 
hegdekiran17@gmail.com
 
“ऑनलाईन व्यवहार करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असताना, भारतातील लघु व मध्यम उद्योगांना (एसएमई) वित्तसेवा पुरविणाऱ्या एमस्वाईप, या प्लॅटफॉर्मने विनामूल्य वापरण्याजोगी बिझनेस वेबसाईट निर्माण करण्याची सुविधा सादर केली आहे. लघु उद्योजक व प्रोप्रायटर यांना यातून स्वतःची वेबसाईट काही मिनिटांत निर्माण करता येणार आहे. ”
 
“ग्राहकांना अखंडीत डिजिटल अनुभव देणे ही बाब एसएमईना शक्य होण्यासाठी एमस्वाईपने पेबायलिंक ही सुविधादेखील सादर केली आहे. ही लिंक एसएमएस, व्हॉट्सअप किंवा ग्राहकांना सोयीस्कर अशा कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केली जाऊ शकते आणि त्यातून डिजिटल बिलाचे पैसे मिळून व्यवहार पूर्ण होऊ शकतो.”
 
“एमस्वाईपचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मनीष पटेल म्हणाले की, “लॉकडाऊनमुळे एसएमईंच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. परंतु यामुळे, डिजिटल अर्थव्यवस्थेचा भाग होण्याची संधीही त्यांच्यासाठी निर्माण झाली आहे. ग्राहक आता ऑनलाईन व्यवहार करण्यास प्राधान्य देऊ लागले आहेत. डिजिटल स्वरूपात व्यवहार करणे एसएमईंना सोपे जावे, यासाठी एमस्वाईपने एंड-टू-एंड सोल्युशन देण्यावर भर दिला आहे. मायक्रोसाईट आणि पेबायलिंक यांच्या माध्यमातून ग्राहकांना उत्पादने वा सेवा शोधण्यास मदत करणे, उत्पादनांची निवड करणे व डिजिटल पेमेंटद्वारे व्यवहार पूर्ण करणे हे व्यापाऱ्यांना शक्य होते. या दोन सुविधांबरोबरच डिजिटल बिल आणि पेमेंटची पद्धत निवडण्याची सोय यामुळे इतर कोणत्याही इ-कॉमर्स कंपनीप्रमाणेच एसएमईंनादेखील ग्राहकांच्या गरजा पूर्ण करता येतील.’’”
 
“एसएमई व्यापाऱ्यांना व रिटेल दुकानदारांना एमस्वाईपमधील आपल्या विद्यमान खात्यातूनच स्वतःची वेबसाईट निर्माण करता येईल. यासाठी या दुकानदारांना अॅपमध्ये आपल्या दुकानाची माहिती भरावी लागेल. आपले छायाचित्र आणि सोशल मीडियाची लिंक अॅपमध्ये भरल्यावर लगेचच त्यांना लाइव्ह ऑनलाईन होता येईल. एसएमईंच्या ऑनलाईन स्टोअरची दृष्यमानता वाढण्यास मदत करण्याकरीता, त्यांच्या मायक्रोसाईट्सच्या सर्च इंजिन ऑप्टिमायझेशनसाठीही (एसइओ) एमस्वाईप मदत करणार आहे.”
 
“एमस्वाईपद्वारे केल्या जाणाऱ्या व्यवहारांपैकी एक चतुर्थांश व्यवहार आता एनएफसी, क्यूआर आणि नव्याने सादर झालेली पेबायलिंक यांसारख्या संपर्कविहीन पद्धतींनी केले जातात. एमस्वाईपने एसएमईंना वेगळी ऑफर म्हणून 499 रु. अधिक जीएसटी या दरात पेबायलिंक ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यामुळे व्यवहाराची प्रक्रिया सुरू करण्यासाठी हे एक परवडणारे सोल्युशन एसएमईंना मिळाले आहे. एमस्वाईप मर्चंट अॅपवरून काही सोप्या क्रियांनी व्यापारी पेबायलिंक कार्यान्वित करू शकतात.”
 
