Homeएनसर्कलपेनियरबायचे निओदुकान बाजारपेठेत...

पेनियरबायचे निओदुकान बाजारपेठेत दाखल!

देशातील किरकोळ विक्री क्षेत्राचे व्यापक स्तरावर आधुनिकीकरण करण्याच्या आपल्या प्रयत्नांचा भाग म्हणून आपल्या पेनियरबाय या भारताच्या अग्रगण्य ब्रांचलेस बँकिंग आणि डिजिटल पेमेंट्स नेटवर्कने रिटेलर्स असोसिएशन्स स्किल काउन्सिल ऑफ इंडियाशी (आरएएससीआय)शी सहयोग साधत पेनियरबाय निओदुकान (“PayNearby NeoDukaan”) या सेवेचा शुभारंभ केला आहे.

आपल्या रिटेल पार्टनर्सना अधिक सुधारित डिजिटल तंत्रज्ञान वापरण्यासाठी सक्षम बनविणे व त्यांना उदरनिर्वाहाचा अधिक चांगला मार्ग मिळविण्यासाठी सुसज्ज करणे हा या सेवेचा हेतू आहे. पेनियरबाय निओदुकान हे रिटेल स्टोअर्सचे डिजिटायझेशन करण्याच्या हेतूने व देशाच्या अगदी कानाकोपऱ्यापर्यंत डिजिटल तंत्रज्ञान वेगाने पोहोचविण्याचे लक्ष्य समोर ठेवून तयार करण्यात आलेले अशाप्रकारचे पहिलेवहिले सर्वसमावेशक दुकान व्यवस्थापन संसाधन आहे. डिजिटल पेमेंटचे वेगवेगळे पर्याय, पतव्यवस्थापनासाठी डिजिटल लेजर आणि घाऊक माल ऑनलाईन मागविण्याचे पर्याय अशा सुविधांच्या साथीने आपल्या रिटेल पार्टनर्सना डिजिटलदृष्ट्या सक्षम करत व त्यांना आजच्या काळाच्या पावलांशी पावले जुळवत पुढे जाण्याचे बळ देत त्यांच्यासाठी जोमाने विकसित होणारी परिसंस्था निर्माण करण्याचे पेनियरबाय निओदुकानचे ध्येय आहे.

भारतातील रिटेल अर्थात किरकोळ विक्रीचे क्षेत्र उत्क्रांत होत आहे, पण किरकोळ विक्रेते मात्र या प्रक्रियेत मागे राहून गेले आहेत. किरकोळ विक्री हा भारतातील सर्वात मोठा उद्योग आहे, ज्याने देशाच्या जीडीपीमधील १० टक्क्यांहून अधिक भाग व्यापला आहे. एकूण रोजगारापैकी ८ टक्‍के रोजगार या क्षेत्रातून निर्माण होत आहेत. हे इतके मोठे उद्योगक्षेत्र असूनही यात प्रामुख्याने किरकोळ विक्रेते आणि व्हेंडर्सचा समावेश असल्याने त्याचे स्वरूप प्रामुख्याने असंघटित राहिले आहे. सध्याच्या बदलत्या परिस्थितीमध्ये विजयी होण्यासाठी स्थानिक रिटेलर्सनाही बदलांना सामोरे जाण्याची गरज आहे. ग्राहकांना आपली सेवा अनिवार्य व्हावी यासाठी स्थानिक रिटेलर्सनी ग्राहकांच्या वेगवेगळ्या गरजांना सामावून घेण्याच्या दृष्टीने स्वत:मध्ये सातत्याने सुधारणा करत राहणे अत्यावश्यक आहे. यादृष्टीने पेनियरबाय रिटेल दुकानांचे रूप संपूर्णपणे बदलत आहे व त्यांना भविष्यासाठी सज्ज करत आहे.

