Homeचिट चॅटवामन हरी..ची आजपासून...

वामन हरी..ची आजपासून नवरात्रौत्सवानिमित्त महिलासांठी स्पर्धा!

नवरात्रौत्सवाच्या निमित्ताने वामन हरी पेठे ज्वेलर्सच्या वतीने महिलांसाठी आजपासून एक विशेष स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. वेगवेगळ्या प्रकारचे दागिने नवरात्रौत्सवातील त्या दिवसाच्या रंगावरील वेशभूषेवर ते परिधान करावयाचे आहेत.

या वेशभूषेची निवडक छायाचित्रे आपल्या नाव तसेच दूरध्वनी क्रमांकासह ८५९१२३८५८० या क्रमांकावर व्हॉट्सएप करायचे आहे किंवा #whpjnavratrichallenge वर हॅशटॅग करायचे आहे. दररोज तीन  भाग्यवान विजेत्यांना गिफ्ट व्हाउचर्स मिळणार आहेत. त्याचबरोबर वामन हरी पेठे ज्वेलर्सच्या इन्स्टा आणि फेसबुकवर झळकण्याची संधीही…

दागिने परिधान करण्याचे प्रकार दिनांकनिहाय

११ ऑक्टोबर- पेंडन्ट

१२ ऑक्टोबर ठुशी

१३ ऑक्टोबर बुगडी

१४ ऑक्टोबर नथ

१५ ऑक्टोबर नेकलेस

अधिकाधिक महिला वर्गांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.  

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content