Homeकल्चर +मेघना साने यांचा...

मेघना साने यांचा ‘असा बरसला हायकू’ प्रकाशित!

मेघना साने यांनी लिहिलेल्या ‘असा बरसला हायकू’ या काव्यसंग्रहाचे मुंबईत नुकतेच झाले. या पु्स्तकाचे प्रकाशन उद्वेली बुक्स प्रकाशनने केले असून प्रकाशनाच्या कार्यक्रमाला अॅड. राजेंद्र पै, अखिल भारतीय बालकुमार साहित्य संस्थेचे अध्यक्ष राजन लाखे, भाषातज्ञ डॉ. अलका मटकर आदी मान्यवर उपस्थित होते.

हायकू, हा जपानी काव्यप्रकार महाराष्ट्रात २००० सलानंतर लोकप्रिय होऊ लागला. मुंबई विद्यापीठात २०१८ साली मेघना साने यांनी ‘१९८०नंतरचा मराठी हायकू स्वरूप आणि चिकित्सा’ हा विषय संशोधनासाठी घेऊन एम. फिल. पदवी प्राप्त केली. यानंतर त्यांनी ‘असा बरसला हायकू’, हा काव्यसंग्रह लिहून त्यातील प्रस्तावनेत आपले हायकू विषयीचे संशोधन मांडले आहे. या पु्स्तकाचे प्रकाशन नुकतेच झाले.

कार्यक्रमाची सुरुवात पुस्तकाचे प्रकाशक विवेक मेहेत्रे यांच्या प्रास्ताविकाने झाली. डॉ. अलका मटकर यांनी विद्यापीठात संशोधन करताना विद्यार्थी कशी माहिती गोळा करतात, किती प्रकारे विचार करतात हे सांगितले. हायकू, या विषयावर संशोधन करत असताना वाचनालयामध्ये फार कमी माहिती उपलब्ध होती अशी खंत त्यांनी व्यक्त केली. मेघना साने यांनी हायकूचे सर्व नियम कवयित्री शिरीष पै यांच्याकडून समजून घेतले होते व तोच धागा पकडून पुढे जाऊन त्या विषयात मेघना यांनी त्यात अधिक भर टाकली आहे, असे ते म्हणाले.

मेघना साने यांनी आपल्या भाषणात हायकू, या काव्यप्रकारावर थोडे विवेचन करून संशोधनात आपल्या हाती आलेले निष्कर्ष श्रोत्यांसमोर मांडले. त्या म्हणाल्या की, हायकू एखाद्या दृश्यातून उद्भवतो. एखादे दृश्य मनाला स्पर्श करून जाते. मनाला समाधी अवस्थेत नेते. अंतर्स्पर्श झाल्यावर शब्दांची रचना होते. हायकूतून तत्त्वज्ञान व्यक्त होते. कवितेच्या रचनेची प्रक्रिया नेमकी उलट आहे. आजूबाजूच्या घटनांमुळे भावनेची आंदोलने निर्माण होतात व प्रतिमा सुचतात. त्या घेऊन शब्दांची रचना होते.

राजन लाखे यांनी असा बरसला हायकू, या पुस्तकावर बोलताना मेघनाताईंनी लिहिलेल्या हायकूचे सौंदर्य उलगडून सांगितले. आशय आणि नाद दोन्ही दृष्टीतून हायकू संपन्न झालेले आहेत, असे मत त्यांनी मांडले. जपानी हायकूप्रमाणे कवयित्रीने या पुस्तकातील हायकू हे पाच-सात-पाच, या अक्षरबंधात रचलेले दिसतात.

समारंभाचे अध्यक्ष अॅड. राजेंद्र पै यांनी आपल्या मातोश्री कवयित्री शिरीष पै यांचे काही हायकू सादर केले व तिची शिष्या मेघना साने हा हायकूचा वारसा पुढे नेईल, अशी आशा व्यक्त केली.

या समारंभात प्रकाशिका वैशाली मेहेत्रे यांनी असा बरसला हायकू, या पुस्तकातील निवडक हायकूवर तयार केलेल्या व्हिडीओंचे सादरीकरण केले. त्यावेळी मेघना साने यांनी आपल्या निवेदनातून हायकू एखाद्या दृश्यातून कसा उद्भवतो ते विषद केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रतीक्षा बोर्डे यांनी केले. 

Continue reading

सामान्य आणि तत्काळ अर्जदारांसाठी पुण्यात विशेष पासपोर्ट मोहीम

नागरिकांना पासपोर्टसाठी लवकर नियोजित वेळ मिळावी तसंच, तातडीने  प्रवास करण्याची निकड असलेल्या नागरिकांसाठी, पासपोर्ट उपलब्द व्हावा म्हणून परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने काही उपक्रम हाती घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून, 'सामान्य' आणि 'तत्काळ' श्रेणीतील अर्जदारांसाठी पुण्यातल्या 'प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयामार्फत, एका विशेष पासपोर्ट...

15 जूनपासून घाऊक किंमत निर्देशांकाचे आधारभूत वर्ष 2022-23!

घाऊक किंमत निर्देशांकासाठी आधीचे 2011–12 हे आधारभूत वर्ष बदलून 2022–23 हे सुधारित आधारभूत वर्ष म्हणून ग्राह्य धरायला तसेच उत्पादक मूल्य निर्देशांकांचे संकलन करायला नुकत्याच झालेल्या सक्षम अधिकाऱ्यांच्या बैठकीत, मंजुरी देण्यात आली. केंद्रीय उद्योग प्रोत्साहन आणि अंतर्गत व्यापार विभागाच्या अखत्यारीतले...

नवी मुंबईतले ‘एपीएमसी’ पोहोचले राष्ट्रीय स्तरावर!

राज्याच्या कृषी आणि पणन क्षेत्रात एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा प्रशासकीय बदल झाला असून, नवी मुंबईतील वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी)ला आता अधिकृतरीत्या 'राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार' (एमएनआय - मार्केट ऑफ नॅशनल इंपॉर्टन्स) म्हणून घोषित करण्यात आले आहे....
Skip to content