Homeएनसर्कलअशोक कुमार सिंह...

अशोक कुमार सिंह ईएसआयसीचे नवे महासंचालक

भारत सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या अखत्यारीतील कर्मचारी राज्य विमा महामंडळाचे (ईएसआयसी) महासंचालक म्हणून भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी अशोक कुमार सिंह यांनी काल नवी दिल्लीत महामंडळाच्या मुख्यालयात कार्यभार स्वीकारला. 

अशोक कुमार सिंह हे 1999च्या केरळ तुकडीचे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी आहेत. याआधी ते केरळमधील जलसंसाधन विभागाचे प्रधान सचिव होते. जिल्हा तसेच राज्यस्तरावरील संस्थांमध्ये प्रशासन आणि व्यवस्थापनाचा त्यांना दांडगा अनुभव आहे. केंद्रीय स्तरावर त्यांनी स्वच्छ गंगा राष्ट्रीय परियोजनेचे कार्यकारी संचालक म्हणून काम केले आहे. संरक्षण मंत्रालयात सहसचिव तसेच अर्थ मंत्रालयात संचालक म्हणूनही त्यांनी काम केले आहे.

अशोक कुमार सिंह यांनी नवी दिल्लीच्या राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालयातून एमफिल केले आहे. ते आयआयटी कानपूरचे यांत्रिक अभियांत्रिकीचे पदवीधर आहेत.

Continue reading

नेपाळमध्ये पुन्हा महापूर! ३५ जण बेपत्ता!!

नेपाळच्या आज सकाळी बूढी गंडकी नदीला आलेल्या महापूरामुळे गोरखा जिल्ह्याला तडाखा बसल्याचे समजते. या पुरात ३५ जण वाहून गेल्याचे वृत्त असून नेपाळ प्रशासन त्यांची माहिती गोळा करत असल्याचे सांगण्यात येत आहे. हा पूर इतका प्रचंड होता की त्यात या...

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील तज्ज्ञांना आता मिळणार दरमहा पावणेपाच लाख!

केंद्र शासनाने जारी केलेल्या सुधारित भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकांनुसार तज्ज्ञांच्या कामगिरीचे निकष, आरोग्य संस्थांमधील त्यांची उपलब्धता व उपयोग आणि अंमलबजावणीतील अडचणी विचारात घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियानाने अभियानातील तज्ज्ञांसाठी कामगिरीआधारित मानधनाची सुधारित रचना निश्चित केली आहे. सुधारित रचनेनुसार पूर्णवेळ स्त्रीरोगतज्ज्ञ,...

आज व उद्या मुंबईतल्या काही इमारतीत वाजणार सायरन

नवी दिल्लीतल्या नागरी संरक्षण विभागाचे महासंचालकांच्या निर्देशानुसार दूरसंचार विकास केंद्र (सी-डॉट), सी-डॉट परिसर, मेहरौली, नवी दिल्ली येथील पथकाच्यावतीने मुंबईत प्रोटोटाइप सायरन उपकरणाची चाचणी आज आणि उद्या म्हणजेच ८ व ९ ऑक्टोबरला करण्यात येत आहे. बृहन्मुंबई शहरातील जुने सचिवालय, जोड...
Skip to content