Homeएनसर्कलआयआयटी मुंबईचा 59वा...

आयआयटी मुंबईचा 59वा दीक्षांत सोहळा संपन्न!

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन, आयआयटी मुंबईचा दीक्षांत समारंभ शनिवारी आभासी-वास्तव (VR) पद्धतीने साजरा झाला. यासाठी पदवी मिळालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याचा आभासी अवतार तयार करण्यात आला होता. एवढेच नाही, तर त्यांना पदवी प्रदान करणारे आयआयटीचे संचालक प्रा. सुभाशीष चौधरी यांचाही अवतार तयार करण्यात आला होता. सर्व पदकविजेत्यांच्या अवतारांनी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि टोरंटो विद्यापीठाचे प्रोफेसर जेफ्री हिंटन यांच्या हस्ते पदके मिळाली.

सर्व पदवीप्राप्त विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता, अशाप्रकारे दीक्षांत समारंभ घेणे योग्य आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना या प्रतिष्ठित अभियांत्रिकी संस्थेतून पदवीधर झाल्याचा क्षण अभिमानाने साजरा करता येईल आणि त्यांच्या आरोग्यालाही धोका असणार नाही.

गेल्या वर्षाप्रमाणेच यंदाही या संस्थेने सर्व विद्यार्थ्यांना आभासी अवतार स्वरूपात येण्याची संधी दिली. विद्यार्थ्यांनी याला आभासी अवतारांच्या रूपाने, संस्थेचा परिसर, आपले हॉस्टेल आणि विभागातही फेरफटका मारला. तसेच आपले मित्र आणि प्राध्यापकांचीही भेट घेतली. याशिवाय, काही विद्यार्थ्यांना या समारंभात प्रत्यक्ष पदवीही देण्यात आली.

आजच्या 59व्या दीक्षांत समारंभात, एकूण 2501 पदव्या प्रदान करण्यात आल्या. यात 178 पीएचडी, 36 एमटेक/एमफील आणि पीएचडी, 26 दुहेरी पदवी, (एमएससी, पीएचडी), 8 एमएस, 689 एमटेक, 63 एमडी, 18 दुहेरी पदवी (बीडीएस+एमडी), 13 एमफील, 109 एमबीए, 1 इईमबीए, 7 एमपीपी, 235 दोन वर्षे एमएससी, 324 दुहेरी पदवी (बीटेक+एमटेक), 663 बी टेक पदव्या, 12 आंतरशाखीय दुहेरी पदवी (बीटेक/बीएस +एमटेक/एमएससी), 8 दुहेरी पदवी (बीएस+एमएससी), 49 बीएस, 14 बीडी, 20 पीडीजीआयआटी यासह 28 संयुक्त पीएचडी देण्यात आल्या.

यावर्षी, 38 संशोधन स्कॉलरची नाईक आणि रस्तोगी पीएचडी उत्कृष्टता पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. तीन विद्यार्थ्यांना त्यांच्या सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी सुवर्णपदकांनी गौरवण्यात आले. प्रेसिडेंट ऑफ इंडिया पुरस्कार, सिद्धार्थ चांडक बी टेकच्या विद्यार्थ्याला देण्यात आला. ‘इन्स्टिट्यूट गोल्ड मेडल’ आणि डॉ शंकर दयाल शर्मा सुवर्ण पदक, मनु श्रीवास्तव या भौतिकशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्याने जिंकली. त्याशिवाय, विविध विभागांमध्ये अव्वल आलेल्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सुवर्णपदक देऊन गौरवण्यात आले.

यावेळी संस्थेचा वार्षिक अहवाल सादर करताना संचालक प्रा. सुभाशिष चौधरी म्हणाले की, आजही पदवीपूर्व आणि पदव्युत्तर शिक्षणासाठी विद्यार्थांची आयआयटी मुंबईलाचा सर्वाधिक पसंती असते.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जेफ्री हिंटन यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. अत्यंत कठीण परिस्थितीतदेखील या विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश कौतुकास्पद आहे, असे ते म्हणाले. कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात, अत्यंत वेगाने होणारी प्रगती, समाजात आपल्या आकलनापलीकडचे परिवर्तन घडवून आणणार असून त्याचे सगळेच परिणाम चांगले असतील असे नाही, असे त्यांनी आपल्या भाषणात नमूद केले.

पदवी मिळालेल्या विद्यार्थ्यांपैकी अनेकजण येणाऱ्या वैद्यकीय क्रांतीत सहभागी होण्यास उत्सुक असतील, ज्यात तंत्रज्ञानाच्या मदतीने आपल्याला मानवतेचे कल्याण करता येईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. प्रो. जेफ्री हिंटन यांना कृत्रिम न्यूरल नेटवर्क्सचे जनक म्हणून ओळखले जातात. सध्या ते टोरांटो विद्यापीठात प्राध्यापक आणि व्हेक्टर विद्यापीठात प्रमुख वैज्ञानिक सल्लागार तसच गुगलमध्ये अभियांत्रिकी फेलो अशा विविध जबाबदाऱ्या सांभाळत आहेत.

Continue reading

भारतातला पहिला ई टीडीआर ट्रेडिंग प्लॅटफॉर्म आजपासून कार्यान्वित

राज्यशासनाच्या नगरविकास विभागाच्या पुढाकारातून आणि मुंबई महापालिकेच्या सहकार्याने हस्तांतरणीय विकास हक्क (Transferable Development Rights-TDR) व्यवहारांसंदर्भातील भारतातील पहिले एकात्मिक डिजिटल व्यासपीठ म्हणजेच ई टीडीआर ट्रेडिंग प्लॅटफॉर्म आज, बुधवारपासून ही प्रणाली पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यात आली आहे. https://etdr.mcgm.gov.in या संकेतस्थळावर ही...

‘होर्मुझ’ची कोंडीः युरोपीय देशांचा अमेरिकेला बायबाय..

होर्मुझच्या सामुद्रधुनीतील सागरी सुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी युरोपीय देश अमेरिकेच्या सहभागाशिवाय स्वतःची स्वतंत्र युती (कोईलेशन) स्थापन करण्याच्या तयारीत आहेत. जागतिक तेलपुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या जलमार्गावरून व्यापारी जहाजांची आणि विशेषतः तेलवाहू जहाजांची सुरक्षित ये-जा सुनिश्चित करणे हा या प्रस्तावित...

फास्टॅग युझर्ससाठी ही आहे महत्त्वाची बातमी!

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) देशातील सर्व फास्टॅग जारी करणाऱ्या बँकांना एक महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. यामध्ये बँकांना त्यांच्याद्वारे जारी करण्यात आलेल्या फास्टॅगशी लिंक असलेल्या 'वाहन नोंदणी क्रमांकांची' त्वरित आणि अनिवार्य पडताळणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. टोल संकलन...
Skip to content