कंपनीने आजवर देशातील १७,६००हून अधिक पिनकोड पत्त्यांवरील ३८ लाखांहून अधिक रिटेलर्सना ऑनलाईन मंचावर आपले अस्तित्त्व ठामपणे सिद्ध करण्याची क्षमता बहाल केली आहे आणि बदलत्या डिजिटल जगामध्ये छोटी व स्थानिक दुकाने मागे पडू नयेत याची काळजी घेतली आहे. पेनियरबायच्या या नव्या व्यापारश्रेणीबद्दलची हीच भावना कंपनीच्या निओदुकान अॅपच्या कार्यपद्धतीमध्ये प्रतिबिंबित झाली आहे. हे स्टोअर मॅनेजमेंट पॅकेज म्हणजे दुकानांच्या एकूण एका गरजेचा विचार करणारा सर्वंकष सेवासंच आहे. या अॅपच्या मदतीने किरकोळ विक्रेत्यांना भविष्यातील आव्हानांपासून संरक्षण पुरविणे व भविष्यात त्यांना महाकाय ई-कॉमर्स कंपन्या आणि मोठ्या आकाराच्या सुपरस्टोअर्सबरोबर टक्कर देता यावी अशा पातळीवर त्यांना नेऊन ठेवणे हा पेनियरबायचा हेतू आहे.

आज सर्वच दुकानांसाठी डिजिटल पेमेंट्ससाठी डिजिटल कार्यपद्धती स्वीकारणे अत्यंत महत्त्वाचे झाले आहे. अशावेळी दुकानदारांना आपल्या स्थानिक ग्राहकांना यूपीआय, क्‍यूआर, आधार पे, एमपीओएस आणि सॉफ्टपीओएस यासारखे पेमेंटचे विस्तृत पर्याय देता यावेत यासाठी हा नवाकोरा मंच त्यांना सक्षम बनवतो. याखेरीज या सेवेमुळे खर्चात बचत होत असल्याने व ती सहज अंमलात आणण्याजोगी असल्याने ग्राहकांना मर्यादित पेमेंट सुविधांमुळे ग्राहकांना गमावण्याची वेळ येणार नाही, व त्यांना डिजिटल वित्तीय सेवा अखंडितपणे पुरविता येतील.

पेनियरबाय निओदुकानमुळे दुकानदारांना आपल्या ग्राहकांना विपुल पर्याय देता येतील व देशात, विशेषत: बँकसेवा न पोहोचलेल्या भागांमध्ये डिजिटल तंत्रज्ञानाचा अधिक वेगाने स्वीकार होण्यास मदत होईल. यामुळे रोख रकमेची आणि रोख रकमेवर आधारित व्यवहारांची मागणी कमी होईल. याचबरोबर कोविडच्या काळामध्ये या सेवेमुळे ग्राहकांना सुरक्षित, कॉन्टॅक्टलेस पेमेंट्स करण्याची सुविधाही मिळेल. अशाप्रकारे निओदुकानला डिजिटल पेमेंट्सचे लोकशाहीकरण करायचे आहे. समाजाच्या अगदी तळागाळापर्यंतच्या सर्व आकार-प्रकारांच्या दुकांनाना डिजिटल व्यवहार करता यावेत आणि अखेर डिजिटल पेमेंट हा प्रत्यक्ष पैशांच्या व्यवहारांइतकाच सहजसुलभ पर्याय बनावा यादृष्टीने पेनियरबाय निओदुकान काम करत आहे.

बहुतांश द्वितीय श्रेणी आणि तृतीय श्रेणी शहरांमध्ये व त्याहीपलीकडच्या भागांमध्ये बहुतेक दैनंदिन व्यापार हा क्रेडिटवर चालतो. ताळेबंदीच्या वह्या सांभाळण्यात आणि देण्या-घेण्याचे हिशेब पूर्ण करण्यासाठी तासंतास घालविण्यात दुकानदारांची दमछाक होते. पण बहुतांश दुकानदार हा अजूनही पारंपरिक पद्धतीने ‘वहि-खात्या’मध्येच आपले हिशेब मांडून ठेवतो. अशावेळी निओदुकानचे ‘कस्‍टमर खाता’ – ही डिजिटल लेजर सुविधा त्यांना ग्राहकांची येणी अधिक कार्यक्षम पद्धतीने मांडून ठेवण्यास मदत करू शकेल. अधिक चांगली सुरक्षा प्रदान करणारी कस्टमर खाता सुविधा रिटेलर्सना डिजिटल व्यवहार करण्यास मदत करेल व आपले हिशेब व देण्या-घेण्याचे व्यवहार अधिक शिस्तबद्ध पद्धतीने करण्यास मदत करेल. कस्टमर खातामुळे दुकानदारांना सर्व व्यवहारांची डिजिटल नोंद करता येईल, ग्राहकांना स्वयंचलित पद्धतीने पेमेंट रिमाइंडर्स पाठवता येतील- जेणेकरून त्यांना वेळच्यावेळी येणी वसूल करता यावीत व त्यानुसार तयार करण्यात आलेले रिपोर्टस् पाहताही येतील. 

