Homeकल्चर +५ आणि ६...

५ आणि ६ तारखेला आनंद घ्या कार्टून महोत्सवाचा!

कार्टूनिस्टस् कम्बाईन, मराठी साहित्य संस्कृती व कला मंडळ, प्रा. माणिकराव कीर्तने वाचनालय आणि महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या पाच आणि सहा मे रोजी नवी मुंबईतील वाशी सेक्टर सहामधील साहित्य मंदिर सभागृह येथे कार्टून महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे.

सकाळी दहा वाजल्यापासून संध्याकाळी सात वाजेपर्यंत चालणाऱ्या या कार्टून महोत्सवाला हावरे प्रॉपर्टीजने प्रायोजित केले आहे. या कार्टून महोत्सवात व्यंगचित्रकार शंभू किर्लोस्कर, बाळासाहेब ठाकरे, द. ग. गोडसे, दीनानाथ दलाल, बाळ राणे, वसंत सरवटे, श्रीकांत ठाकरे, हरिश्चंद्र लचके, रघुवीर मुळगावकर, विकास सबनीस, मंगेश तेंडुलकर, नागेश आर्डे, राज ठाकरे, ज्ञानेश सोनार, खलील खान, प्रभाकर वाईरकर, प्रशांत कुलकर्णी, ज्ञानेश सोनार, संजय मिस्त्री आदी ९२ व्यंगचित्रकारांची व्यंगचित्रे प्रदर्शित केली जाणार आहेत.

कार्टून

पाच मे रोजी सकाळी दहा वाजता उद्घाटनाचे पहिले सत्र सुरू होणार आहे. जागतिक व्यंगचित्रकारदिन, या विषयावरील सत्राचे योगेंद्र भगत सूत्रसंचालन करतील. अर्क चित्रे, या पूर्णपणे रंगीत असलेल्या पुस्तकाचे यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन केले जाणार आहे. सकाळी ११ वाजता दुसरे सत्र सुरू होईल. त्याचे सूत्रसंचालन विश्वास सूर्यवंशी करतील. केल्याने देशाटन, रेषाटन, या विषयावर युरोपातील व्यंगचित्र कलेच्या संग्रहालयांना प्रत्यक्ष भेट देऊन आलेल्या अनुभवाविषयी प्रशांत कुलकर्णी या सत्रात बोलणार आहेत. दुपारी बारा वाजता कॉमिक्स ते चित्रपट, या विषयावर चिंटू वर्तमानपत्रातील कॉमिक्स ॲनिमेशन ते चित्रपट हा रंजक प्रवास चारुहस पंडित सचित्र मांडणार आहेत.

दुपारी एक वाजता घोंगडे की दुनिया, या विषयावर चित्रकार, व्यंगचित्रकार, एकपात्री कलाकार, कॅलिग्राफी, या प्रवासाविषयी अष्टपैलू कलाकार गजानन घोंगडे आपले विचार मांडतील. दुपारी दोन वाजता चित्रकला ते व्यंगचित्रकला- एक अतुलनीय प्रवास, या विषयावर अर्क चित्रकार अतुल पुरंदरे सचित्र प्रात्यक्षिकासह आपल्या आपल्या भावना व्यक्त करतील. दुपारी तीन वाजता व्यंगचित्रकलेच्या जगात, या विषयावर युरोप आणि इतर देशांत अनेकवेळा प्रवास करून आलेले तिथल्या व्यंगचित्रकारांचे सचित्र अनुभव सांगतील प्रभाकर वाईरकर. दुपारी चार वाजता या दिवसाचे शेवटचे सत्र असेल. कार्टून म्युझियम बनवताना, या विषयावर दोन वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या पुणे विद्यापीठाच्या व्यंगचित्र संग्रहालयाविषयी संग्रहालय प्रमुख डॉ. प्रिया गोहाड माहिती देणार आहेत.

सहा मे रोजी सकाळी दहा वाजता महोत्सवातील पहिले सत्र सुरू होणार असून त्याचे सूत्रसंचालन विश्वास सूर्यवंशी करणार आहेत. चित्रकला की व्यंगचित्रकला, या विषयावर या दोन्ही क्षेत्रातील तारेवरच्या कसरतीविषयी आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटवणारे चित्रकार उमेश कवळे सचित्र व्याख्यान देणार आहेत. अकरा वाजता व्यंगचित्रकला म्हणजे काय रे भाऊ?, या विषयावर आपल्या मिश्किल शैलीत व्यंगचित्रकार विवेक प्रभूकेळुस्कर व्याख्यान देतील. दुपारी दोन वाजता व्यंगचित्रकारांची आपापसात खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा होईल.

कार्टून

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content