Homeन्यूज ॲट अ ग्लांसकेंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाईभत्त्यात...

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाईभत्त्यात 3 टक्के वाढ!

दिवाळीच्या तोंडावर केंद्रातल्या मोदी सरकारने 1.16 कोटी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठी भेट दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत महागाई भत्ता (डीए) आणि महागाई सवलत (डीआर)मध्ये 3% वाढ करण्यास मंजुरी देण्यात आली. यासाठी 10,016 कोटी रुपयांची तरतूद मंजूर करण्यात आली आहे.

या निर्णयामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाईभत्ता 60%वरून 63% झाला आहे. ही वाढ 1 जुलै 2026पासून लागू होणार असून नोव्हेंबरच्या पगारात जुलै ते ऑक्टोबरची थकबाकी (एरियर्स) मिळणार आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, याचा लाभ 48 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 68 लाख पेन्शनधारकांना होणार आहे. सातव्या वेतन आयोगाच्या सूत्रानुसार ही वाढ करण्यात आली असून, पाचव्या आयोगात 483%वरून 497% आणि सहाव्या आयोगात 262%वरून 269%डीए वाढवण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना किंमत शून्य…

भीमाशंकर-कर्जत येथील टोरंट पॉवरच्या 3000 मेगावॅट पंप स्टोरेज प्रकल्पासाठी सुरू असलेल्या जंगलतोडीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी कर्जत पोलीस ग्राउंडवरील सभेतून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. महाराष्ट्रात काय करायचे, काय नाही, हे सगळे दिल्लीतून ठरते,...

इस्रायलमधले नेतन्याहू सरकार डामाडोल

इस्रायलच्या निवडणुकीत पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू किंवा त्यांचे मुख्य प्रतिस्पर्धी गाडी आयझेनकोट या दोघांनाही स्पष्ट बहुमताचा मार्ग नाही. सुरुवातीच्या 50% मतमोजणीनंतर नेतन्याहू यांच्या गटाला 53-55 जागा आणि आयझेनकोट यांच्या विरोधी गटाला 48-49 जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर अरब पक्षांना 16...

मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना ३३ हजारांचे सानुग्रह अनुदान

मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची यंदाची दिवाळी गोड करण्याच्या प्रयत्नात पालिका प्रशासनाकडून ३३ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी आज एका पत्रकार परिषदेत केली. नोव्हेंबर महिन्याच्या नियमित वेतनासोबत ३३ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान अदा करण्याचे निर्देश...
Skip to content