Homeबॅक पेजकार्यालये, मॉल्समध्ये अग्निप्रतिबंधक अपहोल्स्ट्री...

कार्यालये, मॉल्समध्ये अग्निप्रतिबंधक अपहोल्स्ट्री फॅब्रिकचा वापर अनिवार्य

आगीशी संबंधित दुर्घटनांसदर्भात सुरक्षा वाढवण्यासाठी केंद्र सरकारने बिगर-घरगुती फर्निचरमध्ये अग्निप्रतिबंधक अपहोल्स्ट्री फॅब्रिकचा वापर अनिवार्य केला आहे. कार्यालये, मॉल्स, विमानतळ, रेस्टॉरंट, भुयारी शॉपिंग संकुले, संग्रहालये, रुग्णालये, प्रार्थनास्थळे आणि शैक्षणिक संस्था यासारख्या सार्वजनिक ठिकाणी बिगर-घरगुती फर्निचरमध्ये वापरले जाणारे अपहोल्स्टर्ड कॉम्पोझिट आणि फॅब्रिक यांना हा दर्जा नियंत्रण आदेश लागू असेल. 

ऑक्टोबर 2023पासून लागू असलेल्या, दर्जा नियंत्रण आदेशानुसार आता सार्वजनिक ठिकाणी सर्व अपहोल्स्ट्री घटकांच्या वापरामध्ये भारतीय मानक ब्युरो IS 15768:2008चे अनुपालन आवश्यक आहे. सार्वजनिक वापराकरिता अपहोल्स्टर्ड फॅब्रिक असलेले संपूर्ण फर्निचर किंवा सब-ऍसेंब्ली यांच्या आयातीसंदर्भातही हा आदेश लागू आहे. मात्र, उद्योगांच्या विनंतीचा विचार करून 31 मार्च 2025पर्यंत या आदेशातून सूट देण्यात आली आहे.

वस्त्रोद्योग मंत्रालयानेदेखील उद्योग प्रोत्साहन आणि अंतर्गत व्यापार विभागाला IS 15768:2008चे फर्निचरसाठीच्या क्यूसीओमध्ये एकात्मिकरण करण्याची विनंती केली आहे. हे एकात्मिकरण फर्निचरसाठी सर्व संबंधित मानकांचा समावेश असलेली सर्वसमावेशक चौकट उपलब्ध होईल. या निर्णायक कृतीमधून सार्वजनिक स्थानांवरील अग्निसुरक्षेत वाढ करण्याची आणि सर्व बिगर-घरगुती फर्निचर सर्व प्रकारच्या दर्जा मानकांची आणि सुरक्षेची पूर्तता करत असल्याचे सुनिश्चित करण्याची सरकारची मानसिकता दिसून येते.

महत्त्वाच्या उत्पादनांमध्ये गुणवत्ता आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी क्यूसीओ हे सरकारच्या व्यापक धोरणाचा भाग आहेत. बीआयएस प्रमाणीकरण अनेक उत्पादनांसाठी ऐच्छिक असताना, अग्निरोधक अपहोल्स्ट्रीसारख्या धोरणात्मक वस्तूंसाठी या मानकांचे पालन करणे आता अनिवार्य आहे. हे नियमन सुरक्षित सार्वजनिक स्थाने निर्माण करण्यासाठी आणि या वातावरणात वापरलेले फर्निचर सर्वोच्च सुरक्षा मानकांची पूर्तता करते याची खातरजमा करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

***

Continue reading

तांदळाभोवती फिरणार जपानची पुढची निवडणूक!

जपानमध्ये तांदूळ हे केवळ एक मुख्य अन्न नाही, तर ते जपानच्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, सध्या तांदळाचा अभूतपूर्व तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतींमुळे देशात एक मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. गेल्या एका वर्षात...

यंदाच्या ‘इफ्फी’त पदार्पण करणार जगभरातील सात कलाकृती!

यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड केली जाणार आहे. विजेत्याला रूपेरी मयूर,...

राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन,...
Skip to content