“भारतातील एसएमईंसाठी यूपीआय क्यूआर, एनएफसी आधारीत टॅप अॅंड पे, पीओएस आणि पेमेंट लिंक अशी डिजिटल पेमेंट सोल्युशन्सची संपूर्ण श्रेणी देणारी एमस्वाईप ही एकमेव कंपनी आहे. 6.75 लाख पीओएस व 11 लाख क्यूआर मर्चंट्स अशी मोठी पीओएस अक्वायरर असणारी एमस्वाईप, ही मनीबॅक प्रीपेड कार्ड सादर करणारी, सर्वात वेगाने वाढणारी इश्शूअरर ही आहे.”
 
“एमपीओएस, यूपीआय क्यूआर आणि मनीबॅक कार्ड या गोष्टी एकत्र असणारी ‘बँक बॉक्स गो’ ही सुविधा सादर करीत असल्याची घोषणा एमस्वाईपने ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीस केली होती. शून्य भाडे आणि शून्य एमडीआरच्या युगात आपण दाखल झाल्याचे कंपनीने यातून दाखवून दिले. युकेमधील सुरक्षित वैयक्तिक प्रमाणीकरण सोल्युशन देणारी मायपिनपॅड आणि व्हिसा यांच्याबरोबर एमस्वाईपने नुकतीच भागीदारी केली आहे. त्यातून भारतात संपर्कविरहित पेमेंटचे प्रमाण वाढू शकेल.”
 
“एमस्वाईप विषयी: अखंडीत स्वरूपाचे मोबाइल पीओएस आणि मूल्यवर्धित सेवा प्रदान करून एसएमई आणि व्यापाऱ्यांसाठी देशातील सर्वात मोठा आर्थिकसेवा मंच बनण्याचे एमस्वाईपचे लक्ष्य आहे. देशभरातील 6.75 लाख पीओएस आणि 11 लाख क्यूआर मर्चंट यांचे नेटवर्क असणारी ही कंपनी देशातील सर्वात मोठी स्वतंत्र मोबाईल पीओएस मर्चंट अक्वायरर आहे. कार्ड्स, वॉलेट्स, मोबाइल पेमेंट अ‍ॅप्स आणि बँक अ‍ॅप्स तसेच कॉन्टॅक्टलेस व क्यूआर या पेमेंट करण्याच्या विविध प्रकारांसाठी एमस्वाईप कंपनी सोल्युशन्स देते. मुंबईत मुख्यालय असलेल्या एमस्वाईपने 2011 मध्ये कामकाज सुरू केले. या कंपनीच्या मुख्य गुंतवणूकदारांमध्ये बी कॅपिटल, यूसी-आरएनटी, फाल्कन एज कॅपिटल, मॅट्रिक्स कॅपिटल पार्टनर्स, डीएसजी पार्टनर्स आणि एपिक कॅपिटल यांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी https://www.mswipe.com ही वेबसाईट पाहा.”

Continue reading

रविवारी आनंद घ्या भारती प्रताप यांच्या गायनाचा 

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रात, येत्या रविवारी, ५ एप्रिलला सायंकाळी पाच वाजता संस्थेचे संस्थापक डॉ. एस. जी. जोशी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भारती प्रताप यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम श्रीकृष्ण जोशी यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला आहे. यावेळी...

आजपासून ‘क्रेडिट स्कोअर’ होणार दर आठवड्याला अपडेट!

बुधवार, १ एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष (२०२६-२७) सुरू होत असून, रिझर्व्ह बँकेने क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपन्या (सीआयसी'ज) जसे की, सिबिल, एक्स्पेरियन, इक्विफॅक्स आणि हाय मार्क यांच्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. या बदलांचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या कर्ज घेण्याच्या प्रक्रियेवर...

आखातातल्या गुगल, एप्पल आदी १८ कंपन्यांवर आजपासून इराणचे हल्ले

इराणविरूद्ध अमेरिका आणि इस्त्रायलच्या युद्धात सहभागी होण्यास युरोपातल्या बहुतांश सर्व देशांनी (नाटो संघटनेत असलेल्या) स्पष्ट नकार दिल्याचे समोर आले आहे. पोलंड, हंगेरी, बेल्जियम, फ्रान्स, जर्मनी, स्पेन, स्लोव्हाकिया, इटली आदी देशांचा यात समावेश आहे. ब्रिटनने या संघर्षात अमेरिकेला अत्यंत मर्यादित...
Skip to content