Homeटॉप स्टोरीइराकमधून अमेरिकेची संपूर्ण...

इराकमधून अमेरिकेची संपूर्ण सैन्यवापसी!

अमेरिकेने इराकमधून आपले सर्व सैन्य माघारी बोलावण्याचा निर्णय घेतला असून, ३० सप्टेंबर २०२६पर्यंत सर्व अमेरिकन सैनिक मायदेशी परततील. इराकचे पंतप्रधान मोहम्मद शिया अल-सुदानी आणि अमेरिकन सेंट्रल कमांड यांच्यात झालेल्या चर्चेनंतर या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. या माघारीमुळे २००३मध्ये सुरू झालेली आणि विशेषतः २०१४मध्ये इसिसच्या वाढत्या धोक्यानंतर पुन्हा तीव्र झालेली अमेरिकेची तब्बल २३ वर्षे जुनी लष्करी मोहीम अधिकृतपणे संपुष्टात येणार आहे. गेल्या वर्षीच अमेरिकेने इराकच्या बहुतांश भागांतून आपले लष्करी तळ रिकामे केले होते आणि केवळ उत्तरेकडील कुर्दिश प्रांतात त्यांचे काही सैनिक तैनात होते.

आता इराकी सुरक्षा दले स्वतःच्या देशाचे संरक्षण करण्यास पूर्णपणे सक्षम असल्याचा विश्वास अमेरिकेने व्यक्त केला आहे. इराक आणि सीरियामध्ये इसिसविरुद्धचे प्रत्यक्ष युद्ध यापूर्वीच संपले असून, सध्या उरलेले अमेरिकन सैनिक केवळ प्रशिक्षण आणि सल्लागाराच्या भूमिकेत तेथे उपस्थित होते. ३० सप्टेंबर २०२६पर्यंत सैन्य माघारीची अंतिम प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, अमेरिकेचे इराकमधील लष्करी वर्चस्व संपुष्टात येईल. मात्र, प्रत्यक्ष लष्करी उपस्थिती नसली तरी भविष्यात अमेरिका आणि इराक यांच्यातील सुरक्षा आणि दहशतवादविरोधी सहकार्य एका नव्या स्वरूपात कायम राहण्याची शक्यता आहे.

Continue reading

राज्यात पाइप गॅसच्या जोडण्यांसाठी 31 मार्चपर्यंत विविध सवलती!

जागतिक स्तरावर ऊर्जा पुरवठा साखळी विस्कळीत झाल्यामुळे राज्यात घरगुती पाइप गॅस (PNG) जोडण्यांचे काम वेगाने पूर्ण व्हावे, यासाठी राज्य सरकारने गॅस कंपन्यांना दिलेल्या विविध सवलतींची मुदत 31 मार्च 2027पर्यंत वाढवली आहे. यामध्ये परवानग्या 24 तासांत देणे, काही शुल्क माफ...

उपसभापती सचिन अहिर दोन दिवसांच्या कर्नाटक दौऱ्यावर

राज्य विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर सध्या दोन दिवसांच्या कर्नाटक दौऱ्यावर असून, दौऱ्याच्या पहिल्या दिवशी त्यांनी कर्नाटक विधान भवनाला भेट दिली. कर्नाटक राज्याच्या विधान परिषद कामकाजानिमित्त आयोजित या अभ्यासदौऱ्यात उपसभापती अहिर यांनी कर्नाटक विधान परिषदेचे सभापती सलिम अहमद आणि...

महाराष्ट्रात दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांसाठी ‘झिरो चलन’ सुविधा उपलब्ध

महाराष्ट्रातल्या दुष्काळग्रस्त तालुक्यांतल्या विद्यार्थ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाने परीक्षाशुल्क माफीचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर आतापर्यंत तब्बल २ लाख ४० हजार ३६५ विद्यार्थ्यांनी परीक्षाशुल्काचा एकही रुपया न भरता ‘झिरो चलन’ सुविधेद्वारे परीक्षाअर्ज दाखल केले आहेत,...
Skip to content