Homeएनसर्कल१९७७ ते २००८......

१९७७ ते २००८… ३१ वर्षांच्या आठवणी तराळल्या एकाच छताखाली!

दिवाळी म्हटली की दिव्यांची आरास आणि फराळाचा सुगंध, पण यंदाची दिवाळी वसंत सहकारी साखर कारखाना, वनकोठे – वसाकाच्या (जळगाव जिल्हा, एरंडोल तालुका) परिवारासाठी वेगळीच ठरली. ९ आणि १० नोव्हेंबर रोजी सन १९७७ ते २००८ या कालावधीतील जवळपास १५० मित्र एकाच छताखाली आले आणि दोन दिवसांचा हा ‘वसाका कामगार पुत्र स्नेह मेळावा’ खऱ्या अर्थाने आठवणींचा महाउत्सव ठरला. मेळाव्यात पाचोऱ्याचे प्रा. नितीन (रिंकू) पाटील यांनी यावेळी “वसाका फाउंडेशन” स्थापन करून एकामेकाला मदतीचा हात देण्याची तसेच कारखाना पुन्हा सुरू करण्याबाबत मित्रांचे नेटवर्क वापरून प्रयत्न करण्याची कल्पना मांडली. कारखाना साईटवर चटईच्या खोलीत भरणाऱ्या जळगाव जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील आदरणीय गुरुजन वानखेडे गुरुजी, सौंदाणे गुरुजी, भोई गुरुजी, साबळे गुरुजी, शांताराम गुरुजी यांच्या निष्ठावान विद्यादानाप्रती अत्यंत कृतज्ञपूर्वक भावना त्यांच्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या. या गुरुजनांनी घडविलेल्या दोन पिढ्यातील अनेक विद्यार्थी आज वेगवेगळ्या क्षेत्रात मोठ्या पदांवर चमकदार कामगिरी करत आहेत.

या मीलन समारंभात कुणी २० वर्षांनी, तर कुणी तब्बल ३० वर्षांनी एकमेकांना भेटत होते. काळ बदलला, वये बदलली, जबाबदाऱ्या वाढल्या, प्रत्येकाची वाट वेगळी झाली, पण जेव्हा सगळे एकत्र आले, तेव्हा तो संपूर्ण काळ मागे सरकल्यासारखा वाटला. बालपणाच्या खेळकर गप्पा, शाळेतील खोडकर किस्से, एकत्र खेळणे, भांडणे, हसणे आणि पुन्हा एकत्र येणे, या सगळ्यांनी दोन दिवस कसे निघून गेले, हेच कळले नाही. वयाची बंधने, काळाचे अंतर आणि जीवनातील धावपळ विसरून वसाका कर्मचारी वसाहतीतील मित्र पुन्हा एकदा एकत्र आले. बालमित्र तब्बल अनेक वर्षांनंतर पहिल्यांदाच एका मंचावर भेटल्याने संपूर्ण कारखाना परिसरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. कार्यक्रमात एकमेकांची विचारपूस, हास्यविनोद, गप्पागोष्टी आणि जुन्या दिवसांच्या आठवणींनी वातावरण भारून गेले होते. काळाच्या ओघात प्रत्येकजण आपापल्या संसारात, व्यवसायात आणि जबाबदाऱ्यांमध्ये व्यस्त झाला होता. मात्र या मेळाव्याने सर्वांना पुन्हा एकदा बालपणीच्या आणि जुन्या मैत्रीच्या विश्वात नेऊन ठेवले.

