Homeकल्चर +डॉ. नरेंद्र जाधव...

डॉ. नरेंद्र जाधव यांच्या ‘आमचा बाप..’ची २००वी आवृत्ती प्रकाशित

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३व्या जयंतीचे औचित्य साधून प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ, रिझर्व्ह बँकेचे माजी प्रमुख आर्थिक सल्लागार, माजी कुलगुरू, भारतीय नियोजन आयोगाचे माजी सदस्य तसेच राष्ट्रपतीनियुक्त माजी खासदार डॉ. नरेंद्र जाधव यांच्या ‘आमचा बाप आन आम्ही’ या पुस्तकाच्या २००व्या आवृत्तीचे प्रकाशन राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते काल मुंबईत राजभवन येथे झाले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यामुळे डॉ. जाधव यांच्याप्रमाणेच करोडो उपेक्षित लोकांना  सन्मानपूर्वक जीवन जगण्याची प्रेरणा मिळाली. त्यामुळे त्यांच्या जयंतीदिनी ‘आमचा बाप आन आम्ही’ या पुस्तकाची दोनशेवी आवृत्ती प्रकाशित होणे औचित्यपूर्ण आहे, असे राज्यपालांनी सांगितले. डॉ. जाधव यांचे ‘आमचा बाप…’ हे दोनशेवी आवृत्ती प्रकाशित होणारे मराठी भाषेतील पहिले पुस्तक ठरल्याबद्दल तसेच ते मराठी भाषेतील पहिले ‘इंटरनॅशनल बेस्टसेलर’ ठरल्याबद्दल राज्यपालांनी त्यांचे अभिनंदन केले.

मानव संस्कृतीच्या इतिहासात डॉ. बाबासाहेब आंबेडकर एक अद्वितीय युगपुरुष होते. शतकानुशतके चालणाऱ्या अन्यायकारी जातीयवादी समाजव्यवस्थेच्या विरुद्ध ते उभे ठाकले. भारत तसेच अमेरिकेत उच्चशिक्षण घेतल्यानंतर ते आपल्या उपेक्षित बांधवांच्या मुक्तीसाठी भारतात परतले. स्वातंत्र्यानंतर भारत एकसंघ राहण्यात तसेच आज जगातील आर्थिक महासत्ता म्हणून उदयास येण्यात डॉ. आंबेडकर यांचे योगदान अनमोल आहे, असे राज्यपाल बैस यांनी सांगितले.

डॉ. जाधव आजच्या काळातील थोर लेखक, विचारवंत असून त्यांनी देशातील प्रगतिशील विचारधारेला समृद्ध केले आहे. ‘आमचा बाप आन आम्ही’ हे पुस्तक १४ भाषांमध्ये अनुवादित झाले असून आता त्याचे ऑडिओ बुक व्हावे तसेच ब्रेल लिपीतून त्याची आवृत्ती निघावी, अशी अपेक्षा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली.

लौकिकार्थाने जरी ‘आमचा बाप…’ हा आपल्या पुस्तकाचा नायक असला तरी, खऱ्या अर्थाने या पुस्तकाचे ‘मूकनायक’ डॉ. आंबेडकर हेच असल्याचे डॉ. जाधव यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले. या पुस्तकाच्या आजवर देशविदेशात ८ लाख प्रती विकल्या गेल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाला डॉ. जाधव यांच्या पत्नी वसुंधरा जाधव, ‘ग्रंथाली’ प्रकाशनचे सुदेश हिंगलासपूरकर तसेच डॉ. जाधव यांचे कुटुंबीय उपस्थित होते. 

Continue reading

आखाती युद्धामुळे महागाईचा भडका उडण्याची भीती!

इस्त्राईलने साउथ पार्स गॅस फील्डवर केलेल्या हल्ल्याने आणि इराणने कतारच्या रास लफान केंद्रावर केलेल्या पलटहल्ल्याने भारतासाठी ऊर्जासंकट एकाचवेळी दोन आघाड्यांवर उभे ठाकले आहे. गॅस, इंधन, महागाई साखळी धोक्यात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यातून भारतासह जगभरात महागाईचा भडका...

आखाती देशांमध्ये उद्या साजरी होणार ईद!

संयुक्त अरब अमिराती (UAE), सौदी अरेबिया, कुवेत, कतार आणि बहरीनसह अनेक आखाती देशांनी ईद-उल-फित्रच्या अधिकृत प्रारंभ तारखेची आज घोषणा केली. 30 दिवसांचा रमजान महिना पूर्ण झाल्याचे दर्शवणारा शव्वाल महिन्याचा चंद्र न दिसल्यामुळे, उद्या 20 मार्च, शुक्रवार रोजी ईद-उल-फित्र साजरी...

आज गुढीपाडवा! या करा धार्मिक कृती!!

आज गुढीपाडवा. कुठलाही सण आला की त्या त्या सणाच्या वैशिष्ट्याप्रमाणे आणि आपल्या पद्धतीप्रमाणे आपण काहीतरी करीतच असतो. मात्र धर्मात सांगितलेल्या अशा पारंपरिक कृतींमागील अध्यात्मशास्त्र लक्षात घेतल्यास त्याचे महत्त्व आपल्याला पटते. गुढीपाडव्याच्या दिवशी केल्या जाणार्‍या धार्मिक कृतींची ही घ्या माहिती.. अभ्यंगस्नान...
Skip to content