Homeपब्लिक फिगरराज्यातल्या सीईटी परीक्षा...

राज्यातल्या सीईटी परीक्षा १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबरदरम्यान!

शैक्षणिक वर्ष २०२१-२२करिता राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) येत्या १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर २०२१ या कालावधीत होणार असल्याचे आज राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी एका पत्रकार परिषदेत जाहीर केले.

सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षांसाठी एकूण ८ लाख ५५ हजार ८७९ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. या प्रवेश परीक्षांसाठी २२६ केंद्रे निश्चित करण्यात आलेली आहेत. राज्याबाहेरील केंद्रांच्या संख्येतही यावर्षी वाढ करण्यात आली असून परीक्षा केंद्रांची संख्या वाढवण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. या परीक्षांसाठी जास्तीतजास्त प्रतीदिन ५० हजार संगणक उपलब्ध करण्यात आले आहेत. त्यातील २५ हजार संगणक अभ्यासक्रमनिहाय विद्यार्थ्यांच्या संख्या व विद्यार्थ्यांनी दिलेल्या विकल्पानुसार वापरण्यात येतील. ही प्रवेशपरीक्षा कोविड-१९बाबत जाहीर केलेल्या नियमांचे पालन करुन घेण्यात येणार आहे. परीक्षार्थींना परीक्षेच्या दिवशी मुंबईमध्ये लोकल प्रवासाची मुभा देण्यात येणार आहे. परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी लोकल ट्रेन तिकीटासाठी परीक्षेचे प्रवेशपत्र सोबत ठेवावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

८६ टक्के विद्यार्थ्यांना प्रथम विकल्पानुसार परीक्षा केंद्रे मिळणार आहेत व १४ टक्के विद्यार्थ्यांना उर्वरीत विकल्पानुसार परीक्षा केंद्रे उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. प्रवेशाची नोंदणीप्रक्रिया अभ्यासक्रमनिहाय सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुरू करण्यात येईल व अभ्यासक्रमनिहाय प्रवेश प्रक्रिया १५ ऑक्टोबरनंतर सुरू करण्यात येईल, असेही सामंत यांनी सांगितले.

सीईटी

सीईटी परीक्षेच्या तारखा पुढीलप्रमाणे

मास्टर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन, मास्टर हॉटेल मॅनेजमेंट ॲण्ड केटरिंग टेक्नॉलॉजी, मास्टर ऑफ आर्किटेक्चर, मास्टर ऑफ फिजिकल एज्युकेशन, बॅचलर ऑफ आर्टस, बॅचलर ऑफ सायन्स, बॅचलर ऑफ एज्युकेशन या परीक्षा १५ सप्टेंबरला होणार आहेत.

मास्टर ऑफ फिजिकल एज्युकेशन, मास्टर ऑफ बिजनेस ॲडमिनीस्ट्रेशन अँड मॅनेजमेंट स्टडी या परीक्षा १६, १७ व १८ सप्टेंबरला होतील. बॅचलर ऑफ इंजिनिअरींग/टेक्नॉलाजी (B.E/B.TECH), बॅचलर ऑफ फार्मसी (B.Pharm/Pharm.D), ॲग्रीकल्चर अँड ॲलाईड कोर्स या परीक्षा २० सप्टेंबर ते १ ऑक्टोबरदरम्यान होणार आहेत.

बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट केटरिंग टेक्नॉलॉजी, मास्टर ऑफ एज्युकेशन, बॅचलर ऑफ एज्युकेशन अँड मास्टर ऑफ एज्युकेशन, बॅचलर ऑफ लॉ (५ वर्ष), बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन या परीक्षा ३ ऑक्टोबरला होणार आहेत. बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन ४, ५, ६ आणि ७ ऑक्टोबरला तर बॅचलर ऑफ लॉ (३ वर्ष ) ४ व ५ ऑक्टोबरला, बॅचलर ऑफ एज्युकेशन जनरल अँड स्पेशल परीक्षा ६ व ७ ऑक्टोबर रोजी होणार आहेत. बॅचलर ऑफ फाईन आर्ट ९ व १० ऑक्टोबरला होतील, अशी माहिती सामंत यांनी दिली.

या परीक्षांचा निकाल २० ऑक्टोबरपर्यंत जाहीर करण्यात येणार असून शैक्षणिक वर्ष २०२१-२२ नोव्हेंबरपासून सुरू होईल. हे शैक्षणिक वर्ष सुरू करताना राज्यातील त्यावेळेची कोरोनाची परिस्थिती पाहून ऑनलाईन सुरू करायचे की ऑफलाईन, याबाबत निर्णय घेण्यात येईल. राज्य सीईटी कक्षाच्या www.mahacet.org या अधिकृत संकेतस्थळावर तपशीलवार वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले.

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content