Homeमुंबई स्पेशलन्यूयॉर्कनंतर १०० किलोमीटर...

न्यूयॉर्कनंतर १०० किलोमीटर जलबोगदे असणारे शहर म्हणजे मुंबई

मुंबईतल्या अमर महल ते वडाळा व पुढे परळपर्यंतच्या ९.७ किलोमीटर लांबीच्या जलबोगद्याचे खोदकाम ‘टीबीएम’ संयंत्राद्वारे पूर्ण झाले आहे. या भूमिगत जल बोगदा प्रकल्पांतर्गत वडाळा ते परळदरम्यान ५.२५ किलोमीटर लांबीच्या दुसऱ्या टप्प्याच्या जलबोगद्याचा ‘ब्रेक थ्रू’ आज महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या हस्ते करण्यात आला. जल बोगद्याद्वारे एफ उत्तर (माटुंगा, वडाळा परिसर), एफ दक्षिण (परळ) त्याचप्रमाणे अंशतः ई (भायखळा) आणि एल (कुर्ला) विभागातील काही परिसराला पुरेसा व उच्च दाबाने पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरानंतर १०० किलोमीटर जलबोगदे असणारे मुंबई महानगर जगातील दुसरे शहर ठरले आहे.

जलबोगदा खोदकामादरम्‍यान मोठ्या प्रमाणावर आढळून आलेले भूजल पाझर, वारंवार बदलणारे भूगर्भीय स्तर तसेच बोगद्यामध्ये खडक ढासळणे अशा प्रकारच्या खडतर आव्हानांचा मुकाबला करत पालिकेने दुसऱ्या टप्प्याचे खोदकाम नियोजित वेळेत पूर्ण केले आहे. कोविडच्या कठीण कालावधीतदेखील प्रकल्‍पाचे खोदकाम अविरतपणे सुरू होते. या जलबोगद्याचे खनन पूर्ण झाल्यामुळे पालिकेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा प्रकल्प विभागामार्फत अमर महल ते वडाळा व पुढे परळ पर्यंतच्या ९.७ किलोमीटर लांबीच्या जलबोगद्याचे खोदकाम ‘टीबीएम’ संयंत्राद्वारे पूर्ण करण्यात आले आहे. भूमिगत जलबोगदा प्रकल्प अंतर्गत वडाळा ते परळ दरम्यान ५.२५ किलोमीटर लांबीच्या दुसऱ्या टप्प्याच्या जलबोगद्याचा ‘ब्रेक थ्रू’ आज झाला.

पहिल्या टप्प्यातील हेडगेवार उद्यान ते प्रतीक्षा नगरदरम्यानच्या ४.३ किलोमीटर लांबीच्या जलबोगद्याचे खोदकाम ८ ऑक्टोबर २०२१ रोजी सुरू करण्यात आले. ८ ऑगस्ट २०२२ रोजी हे काम पूर्ण झाले. प्रतीक्षा नगर ते परळ या ५.२५ किलोमीटर लांबीच्या दुसऱ्या टप्प्याचे खोदकाम १ सप्टेंबर २०२२ रोजी सुरू करण्‍यात आले. मोठ्या प्रमाणावर आढळून आलेले भूजल पाझर, वारंवार बदलणारे भूगर्भीय स्तर तसेच बोगद्यामध्ये खडक ढासळणे (rock fall) या विविध आव्हानांवर मात करत दुसऱ्या टप्प्याचे खोदकाम यशस्वीरीत्या नियोजित वेळेत पूर्ण करण्‍यात पालिकेला यश आले आहे. प्रकल्पाचे ७४ टक्के काम पूर्ण झाले असून संपूर्ण प्रकल्प एप्रिल २०२६पर्यंत नियोजित वेळेत पूर्ण होईल, असे नियोजन करण्यात आले आहे.

पालिका आयुक्‍त भूषण गगराणी म्‍हणाले की, पालिका प्रशासनाचे उत्‍कृष्‍ट नियोजन, कार्यक्षम व्‍यवस्‍थापन व तांत्रिक कौशल्‍यामुळे मुंबईकर नागरिकांना अखंड, सुरक्षित व पुरेसा पाणीपुरवठा केला जात आहे. जगभरातील सर्वात मोठ्या पाणीपुरवठा योजनांमध्‍ये मुंबईची पाणीपुरवठा व्‍यवस्‍था गणली जाते. पाण्‍याच्‍या वहनासाठी जलबोगदे बांधणारी बृहन्‍मुंबई महानगरपालिका भारतातील पहिलीच स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍था आहे. जलवितरण व्‍यवस्‍थेतील व्‍यवहार्य पर्याय म्‍हणून जलबोगद्यांचा वापर केला जात असून जलबोगद्यांद्वारे पाणी वहन केल्‍याने गळती व पाणीचोरीला आळा बसतो आहे. एकूण ९० किलोमीटर लांबीच्‍या प्रबलित सिमेंट काँक्रिट जल बोगद्यांतून दररोज पाणी आणले जाते. त्‍यात आता अमर महल ते वडाळा व पुढे परळपर्यंतच्या ९.७ किलोमीटर लांबीच्या जलबोगद्याची भर पडली आहे. मुंबईतील घराघरात पाणी पोहोचविण्‍यासाठी पालिकेची महाकाय यंत्रणा २४ तास राबत आहे. उपलब्ध असलेल्या जलसाठ्याचे काटेकोर नियोजन करुन मुंबईकरांपर्यंत पाणी पोहोचवले जात आहे.

Continue reading

विलेपार्ल्यात साकारतोय मुंबईतील पहिला शहरी शेतीप्रकल्प

मुंबईतल्या विलेपार्ले विधानसभा क्षेत्राचे भाजपा आमदार पराग अळवणी यांच्या संकल्पनेतून मुंबईतील पहिल्या शहरी शेती प्रकल्पाचे उद्घाटन महापौर रितू तावडे यांच्या उपस्थितीत होणार असून उपमहापौर संजय घडी आणि महापालिका आयुक्त अश्विनी भिडे तसेच महापालिकेतील विविध समिती अध्यक्ष व अधिकारी यावेळी...

नारीवंदन राहिले! सीमांकन जिंकले!! मोदी आणि गांधी आता मैदानात आमनेसामने!!!

महिलांना लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत ३३ टक्के आरक्षण देणारे त्याचप्रमाणे यादृष्टीने मतदारसंघाची पुनरर्चना (सीमांकन) करणारी घटनादुरूस्ती विरोधकांच्या प्रबळ एकजुटीमुळे आज संध्याकाळी फेटाळली गेली. याकरीता झालेल्या मतदानात घटनादुरूस्तीसाठी लागणारे दोनतृतियांश बहुमत मिळवण्यात सरकार अपयशी ठरले. लोकसभेत उपस्थित असलेल्या एकूण ५२८...

युद्धविरामापर्यंत होर्मूझ पूर्णपणे खुले, इराणकडून घोषणा!

जगाच्या तेलवाहतूक तसेच इतर व्यापारात महत्त्वाची भूमिका बजावणारी होर्मूझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली करण्याची घोषणा इराण सरकारने केली आहे. इराणचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्बास अरागची यांनी नुकतीच ही घोषणा केली. लेबनान आणि इस्त्रायलमध्ये झालेल्या युद्धविरामानंतर इराण सरकारने हा निर्णय घेतल्याचे...
Skip to content