Homeकल्चर +अनुराधा पौडवाल यांची...

अनुराधा पौडवाल यांची नवी भक्तीमय स्वरभेट अर्पण!

गणेशोत्सवाचे औचित्य साधून आदि शंकराचार्य रचित ‘गणेश पंचरत्न’ या गणपतीच्या श्लोककाव्याची स्वरभेट लोकप्रिय ज्येष्ठ पार्श्वगायिका पद्मश्री डॉ. अनुराधा पौडवाल यांनी कोट्यवधी भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या मुंबईतील श्री सिध्दीविनायक मंदिरात मंगळवारी सकाळी श्रींच्या चरणी अर्पण केली.

श्री सिध्दीविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकर, अनुराधा पौडवाल यांच्या कन्या कविता पौडवाल, या ध्वनिचित्रफितीचे निर्माते लंडनस्थित व्यावसायिक दिलीप आपटे यावेळी उपस्थित होते. अत्यंत मांगल्यपूर्ण वातावरणात या पारंपरिक, सुश्राव्य आणि वैशिष्ट्यपूर्ण भक्ती रचनेच्या ध्वनिचित्रफितीचे लोकार्पण सिध्दीविनायकाच्या साक्षीने झाले.

गणेश पंचरत्न हे श्री गणेशाची स्तुती करणारे एक उत्तम श्लोककाव्य आहे. काही महिन्यांपूर्वी सुप्रसिध्द गायिका पद्मश्री डॉ. अनुराधा पौडवाल यांनी आदि शंकराचार्यरचीत विघ्नहर्त्याचे हे पंचरत्न स्तुती काव्य लंडन येथील हाऊस ऑफ कॉमन्समध्ये गायले. ध्वनिचित्रफितीच्या माध्यमातून ते सर्वसामान्य भाविकांना आता ऐकता येणार आहे. यंदाच्या गणेशोत्सवात संगीत रसिक आणि श्री गणेशभक्तांना अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात पंचरत्न श्लोककाव्य ऐकण्याचा भाग्य योग लाभणार आहे. मंगळवारी श्री सिध्दीविनायक मंदिराच्या प्रांगणात ‘गणेश पंचरत्न’ श्लोककाव्य प्रसारित करण्यात आले. त्यामुळे तेथील प्रसन्न आणि मंगलमय वातावरणात भर पडली. मंदिरात दर्शनासाठी येणारे हजारो भाविक तल्लीनतेने हे श्लोककाव्य ऐकत होते. 

Continue reading

पंतप्रधान मोदी सेशेल्सच्या सर्वोच्च बहुमानाने सन्मानित

व्हिक्टोरिया (सेशेल्स) येथे एका विशेष सोहळ्यात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज सेशेल्सचे अध्यक्ष डॉ. पॅट्रिक हर्मिनी यांच्या हस्ते ‘गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन’ हा पहिला सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला. पंतप्रधानांच्या पर्यावरणपूरक नेतृत्त्वासाठी, विकसनशील देशांच्या हितासाठी केलेले प्रयत्न, सागरी...

उद्या घराबाहेर पडा छत्री आणि रेनकोटसह…

उद्या म्हणजेच गुरूवारीही मुंबईत दिवसभर पाऊस राहणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार उद्या मुंबईत हलका ते मध्यम पाऊस पडेल. ढगाळ वातावरण राहील. कमाल तापमान 29° ते 30°C तर किमान तापमान 27° ते 28°C असेल. वास्तविक तापमान दमटपणामुळे 38° ते 40°C...

एकांकिकांच्या सादरीकरणाने साजरी झाली विनय आपटेंची जयंती

"आजही नाटक संपल्यानंतर प्रेक्षकांकडून ज्या टाळ्या मिळतात, त्यातील पहिल्या शंभर टाळ्या, या विनय सरांच्याच असतात," अशा अत्यंत विनम्र भावना सुप्रसिद्ध अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांनी ठाण्यात व्यक्त केल्या. सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक विनय आपटे यांच्या जयंतीनिमित्त 'विनय आपटे...
Skip to content