HomeUncategorizedइझमायट्रिपची अदानी डिजिटल...

इझमायट्रिपची अदानी डिजिटल लॅब्‍ससोब‍त भागिदारी

इझमायट्रिप डॉटकॉम या भारतातील आघाडीच्‍या ट्रॅव्‍हल टेक प्‍लॅटफॉर्मने आपल्‍या व्‍यासपीठावरून प्रत्‍यक्ष शुल्‍कमुक्‍त शॉपिंगचा अनुभव देण्‍यासाठी अदानी डिजिटल लॅब्‍स (एडीएल)सोबत नुकताच धोरणात्‍मक सहयोग केला आहे. यामुळे पर्यटकांना त्‍यांच्‍या ट्रॅव्‍हल नियोजनाचा भाग म्‍हणून सोईस्‍कर व लक्‍झरीअस अनुभव मिळेल. ग्राहक इझमायट्रिप.अदानीवन.कॉम या लिंकद्वारे इझमायट्रिपच्‍या वेबसाइटवरील एअरपोर्ट सर्विसेस पेजच्‍या माध्‍यमातून प्रत्‍यक्ष प्री-ऑर्डर करत या सेवेचा लाभ घेऊ शकतात.

सध्‍या भारतातील अमृतसर, अहमदाबाद, जयपूर, लखनौ, मंगळुरू, मुंबई आणि तिरूवनंतपुरूम येथील सात प्रमुख आंतरराष्‍ट्रीय विमानतळांवर उपलब्‍ध असलेली ही सेवा उत्‍पादनांच्‍या विशेष श्रेणीसह अतिरिक्‍त सूट देते. त्यामुळे एकूण प्रवास अनुभव उत्‍साहित होतो.

इझमायट्रिपचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी निशांत पिट्टी म्‍हणाले की, इझमायट्रिपमध्‍ये आमचे ग्राहकांच्‍या गरजांना प्राधान्‍य देण्‍याचे आणि त्‍यांचा प्रवास अनुभव अधिक उत्‍साहित करण्‍याचे मुलभूत तत्त्व राहिले आहे. हा सहयोग आमची कटिबद्धता अधिक दृढ करण्‍याच्‍या दिशेने प्रयत्‍न आहे, जेथे आमचा देशातील प्रवासाची सर्वात मोठी फॅसिलिटेटर असण्‍याचा मानस आहे. आमच्‍या प्‍लॅटफॉर्मवर विविध विमानतळांवरील शुल्‍कमुक्‍त शॉपिंगच्‍या सोयीसुविधेला एकत्र करत आम्‍ही शॉपिंग अनुभव सुलभ करण्‍यासोबत भारतीय प्रवाशांना स्‍मार्टर, अधिक रिवॉर्डिंग सोल्‍यूशन्‍ससह सक्षमदेखील करत आहोत.

अदानी डिजिटल लॅब्‍सचे प्रवक्‍ता म्‍हणाले की, या सहयोगामधून प्रवाशांना सर्व टचपॉइण्ट्सवर विनासायास अनुभव देण्‍याप्रती आमचा दृष्टिकोन दिसून येतो. इझमायट्रिपच्‍या प्‍लॅटफॉर्मवर समाविष्‍ट करण्‍यात आलेली ही आधुनिक शुल्‍कमुक्‍त सेवा भारतीय प्रवाशांना अधिक सोयीसुविधा देईल. आम्‍ही उद्योगामध्‍ये विकास व नाविन्‍यतेला गती देण्‍यासाठी या धोरणात्‍मक सहयोगाचा फायदा घेत डिजिटल युगात ट्रॅव्‍हल कॉमर्सचे भविष्‍य घडवण्‍यास सज्‍ज आहोत. 

Continue reading

सरकारी ‘चरणसेवे’चा १ लाख ४० हजार वारकऱ्यांनी घेतला लाभ

आषाढी वारीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील लाखो वारकरी पायी चालत विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे निघाले आहेत. या थकवणाऱ्या प्रवासात त्यांच्या पायांना विश्रांती आणि आरोग्यसुविधा मिळाव्यात यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या ‘चरणसेवा’ उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मुख्यमंत्री सहाय्यता...

आयुष्मान खुरानाला ‘द अकादमी’चे आमंत्रण!

बॉलिवूड स्टार आयुष्मान खुराना, ज्यांनी भारतामध्ये आपल्या विघटनात्मक आणि प्रगतीशील सिनेमाच्या माध्यमातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे, त्यांना यंदा ऑस्कर पुरस्कार प्रदान करणाऱ्या ‘द अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस’कडून सदस्यत्वासाठी आमंत्रित करण्यात आले आहे! या प्रतिष्ठित...

आता ‘एटीएम’मध्ये जाऊन झटपट मिळवा ‘हेल्थ रिपोर्ट’!

"हेल्थ रिपोर्ट्स" मिळविण्यासाठी वाट पाहायचा जमाना आता जुना झालाय. "एटीएम"मध्ये जाऊन आपण पैसे काढतो, तितक्याच सहजतेने आणि झटपट आता "हेल्थ रिपोर्ट" मिळू लागले आहेत. राज्य सरकारच्या योजनेमुळे हे शक्य झाले आहे. सध्या नंदुरबार आणि चंद्रपूर जिल्ह्यात "हेल्थ एटीएम" मशीन...
Skip to content