Tuesday, April 15, 2025
Homeकल्चर +यंदा गणेशोत्सवात आहे...

यंदा गणेशोत्सवात आहे “बाप्पाचा बोलबाला”!

दरवर्षी आपल्या लाडक्या बाप्पाच्या उत्सवात येणारी नवनवी गाणी गणेशभक्तांना फार आनंद देतात. पण यंदा मात्र, गणेशोत्सवात “बाप्पाचा बोलबाला” हे गाणं सगळीकडे वाजत आणि गाजतसुद्धा आहे.

“बाप्पाचा बोलबाला” हा म्युझिक व्हिडिओ नुकताच लाँच करण्यात आला आहे. पॉवर पॅक्ड आणि एनर्जीने भरपूर असा हा गणेशाचा ट्रॅक असून या गाण्याचे गायक संगीतकार स्वरूप भालवणकर आहेत. दिग्गज गायक सुदेश भोसले ह्यांनीसुद्धा ह्या गाण्याला आपला आवाज दिला आहे. सुदेश भोसले ह्यांनी आपल्या आवाजाने आजवर गणेश उत्सवाची शान वाढवली आहे. इतकंच नव्हे तर प्रसिद्ध आरजे अर्चना पानिया पहिल्यांदाच सिंगर म्हणून या विडिओद्वारे पदार्पण करत आहे. आरजे अर्चनाला स्वतःवर विश्वास बसत नव्हता की त्यांना अशी सुवर्णसंधी मिळेल. त्यांचं म्हणणं आहे की, “गणपती बाप्पाने मला दुसऱ्यांदा संगीतकार स्वरूप भालवणकर ह्यांच्यामुळे निवडला आहे.”

बॉलीवूड गीतकार कुमार यांनी या गाण्याचे बोल अगदी अप्रतिमपणे लिहिले आहे. युनिव्हर्स व्हायब्रंट आणि मोरया क्रिएशन्सद्वारे हे गाणं रिलीझ केलं गेलं आहे. सोशल मीडिया इन्फ्लूएंसर तन्मय पाटेकर ह्या गाण्यात आपल्याला पाहायला मिळतील. युनिव्हर्स व्हायब्रंटचे स्वरूप भालवणकर आणि प्रशांत थोपील यांनी या गाण्याची संकल्पना मांडली आहे. त्यांना खात्री आहे की “बाप्पाचा बोलबाला” या वर्षाच्या गणेश उत्सवासाठी सर्व मंडळे आणि गणेशभक्तांच्या प्लेलिस्टमध्ये नक्कीच असणार.

Continue reading

दादर-माटुंगा केंद्रात रंगला संगीत नाट्यमहोत्सव

संगीत रंगभूमीच्या वैभवशाली कालखंडाची आठवण करून देणारा संगीत-नाट्य महोत्सव मुंबईच्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रात नुकताच साजरा झाला. संगीत नाटकांना चांगले दिवस यावेत यासाठी संस्था गेली १६ वर्षे हा महोत्सव आयोजित करत आहे. संगीत अमृतवेल हे खल्वायन, रत्नागिरी निर्मित, आणि डॉ. श्रीकृष्ण जोशी लिखित, मनोहर...

राज्य सरकारी अधिकाऱ्यांचे नेते ग. दि. कुलथे यांचे निधन

महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे संस्थापक व मुख्य सल्लागार ग. दि. कुलथे यांचे काल, सोमवारी रात्री नऊ वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने नवी मुंबईच्या नेरूळ येथील राहत्या घरी निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. राज्य सरकारी अधिकाऱ्यांच्या संघटनेचे मार्गदर्शक म्हणून...

‘मिशन मुंबई’च्या चित्रिकरणाला सुरुवात

ॲक्शन चित्रपटाची क्रेझ साउथ चित्रपटांसोबतच बॉलिवूडमध्येही असते. आता ती मराठी चित्रपटात पाहायला मिळेल. “मिशन मुंबई” हा शोध, थरारक आणि ॲक्शन चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्याच्या घडीला या चित्रपटाला एक्शनपट म्हणता येईल. कारण, यामध्ये सुमधूर संगीतासोबत एक्शनचा भडीमार...
Skip to content