इतकेच नव्हे तर अनेक लहान उद्योगांचे पुरवठा व्यवस्थापन चांगले नसते. माल खरेदीसाठी त्यांना अनेकदा अव्वाच्या सव्वा पैसे भरावे लागतात, जे घाऊक किंमतीपेक्षा कितीतरी जास्त असतात. यामुळे अंतिमत: तोटा पदरी येतो. ही समस्या सोडविण्यासाठी पेनियरबाय निओदुकान एक अॅग्रिगेटर प्लॅटफॉर्म म्हणूनही काम करेल, जिथे दुकानदारांना बिग बास्केट, आयटीसी, उन्नती असे घाऊक मालखरेदीचे विविध पर्याय एकाच ठिकाणी सहज उपलब्ध होऊ शकतील. सध्या डिजिटल तंत्रज्ञान पुरविणामरी कोणताही कंपनी एका एकीकृत मंचावर मालाची घाऊक मागणी नोंदविण्याचे अनेक पर्याय देत नाही. शिवाय आपल्या कार्यतत्परतेमुळे हे अॅप ग्राहकांना डिजिटल पद्धतीने वेळच्यावेळी आणि वाजवी दरात वस्तू मागविण्याची क्षमता मिळवून देईल.

याप्रसंगी बोलताना पेनियरबायचे संस्थापक, एमडी आणि सीईओ आनंद कुमार बजाजम्हणाले की, आमच्या रिटेल पार्टनर्सना आपल्या आयुष्यात अखंड प्रगती करता यावी यासाठी त्यांची मदत करणार पेनियरबाय निओदुकान अॅप सादर करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. किरकोळ विक्री हा भारताच्या सामाजिक-आर्थिक व्यवस्थेच्या प्रमुख आधारस्तंभांपैकी एक आहे, कारण किरकोळ विक्रीची  दुकाने आणि स्थानिक समाज यांच्यामधील परस्पर नाते खोलवर रुजलेले असते. भारताची भरभराट आणि विकास व्हायचा असेल तर किरकोळ विक्रीकेंद्रांना आजच्या वेगाने बदलत्या अर्थव्यवस्थेत टिकून राहण्यासाठी आवश्यक ती सर्व मदन आणि संसाधने उपलब्ध करून देणे महत्त्वाचे आहे. ‘पेनियरबाय निओदुकान’ हा असाच एक प्रयत्न आहे, जो किरकोळ विक्रेत्यांची आर्थिक समावेशकता आणि आस्थिक स्वास्थ्य जपण्याशी कटिबद्ध आहे.

Continue reading

इराणचे प्रमुख खामेनेई ठार, पुत्र मोजतबा उत्तराधिकारी!

गेल्या काही दिवसांपासून तोंडी असलेला अमेरिका-इराण संघर्ष आता प्रत्यक्षात उतरला. काल सकाळी अमेरिका आणि इस्त्रायलने संयुक्त कारवाई करत इराणच्या सर्व प्रमुख ठिकाणांवर बॉम्बहल्ले केले. इराणच्या सहा शहरांवर हल्ले करण्यात आले. यात इराणचे प्रमुख नेते तसेच परमाणू केंद्रांना लक्ष्य करण्यात...

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...
Skip to content