मुंबईच्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने शनिवार, ६ एप्रिल २०२४, या दिवशी सकाळी १० वाजता ज्येष्ठ नागरिक ख्याल गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा ६० ते ८० वयोगटातील अव्यावसायिक हौशी स्त्री-पुरुष कलाकारांसाठी खुली आहे.
प्रवेशअर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख २ एप्रिल २०२४ आहे. प्रवेशअर्ज संस्थेच्या कार्यालयात, फेसबुक, ट्विटर तसेच संस्थेच्या www.dadarmatungaculturalcentre.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क- २४३०४१५०

