Homeन्यूज ॲट अ ग्लांसएमपीएससी परीक्षाअर्जासाठी मुदतवाढ

एमपीएससी परीक्षाअर्जासाठी मुदतवाढ

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी)ने विविध शासकीय विभागांमधील एकूण ५,७०७ पदांसाठी घेतल्या जाणाऱ्या महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२६करिता ऑनलाईन अर्ज सादर करण्यास मुदतवाढ दिली आहे. आता उमेदवारांना १० ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहेत. उमेदवारांची मागणी आणि काही तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

आता परीक्षाशुल्क भरण्यासाठी १३ ऑगस्ट २०२६पर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली आहे. ज्या उमेदवारांनी आधीच अर्ज भरले आहेत, त्यांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही. परंतु त्यांनी ‘माय अकाऊंट’मधून आपली माहिती अपडेट करणे आवश्यक आहे. सरकारी सेवेची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी ही मोठी संधी असून, नियुक्तीपूर्वी कागदपत्रांची कडक पडताळणी केली जाणार असल्याचा इशाराही आयोगाने दिला आहे. यासंबंधीचे सविस्तर अपडेट्स ‘एमपीएससी’च्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहेत.

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content