Homeपब्लिक फिगर57 वर्षांनंतर अर्जेंटिनाला...

57 वर्षांनंतर अर्जेंटिनाला पहिल्यांदा भेट देणार भारतीय पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या पाच देशांच्या दौऱ्यावर असून या दौऱ्यात तब्बल 57 वर्षांनंतर अर्जेंटिनाला तसेच गेल्या 60 वर्षांत ब्राझिलला भेट देणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान असतील.

2 ते 9 जुलै 2025 असा पंतप्रधानांचा हा दौरा आहे. या कालावधीत ते घाना, त्रिनिदाद आणि टोबॅगो, अर्जेंटिना, ब्राझिल आणि नामिबिया या पाच देशांना भेटी देतील. काल ते याकरीता घानाला रवाना झाले. तेथे घानाचे राष्ट्रपती जॉन द्रामनी महामा यांच्याशी ते द्विपक्षीय चर्चा करतील. आजही ते घानातच आहेत. जगाच्या दक्षिणेकडील देशांपैकी घाना हा देश आफ्रिकन महासंघ तसेच पश्चिम आफ्रिकी राष्ट्रांचा आर्थिक समुदाय यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावतो. उभय  देशांमध्ये गुंतवणूक, उर्जा, आरोग्य, सुरक्षा, क्षमतानिर्मिती तसेच विकासविषयक भागीदारी, या क्षेत्रांमध्ये सहकार्याची नवी दालने खुली करण्याच्या दृष्टीने चर्चा होईल. घानाच्या संसदेलाही पंतप्रधान मोदी संबोधित करतील.

आज आणि उद्या पंतप्रधान त्रिनिदाद आणि टोबॅगो दौऱ्यावर असतील. या वर्षीच्या प्रवासी भारतीय दिवसाचे प्रमुख अतिथीपद निभावलेल्या राष्ट्रपती ख्रिस्तीन कारला कांगलू आणि या देशाच्या पंतप्रधानपदी दुसऱ्यांदा निवडून आलेल्या कमला प्रसाद-बिस्सेसर यांची ते भेट घेतील. त्रिनिदाद आणि टोबॅगोमध्ये 180 वर्षांपूर्वी भारतीय लोक पहिल्यांदा आले. मोदींची ही भेट आपल्या देशांदरम्यान असलेल्या वांशिक आणि नात्यासंबंधीच्या विशेष बंधांना नवसंजीवनी देण्याची संधी देईल.

त्यानंतर पोर्ट ऑफ स्पेनहून पंतप्रधान ब्युनॉस आर्यसला जाईन. गेल्या 57 वर्षांमध्ये एखाद्या भारतीय पंतप्रधानाने अर्जेंटिना देशाला दिलेली ही पहिलीच द्विपक्षीय भेट असेल. अर्जेंटिना हा देश लॅटिन अमेरिकेतील महत्त्वाचा आर्थिक भागीदार असून जी 20 समुहातील भारताचा जवळचा सहकारी देश आहे. या भेटीदरम्यान राष्ट्रपती जेवियर माईली यांच्याशी ते चर्चा करतील. गेल्या वर्षी मोदींची त्यांच्याशी भेट झाली होती. कृषी, महत्त्वाची खनिजे, उर्जा, व्यापार, पर्यटन, तंत्रज्ञान आणि गुंतवणूक या क्षेत्रांसह विविध क्षेत्रांमध्ये परस्पर लाभदायी सहकार्य वाढवण्यावर यावेळी भर दिला जाईल.

6 आणि 7 जुलैला पंतप्रधान मोदी रिओ दि जनेरियो येथे आयोजित ब्रिक्स शिखर परिषदेला उपस्थित राहतील. या शिखर परिषदेच्या अनुषंगाने ते विविध जागतिक नेत्यांचीदेखील भेट घेणार आहेत. यावेळी द्विपक्षीय राजकीय भेटीसाठी ते ब्रासिलियाला (ब्राझिल) जाणार असून सुमारे सहा दशकांमध्ये भारतीय पंतप्रधानाची या देशाला ही पहिलीच भेट असेल. या भेटीद्वारे जगाच्या दक्षिणेकडील देशांच्या प्राधान्यक्रमांच्या बाबतीत प्रगती करण्यासाठी माझे ते राष्ट्रपती लुईझ इनाशियो लुला दा सिल्व्हा यांच्यासोबत चर्चा करतील.

या दौऱ्यातील पंतप्रधानांचा शेवटचा थांबा नामिबिया, या देशात असेल. आपण या देशाशी वसाहतवादाविरुद्धच्या संघर्षाचा एकसमान इतिहास सामायिक करतो. या देशाच्या राष्ट्रपती डॉ. नेतुम्बो नंदी-नदैतवाह यांची भेट घेऊन ते आपली जनता, आपले प्रदेश तसेच जागतिक दक्षिणेकडील देश यांच्यातील सहकार्याचा नवा मार्ग निश्चित करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. नामिबियाच्या संसदेच्या संयुक्त सत्राला संबोधित करण्याचा सन्मानदेखील पंतप्रधान मोदी यांना मिळणार आहे.

या पाच देशांचा दौऱ्या मोदी ब्रिक्स, आफ्रिकी महासंघ, ईसीओडब्ल्यूएएस आणि सीएआरआयसीओएम यांसारख्या बहुपक्षीय मंचांवर उपस्थित राहतील.

1 COMMENT

Comments are closed.

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content