Homeचिट चॅटकामगारमहर्षी आंबेकर बुध्दिबळ...

कामगारमहर्षी आंबेकर बुध्दिबळ स्पर्धेत अंशुमनला चकवून ध्रुव गटविजेता

मुंबईच्या राष्ट्रीय मिल मजदूर संघ, महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघ व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित कामगार महर्षी गं. द. आंबेकर स्मृती १४ वर्षांखालील बुध्दिबळ स्पर्धेत आंतरराष्ट्रीय फिडे गुणांकित ध्रुव जैनने (३.५ गुण) पांढऱ्या मोहरांनी खेळणाऱ्या अपराजित अंशुमन समळला (३.५) २५व्या मिनिटाला बरोबरीत रोखले आणि सरस सरासरीच्या बळावर अपराजित ध्रुव जैनने गटविजेतेपदावर झेप घेतली. परिणामी १३ वर्षांखालील गटविजेतेपद पटकाविणाऱ्या अंशुमनचा डबल धमाका मात्र हुकला. अरेना फिडे मास्टर हिरण्मयी कुलकर्णीने ११ व १२ वर्षांखालील मुलींच्या गटात सर्वाधिक गुण घेत दुहेरी विजेतेपद पटकाविले. राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर यांच्या पुढाकाराने झालेल्या स्पर्धेमधील विजेत्या-उपविजेत्यांना संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते, क्रीडाप्रमुख सुनील बोरकर, उपाध्यक्ष अण्णा शिर्सेकर आदी पदाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

परेल येथील आरएमएमएस वातानुकूलीत सभागृहात झालेल्या ८ वर्षांखालील बुध्दिबळ स्पर्धेत मुलांमध्ये रीयांश कदमने (५ गुण) प्रथम, अंगद पाटीलने (४ गुण) द्वितीय, अधवान ओसवालने (३ गुण) तृतीय आणि मुलींमध्ये मायरा गोगरीने (३ गुण) प्रथम, ध्रुवा भोसलेने (३ गुण) द्वितीय, समैरा थोरातने (२ गुण) तृतीय; १० वर्षांखालील मुलांमध्ये राज गायकवाडने (४.५ गुण) प्रथम, अर्णव साठ्येने (३.५ गुण) द्वितीय, शौर्य कोठारीने (३.५ गुण) तृतीय आणि मुलींमध्ये थिया वागळेने (४.५ गुण) प्रथम, आराध्या पुरोने (२.५ गुण) द्वितीय, स्वरा मोरेने (२ गुण) तृतीय तर १२ वर्षांखालील मुलांमध्ये व्ही. प्रिजेशने (४.५ गुण) प्रथम, युग संघवीने (४ गुण) द्वितीय, पी. रेयानने (३ गुण) तृतीय पुरस्कार जिंकला.

मुंबई शहर व उपनगर, ठाणे, पालघर, पुणे जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय फिडे गुणांकित सबज्युनियर बुध्दिबळपटूच्या डावपेचांनी रंगलेल्या कामगार महर्षी आंबेकर स्मृती चषक बुध्दिबळ स्पर्धेच्या संयोजनाचे मुंबई शहर बुध्दिबळ संघटनेचे सेक्रेटरी फिडे इंस्ट्रक्टर राजाबाबू गजेंगी यांनी विजेत्यांचे विशेष कौतुक केले.

Continue reading

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील तज्ज्ञांना आता मिळणार दरमहा पावणेपाच लाख!

केंद्र शासनाने जारी केलेल्या सुधारित भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकांनुसार तज्ज्ञांच्या कामगिरीचे निकष, आरोग्य संस्थांमधील त्यांची उपलब्धता व उपयोग आणि अंमलबजावणीतील अडचणी विचारात घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियानाने अभियानातील तज्ज्ञांसाठी कामगिरीआधारित मानधनाची सुधारित रचना निश्चित केली आहे. सुधारित रचनेनुसार पूर्णवेळ स्त्रीरोगतज्ज्ञ,...

आज व उद्या मुंबईतल्या काही इमारतीत वाजणार सायरन

नवी दिल्लीतल्या नागरी संरक्षण विभागाचे महासंचालकांच्या निर्देशानुसार दूरसंचार विकास केंद्र (सी-डॉट), सी-डॉट परिसर, मेहरौली, नवी दिल्ली येथील पथकाच्यावतीने मुंबईत प्रोटोटाइप सायरन उपकरणाची चाचणी आज आणि उद्या म्हणजेच ८ व ९ ऑक्टोबरला करण्यात येत आहे. बृहन्मुंबई शहरातील जुने सचिवालय, जोड...

मुंबई महापौर चषक शालेय कॅरम स्पर्धेत केवल कुळकर्णी विजेता

मुंबईतल्या आनंदराव अडसूळ चॅरिटेबल ट्रस्ट व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे एमएससी बँक पुरस्कृत मुंबई महापौर चषक शालेय कॅरम स्पर्धेत शेठ करमशी कानजी इंग्लिश स्कूलचा केवल कुळकर्णी विजेता ठरला. अटीतटीच्या अंतिम आठव्या फेरीत डावाच्या मध्यापर्यंत १०-० अशी आघाडी घेणाऱ्या उमैर पठाणला...
Skip to content