युवा उत्साही सहकारी चेतन पाटील, यशराज पाटील, नागेश्वर पाटील, दीपक चौधरी, नितीन देशमुख, यतीश पाटील, हेमंत पाटील यांनी कार्यक्रम आयोजन व यशस्वितेसाठी परिश्रम घेतले. शिवसेना पारोळा तालुका क्षेत्र प्रमुख मधुकर कौतिक पाटील, शेवगावच्या केदारेश्वर साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक किरणदादा शेलार, ‘ॲग्रोवर्ल्ड’चे संपादक शैलेंद्र चव्हाण, डॉ. अजय सोनवणे, डॉ. अमोल चव्हाण, उमेश काकळीज, दुग्ध व्यावसायिक अनिल सुरेश पाटील, संभाजीनगरचे उद्योजक सुनील भाऊसाहेब पाटील, उबेद खान, निवृत्त फौजी सुरेश बापू निकम, शनी शिंगणापूर देवस्थानचे रवी निकम, मुंबईतील सामाजिक कार्यकर्ते रुपेश पाटील, प्रा. योगेश पाटील, भाईंदरच्या साई मंदिराचे पुजारी भूषण कुलकर्णी, जळगाव पोलिस दलातील अनिल टाक, गुंतवणूक सल्लागार नितीन देसले, सेतू केंद्रचालक विशाल भोसले, केतन खैरनार यांनी कार्यक्रमात आवर्जून उपस्थिती नोंदविली.

ज्येष्ठ मित्रांचे मार्गदर्शन, क्रिकेट आणि स्नेहभोजन

मेळाव्यात ज्येष्ठ मित्रांचे अनुभव, त्यांचे मार्गदर्शन आणि जुन्या आठवणी ऐकताना वेगळाच आनंद मिळाला. अनेक वर्षांनंतर भेटलेल्या मित्रांच्या चेहऱ्यावरील आनंद, आपुलकी आणि प्रेम पाहून मैत्रीचे नाते हे काळाच्या पलीकडे असते, याची प्रचीती आली. यावेळी सर्व मित्रांनी एकत्र क्रिकेटच्या खेळाचा आनंद घेतला. तसेच स्नेहभोजनाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता. एकूणच सर्व मित्रांनी मिळून हा कार्यक्रम यशस्वी करून दाखवला. सिनियर मित्रांनी योग्य ते पाठबळ दिल्याने सर्वच वयोगटातील मित्रांनी त्यांचे आभार मानले. आधुनिक युगात मोबाईलच्या दुनियेत रमलेले मित्र दोन दिवस मोबाईलपासून दूर राहून एकमेकांच्या सहवासात रमले. “मोबाईलचे चार्जिंग तर रोज करतोच, पण या दोन दिवसांत मित्रांच्या सहवासात मनाचे चार्जिंग झाले,” अशी भावना अनेकांनी व्यक्त केली. खरेतर हा केवळ स्नेह मेळावा नव्हता, तर तो होता जुन्या नात्यांचा पुनर्मिलाप, आठवणींचा अनमोल ठेवा आणि मैत्रीच्या ऋणानुबंधांचा सुंदर सोहळा ठरला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

भरत सावंतने जिंकली नलावडे स्मृती शालेय कॅरम स्पर्धा

मुंबईतल्या आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी, शशिकलाताई फौंडेशन व अविनाश नलावडे स्पोर्ट्सतर्फे बालदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेली‌ कॅरमप्रेमी प्रल्हाद नलावडे स्मृती चषक शालेय कॅरम स्पर्धा आरपीडी हायस्कूल-सावंतवाडीच्या भरत सावंतने जिंकली. निर्णायक बोर्डाच्या अगोदर ११-७ अशी आघाडी घेणाऱ्या द्वितीय मानांकित प्रसन्न गोळेला भरत...

मुंबईत येत्या २० नोव्हेंबरपासून ३ दिवस रसिकांसाठी संगीताची मेजवानी

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची समृद्ध परंपरा, सुरांची माधुरी आणि स्वरकलेचा अभिजात वारसा जपणाऱ्या मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने यंदाही वार्षिक संगीत महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. येत्या २० ते २२ नोव्हेंबर, या कालावधीत रंगणारा हा त्रिदिवसीय संगीत महोत्सव...

अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प होणार व्हेटो अध्यक्ष?

अमेरिकेत नुकत्याच झालेल्या मध्यावधी निवडणुकीत अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाने सपाटून मार खाल्ल्यानंतर ट्रम्प यांचे अध्यक्षपद फक्त नामधारी राहणार आहे. येत्या तीन जानेवारीपर्यंत ट्रम्प यांची सध्याची ध्येयधोरणे अस्तित्त्वात राहतील. मात्र, त्यानंतर त्यांना अमेरिकी काँग्रेस (प्रतिनिधीगृह) तसेच सिनेटमधल्या डेमॉक्रॅटिक...
Skip to content