Homeचिट चॅटज्येष्ठ कबड्डी संघटक...

ज्येष्ठ कबड्डी संघटक दिगंबर शिरवाडकर यांचे निधन

मुंबई शहर कबड्डी असो.चे माजी खजिनदार व ताडदेवच्या आर्य सेवा मंडळाचे आधारस्तंभ दिगंबर शिरवाडकर यांचे आज, २० जुलै रोजी पहाटे झोपेतच प्रदीर्घ आजारानंतर निधन झाले. निधनासमयी ते ८७ वर्षाचे होते. काही दिवसापूर्वीच त्यांच्या मुलाचे निधन झाले होते. त्या दुःखातून ते सावरले नाहीत. त्यातच त्यांचा अंत झाला.

शिरवाडकर यांनी जवळपास दोन तपे मुंबई शहर कबड्डी असो.च्या खजिनदारपदाची जबाबदारी सांभाळली होती. कित्येक वर्षे ते ‘मुंबई शहर’चे सदस्यदेखील होते. काही काळ त्यांनी महाराष्ट्र राज्य कबड्डी असो.चा जमाखर्च लिहिण्याची जबाबदारीदेखील पार पाडली होती.

आर्य सेवा मंडळाची कबड्डी स्पर्धा सातत्याने आयोजित करण्यात वसंत भालेकर यांच्या बरोबरीने शिरवाडकर यांचेही योगदान महत्त्वाचे होते. भालेकर यांच्या निधनानंतर काही वर्ष शिरवाडकर यांनी या स्पर्धा आयोजनाची जबाबदारी एकाकी पार पाडली. शारीरिक शिक्षण मंडळापासून त्यांनी कबड्डी क्षेत्रात आपल्या कार्याला सुरुवात केली. गिरगाव येथील चंदनवाडी स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content