Tuesday, February 4, 2025
Homeमाय व्हॉईसमहाराष्ट्रगीत लिहिणाऱ्या भाषाप्रभुला...

महाराष्ट्रगीत लिहिणाऱ्या भाषाप्रभुला तरी सोडा हो!

अहो पालिका आयुक्त, महाराष्ट्रगीत लिहिणाऱ्या भाषाप्रभुला तरी सोडा हो… स्थळः ठाण्यातला तीन पेट्रोल पम्प परिसर. नेमकं ठिकाण विष्णुनगर पोलीस चौकीला लागूनच! अगदी पाच पावलावर! महाराष्ट्रगीत तसेच अनेक आजरामर नाट्यकृतींनी तमाम महाराष्ट्राला माहित असलेलं लाडकं नाव म्हणजे रामगणेश गडकरी!! ठाणे शहरात त्यांच्या गौरवार्थ गडकरी रंगायतन हे नाट्यगृहही आहे. अशी सर्व परिस्थिती असताना त्यांच्या नावाचा फलक पालिका कचरा कुंडीच्या जवळ असावा हे संतापजनकच नव्हे तर कविकुलाचा अपमान करणारेच कृत्य आहे. खरंतर या चुकीला माफी नाहीच!!

शहरातील कचराही हटवला गेला पाहिजे हे मान्य आहे. पण भाषाप्रभुच्या फलकाशेजारी कचऱ्याने बरबटलेली लक्तरे व कचरा आजबाजूला फेकलेला असणे कितपत योग्य आहे याचा विचार आजूबाजूला राहणाऱ्या आणि ‘आनंद’ नावाच्या मिजाशीत वावरणाऱ्या सर्वांनाच लाजेने माना खाली घालायला लावणारा आहे.

“मंगलदेशा पवित्र देशा! महाराष्ट्र देशा|

प्रणाम घ्यावा, माझा हा श्री महाराष्ट्र देशा||

असे अवीट गीत लिहिणाऱ्या कवीच्या वाटेला अशी अरसिक पालिका येऊ नये असे मनोमन वाटते. कवी पुढे म्हणतात…

“शहर पुण्याच्या, शिवनेरीच्या, पंढरीच्या देशा|

पुंडलिकाच्या, शिवरायांच्या, टिळकांच्याच्या देशा||”

अशा गोड शब्दांत राज्याचे वर्णन करणाऱ्या कवीच्या नशिबी हे काय वाढून ठेवलंय हे पाहिल्यावर डोक्याचा लोच्याच झाला नाही तरच नवल! ‘कल्पनेचे धाडस व चमत्कृती हा जर काव्याचा एक मुख्य गुण मानला तर त्याबाबतीत गडकऱ्यांची बरोबरी करणारे किती निघतील, असा प्रश्न टाकण्यात मुळीच हरकत नाही’ अशी प्रशंसा खुद्द तत्कालीन केसरी व मराठाचे संपादक, प्रख्यात साहित्यिक न. चिं. केळकर यांनी केली होती. हे गडकरींचे श्रेष्ठत्व सिद्ध करणारीच होती हे कोण अमान्य करेल?

Continue reading

काय काय नाही पाहिले क्रॉफर्ड मार्केटच्या पोलीस प्रेसरूमने!

चार-पाच दिवसांपूर्वी मुंबईतल्या क्रॉफर्ड मार्केट परिसरात (महात्मा फुले मंडई असे नामकरण झालेले असले व त्यालाही अनेक वर्षे उलटून गेलेली असली तरी प्रचलित नाव क्रॉफर्ड मार्केट असेच आहे) गेलो होतो. तसे हुतात्मा चौक परिसरात अजून प्रसंगानुरूप जाणे होत असतेच. पण...

हा पाहा मालाड रेल्वेस्थानकाचा मेकओव्हर!

मुंबईत पश्चिम रेल्वेच्या मालाड स्थानकाची दुरुस्ती वा मेकओव्हर गेली तब्बल सात-आठ वर्षे सुरु आहे. (काहींनी तर हे काम सुरु होऊन दहा वर्षे तरी झाली असावीत असा अंदाज व्यक्त केला आहे.) मालाड, कांदिवली व बोरिवली ही वाढणारी रेल्वेस्थानके आहेत हे...

बीडच्या आयपीएसला गायब केले, तेव्हा घशात शेंदूर घातला होतात का?

गेल्या २०/२५ वर्षांत बीड - परळी परिसरात याहूनही काळी कांडं घडली.. अहो आयपीएसला गायब केले गेले.. तेव्हा घशात शेंदूर घातला होतात का?.. "करा रे खुशाल करा हवा तो राडा धमाल करण्याचा जमाना आहे बिनधास्त करा, बलात्कार -भ्रष्टाचार - अत्याचार - भरसभेत -...
Skip to content