Homeकल्चर +‘मर्दानी 3’चा तिसरा...

‘मर्दानी 3’चा तिसरा भाग ‘डार्क, डेडली आणि ब्रूटल’!

आदित्य चोप्रांची यशराज फिल्म्सची सुपरहिट फ्रेंचाइझी ‘मर्दानी’ गेल्या 10 वर्षांपासून प्रेक्षकांचे प्रेम जिंकत हिंदी सिनेमातील सर्वात मोठी सोलो फीमेल-लीड फ्रेंचाइझी ठरली आहे. या ब्लॉकबस्टर फ्रेंचाइझीला प्रचंड प्रेम मिळाले असून ती सिनेप्रेमींसाठी एक कल्ट स्टेट्स बनली आहे. ‘मर्दानी 2’च्या रिलीजच्या वर्धापनदिनी, यशराज फिल्म्सने अधिकृतरीत्या ‘मर्दानी 3’ची घोषणा केली, ज्यात राणी मुखर्जी पुन्हा एकदा शिवानी शिवाजी रॉय या धाडसी पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. राणी मुखर्जी, या भारतीय सिनेमातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एकमेव अभिनेत्री आहेत ज्यांच्याकडे सोलो लीड ब्लॉकबस्टर फ्रेंचाइजीचा मान आहे. यावर बोलताना राणी मुखर्जी म्हणाली की, तिसरा भाग ‘डार्क, डेडली आणि ब्रूटल’ असेल!

राणी मुखर्जी म्हणाली की, “मला अत्यंत आनंद होत आहे की, आम्ही ‘मर्दानी 3’ची शूटिंग एप्रिल 2025मध्ये सुरू करत आहोत! पोलीस युनिफॉर्म घालणे आणि एक असं पात्र साकारणे ज्याने मला नेहमीच प्रेम दिले, ही एक खास गोष्ट आहे. या साहसी पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेला पुन्हा न्याय देण्याचा मला अभिमान आहे. ही फिल्म त्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांना समर्पित आहे जे निस्वार्थपणे आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी दररोज मेहनत घेतात. ‘मर्दानी 3’चे थ्रिल पूर्वीच्या सर्व भागांपेक्षा अधिक असेल.”

“जेव्हा आम्ही ‘मर्दानी 3’ बनवण्याचा विचार केला, तेव्हा आमचा उद्देश असा होता की ही फिल्म प्रेक्षकांसाठी आधीपेक्षा वेगळा अनुभव घेऊन येईल. आपल्याकडे असलेल्या कथेने मला खूप आनंद दिला आहे आणि प्रेक्षकही ती पाहून तितकेच आनंदी होतील अशी आशा आहे. ‘मर्दानी’ ही खूपच आवडती फ्रेंचाइझी आहे आणि त्यामुळे प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करणे आमचं कर्तव्य आहे. आम्ही ही अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू. ‘मर्दानी 3’ डार्क, डेडली आणि ब्रूटल आहे. प्रेक्षक या चित्रपटाला किती प्रेम देतील, हे पाहायला मी उत्सुक आहे.”, असेही तिने सांगितले.

‘मर्दानी 3’मध्ये यशराज फिल्म्सने लेखन आणि दिग्दर्शन विभागातील दोन नवोदित कलाकारांना फ्रेंचाइझी पुढे नेण्याची संधी दिली आहे. ‘द रेलवे मेन’फेम आयुष गुप्ता यांनी ‘मर्दानी 3’चे पटकथालेखन केले आहे. त्यांच्या प्रखर आणि प्रभावी लेखनशैलीला जागतिक स्तरावर खूप प्रशंसा मिळाली आहे. फिल्मचे दिग्दर्शन अभिराज मीनावाला करणार आहेत, ज्यांना यशराज फिल्म्सने तयार केले आहे. अभिराज यांनी आधी ‘बँड बाजा बारात’, ‘गुंडे’, ‘सुलतान’, ‘जब तक है जान’, ‘टायगर 3’ अशा अनेक चित्रपटांमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. सध्या ते ‘वॉर 2’चे सहायक दिग्दर्शक आहेत आणि आता ‘मर्दानी’ फ्रेंचाइझीची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

Continue reading

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे तबला वादन स्पर्धा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे रविवार, ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता केंद्राच्या सभागृहात तबला वादन स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा दोन वयोगटात घेतली जाईल. (छोटा वयोगट १० ते १५ वर्षे आणि मोठा वयोगट १६ ते २५...

दिनकर पाटील, शकुंतला खटावकर यांना ‘जीवन गौरव’ तर, मंगेश वरवडेकर यांना ज्येष्ठ क्रीडा पत्रकार पुरस्कार

कबड्डीच्या मैदानावर आपल्या कार्यकर्तृत्त्वाने खेळाला समृद्ध करणाऱ्या दिनकर पाटील (सांगली) आणि शकुंतला खटावकर (पुणे) यांना महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचा प्रतिष्ठेचा ‘कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी कबड्डी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्याचबरोबर मैदानावरील घडामोडींचे निर्भीड वृत्तांकन करताना खेळाडूंच्या न्यायासाठी...

आता कुर्ला-साकी नाका भागात रस्त्यावर दिसणार ‘मॅनहोल रेलगार्ड’!

मुंबईत मॅनहोल्सवर काम करताना सार्वजनिक सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी तसेच देखभाल-दुरुस्तीची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी 'मॅनहोल रेलगार्ड' ही चौकोनी आकारातील प्रतिकृती एका संस्थेकडून विकसित करण्यात आली आहे. या प्रतिकृतीची प्रत्यक्ष पाहणी आज मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि अतिरिक्त महापालिका...
Skip to content