Homeकल्चर +'भीमराया तुझ्यामुळे..'द्वारे भारतरत्न...

‘भीमराया तुझ्यामुळे..’द्वारे भारतरत्न डॉ. आंबेडकर यांना अभिवादन

भारतीय संविधानाचे निर्माते, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे सर्वसामान्यांना हक्क, अधिकार मिळाले. या अधिकार, हक्कांनी कित्येकांचे आयुष्य बदलले. ही माणूस म्हणून घडण्याची गोष्ट भीमराया तुझ्यामुळे.. या व्हिडिओतून अनोख्या आणि भावस्पर्शी पद्धतीने मांडण्यात आली आहे. महत्त्वाचं म्हणजे, या म्युझिक व्हिडिओतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाला अभिवादन करण्यात आलं आहे.

अमित बाईंग, सचिन जाधव, प्रदीप जाधव यांनी या म्युझिक व्हिडिओची निर्मिती केली आहे. अमित बाईंग यांनी दिग्दर्शनाचीही जबाबदारी निभावली आहे. श्रेयश राज अंगाणे यांनी संगीत दिग्दर्शन, गीतलेखन, पटकथा लेखन, संवाद लेखन, निखिल चंद्रकांत पाटील यांनी कथालेखन, हरेश सावंत यांनी छायांकन केलं आहे. प्रसिद्ध गायक मनीष राजगिरेच्या आवाजात हे गीत स्वरबद्ध करण्यात आले आहे. म्युझिक व्हिडिओमध्ये अभिनेत्री मेघा घाडगे यांच्यासह नितेश कांबळे, मानस तोंडवळकर, नरेंद्र केरेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

पूर्वीच्या काळी समाजरचनेमध्ये भेदभावाची, उच्च-कनिष्ठता मानण्याची अनिष्ट प्रथा होती. मात्र, आता मोठा सरकारी अधिकारी झालेला तरूण आपल्या गावी येतो. कष्ट करणारी आई, कष्टातून घेतलेलं शिक्षण, गावात अनुभवलेला भेदभाव या सगळ्या गोष्टी त्याला आठवतात. पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेला संघर्ष, देशाचं केलेलं संविधान यामुळे त्या मुलाला त्याचा शिक्षणाचा, जगण्याचा हक्क मिळून त्याचं आयुष्य कसं बदलतं याची गोष्ट या म्युझिक व्हिडिओतून उलगडण्यात आली आहे. अत्यंत भावस्पर्शी असा हा म्युझिक व्हिडिओ सर्वांना भावणारा आहे.

Continue reading

आत्माराम मोरे स्मृती आंतर हॉस्पिटल क्रिकेट २३ मार्चपासून

विविध खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत असलेल्या आत्माराम मोरे प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आत्माराम मोरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा २३ ते ३० मार्च २०२६ दरम्यान एमजेएससी ग्राउंड, शिवाजी पार्क, मुंबई-४०० ०२८...

‘ध्यास’ आणि ‘रंगकर्मी’ सन्मानांचा सोहळा ‘चैत्र चाहूल’ संपन्न!

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मराठी संस्कृती आणि भाषेचा गौरव करणारा विनोद आणि महेंद्र पवार यांच्या 'ॲड फिझ’ निर्मित ‘चैत्र चाहूल’ हा कलेचा, संस्कृतीचा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा मानाचा कार्यक्रम यंदाही अत्यंत दिमाखात पार पडला. गेली दोन दशके सातत्याने आयोजित केला जाणारा...

तुम्ही ‘बायको’शी लग्न केलंय, ‘मोलकरणी’शी नाही!

सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक ऐतिहासिक आणि विचार करायला लावणारी टिप्पणी केली- "तुम्ही 'बायको'शी लग्न केलंय, 'मोलकरणी'शी नाही!" न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनी एका वैवाहिक वादाच्या सुनावणीदरम्यान पतीला स्पष्ट शब्दांत बजावलं की, "स्वयंपाक करणं, भांडी घासणं, घर सांभाळणं, या गोष्टींमध्ये तुम्हालाही...
Skip to content