Homeकल्चर +शुक्रवारी डिजिटली पाहा...

शुक्रवारी डिजिटली पाहा ‘संजय लीलाची प्रेम कहाणी’!

लग्न करण्यापेक्षा लग्न जमवणं जास्त अवघड असतं. मात्र संजय आणि लीला यांनी ‘सिरी लंबोदर विवाह’ चित्रपटात लग्न जमवण्याचा विडा उचलला आहे. ‘सिरी लंबोदर विवाह’ चित्रपट मूळ कन्नड भाषेत असून ‘संजय लीलाची प्रेम कहाणी’ या नावाने मराठीत पाहायला मिळणार आहे. ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटीवर शुक्रवारी, ५ एप्रिल २०२४ रोजी चित्रपटाचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर होणार आहे.

एकाच शाळेत आणि ट्यूशनला जाण्यापासून संजय आणि लीला एकत्र मोठे झाले आहेत. शिक्षण पूर्ण  केल्यानंतर ते विवाहसंस्था उघडतात. तेव्हा त्यांना राजकारणाची पार्श्वभूमी असलेल्या एका लग्नाच्या  नियोजनाची संधी मिळते. या लग्नादरम्यान १०० कोटींचा एक रहस्यमय गोंधळ उद्भवतो आणि गोष्टीला एक अनपेक्षित वळण मिळतं. हे वळण नेमकं कुठे जाऊन पोहोचणार, हे या चित्रपटात कळणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन नवोदित दिग्दर्शक सौरभ कुलकर्णी यांनी केले असून अंजन भारद्वाज आणि दिशा रमेश या जोडीचे या चित्रपटातून पदार्पण झाले आहे.

दाक्षिणात्य चित्रपटांतून दाक्षिणात्य संस्कृती आणि खास कला आपल्याला पाहयला आणि अनुभवायला मिळते. चित्रपटांमधून विविध संस्कृतींची देवाणघेवाण व्हावी आणि चांगली कलाकृती भाषेच्या बंधनात अडकून न राहता प्रेक्षकांपर्यंत पोहोचावी म्हणून हा आमचा प्रयत्न आहे, असे अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेंमेंट प्रा.लि.चे सी.ई.ओ. सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले.

Continue reading

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे तबला वादन स्पर्धा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे रविवार, ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता केंद्राच्या सभागृहात तबला वादन स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा दोन वयोगटात घेतली जाईल. (छोटा वयोगट १० ते १५ वर्षे आणि मोठा वयोगट १६ ते २५...

दिनकर पाटील, शकुंतला खटावकर यांना ‘जीवन गौरव’ तर, मंगेश वरवडेकर यांना ज्येष्ठ क्रीडा पत्रकार पुरस्कार

कबड्डीच्या मैदानावर आपल्या कार्यकर्तृत्त्वाने खेळाला समृद्ध करणाऱ्या दिनकर पाटील (सांगली) आणि शकुंतला खटावकर (पुणे) यांना महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचा प्रतिष्ठेचा ‘कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी कबड्डी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्याचबरोबर मैदानावरील घडामोडींचे निर्भीड वृत्तांकन करताना खेळाडूंच्या न्यायासाठी...

आता कुर्ला-साकी नाका भागात रस्त्यावर दिसणार ‘मॅनहोल रेलगार्ड’!

मुंबईत मॅनहोल्सवर काम करताना सार्वजनिक सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी तसेच देखभाल-दुरुस्तीची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी 'मॅनहोल रेलगार्ड' ही चौकोनी आकारातील प्रतिकृती एका संस्थेकडून विकसित करण्यात आली आहे. या प्रतिकृतीची प्रत्यक्ष पाहणी आज मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि अतिरिक्त महापालिका...
Skip to content