Homeन्यूज ॲट अ ग्लांसभारतातला युपीआय जगात...

भारतातला युपीआय जगात भारी!

भारतामध्ये गुगल पे, फोन पे, भिम आदी एपच्या माध्यमातून सर्रास वापरण्यात येणाऱ्या युपीआयला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून जगातील सर्वात मोठी रिअल-टाइम पेमेंट सिस्टम म्हणून मानण्यात आले आहे. जागतिक व्यवहारांमध्ये युपीआयचे योगदान तब्बल 49% आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ)च्या जून 2025च्या ‘ग्रोइंग रिटेल डिजिटल पेमेंट्स (द व्हॅल्यू ऑफ इंटरऑपरेबिलिटी)’ या अहवालात युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (युपीआय)ला व्यवहाराच्या प्रमाणाच्या दृष्टीने जगातली सर्वात मोठी रिटेल फास्ट-पेमेंट सिस्टम (एफपीएस) म्हणून मानण्यात आले आहे. याखेरीज, ‘प्राइम टाइम फॉर रिअल-टाइम’ 2024बाबतच्या एसीआय वर्ल्डवाइड अहवालानुसार, जागतिक रिअल-टाइम पेमेंट सिस्टममध्ये व्यवहाराच्या प्रमाणात युपीआयचा वाटा जवळजवळ 49% आहे.

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी काल लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली. लहान व्यापाऱ्यांना युपीआयसारख्या डिजिटल पेमेंट पद्धतीचा अवलंब करण्यास मदत करण्यासाठी सरकार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) यांनी वेळोवेळी वेगवेगळे उपक्रम हाती घेतले आहेत. यात कमी किमतीच्या BHIM-UPI व्यवहारांसाठी प्रोत्साहनपर योजना आणि पेमेंट्स इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड (पीआयडीएफ) यांचा समावेश आहे. यात टियर-3 ते 6 केंद्रांमध्ये डिजिटल पेमेंट इन्फ्रास्ट्रक्चर (जसे की पीओएस टर्मिनल्स आणि क्यूआर कोड) तैनात करण्यासाठी बँका आणि फिनटेकना अनुदानसहाय्य दिले जाते. 31 ऑक्टोबर 2025पर्यंत, टियर-3 ते 6 केंद्रांमध्ये पीआयडीएफद्वारे अंदाजे 5.45 कोटी डिजिटल टच पॉइंट्स लावण्यात आले होते. याखेरीज, आर्थिक वर्ष 2024-25पर्यंंत, अंदाजे 6.5 कोटी व्यापाऱ्यांना एकूण 56.86 कोटी क्यूआर कोड दिले गेले, असल्याचेही त्यांनी सांगितले.

इतर आघाडीच्या आंतरराष्ट्रीय रिअल-टाइम पेमेंट प्लॅटफॉर्मच्या तुलनेत यूपीआयची स्थिती

देशव्यवहारांचे प्रमाण (अब्जामध्ये)जागतिक रिअल-टाइम पेमेंट प्लॅटफॉर्मचा % वाटा
भारत129.349%
ब्राझील 37.414%
थायलंड 20.48%
चीन17.26%
दक्षिण कोरिया 9.13%
इतर52.820%
एकूण 266.2100%

स्रोत: ‘प्राइम टाइम फॉर रिअल-टाइम’ 2024 वरील एसीआय वर्ल्डवाइड रिपोर्ट

Continue reading

उद्या घराबाहेर पडा छत्री आणि रेनकोटसह…

उद्या म्हणजेच गुरूवारीही मुंबईत दिवसभर पाऊस राहणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार उद्या मुंबईत हलका ते मध्यम पाऊस पडेल. ढगाळ वातावरण राहील. कमाल तापमान 29° ते 30°C तर किमान तापमान 27° ते 28°C असेल. वास्तविक तापमान दमटपणामुळे 38° ते 40°C...

एकांकिकांच्या सादरीकरणाने साजरी झाली विनय आपटेंची जयंती

"आजही नाटक संपल्यानंतर प्रेक्षकांकडून ज्या टाळ्या मिळतात, त्यातील पहिल्या शंभर टाळ्या, या विनय सरांच्याच असतात," अशा अत्यंत विनम्र भावना सुप्रसिद्ध अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांनी ठाण्यात व्यक्त केल्या. सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक विनय आपटे यांच्या जयंतीनिमित्त 'विनय आपटे...

प्राजक्ता वर्मा-लवंगारेंनी स्वीकारला कार्यभार

मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त म्हणून आज प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी कार्यभार स्वीकारला. पालिका प्रशासनाच्या वतीने सहआयुक्त (सुधार) संजोग कबरे यांनी त्यांचे स्वागत केले. प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांचे शिक्षण बी. ए., एल. एल. बी., एम. ए. असे शिक्षण झाले आहे. त्यांनी लंडन...
Skip to content