Homeकल्चर +येत्या रविवारी पुण्यात...

येत्या रविवारी पुण्यात होणार नव्या दमाच्या ‘संगीत मंदारमाला’चा शुभारंभ!

सोहम हर डमरू बाजे.., जय शंकरा.., जयोस्तुते उषादेवते.., हरी मेरो.., बसंत की बहार आयी.. अशा विविध रागदारी संगीत – जोड, अनवट व नवीन राग, हवेली संगीत, भजन, ठुमरी, गझल, दरबारी नृत्यगायन जुगलबंदी, शिकवणीचा प्रसंग, रागमाला अर्थात ऋतुचक्र, नृत्य सवालजवाब अशा चतुरस्त्र संगीताने नटलेल्या, ‘संगीत मंदारमाला’, ह्या अजरामर साठोत्तर संगीत नाटकाचा युवा तडफदार संचातील पुण्यातील शुभारंभाचा प्रयोग, येत्या रविवारी, 24 मार्चला संध्याकाळी पाच वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरुड येथे रंगणार आहे.

ह्या प्रयोगासाठी १००व्या अ. भा. नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ नाट्य-चित्रपट दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल प्रमुख अतिथी म्हणून येणार आहेत. त्याचबरोबर संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायिका-अभिनेत्री निर्मला गोगटे, मधुवंती दांडेकर, बकुल पंडित, तसेच सतीश आळेकर, डॉ. विद्यावाचस्पती शंकरराव अभ्यंकर इत्यादी अनेक मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत.

या नाटकाचे लेखक पंडितराज विद्याधर गोखले आणि संगीतकार व प्रमुख भूमिका साकारणारे संगीतभूषण पंडित राम मराठे, या दोहोंच्या जन्मशताब्दी वर्षात या नाटकाची निर्मिती पं. राम मराठे

मंदारमाला

फौंडेशनने मुंबई मराठी साहित्य संघ आणि कलाभारतीच्या सहाय्याने केली आहे. १००व्या नाट्यसंमेलनाची मूहुर्तमेढ प्रयोग म्हणून 28 डिसेंबर २०२३ रोजी सांगली येथे या अजरामर संगीत नाटकाला बहुमान दिला गेला होता. ह्यातच या युवा पिढीच्या नाट्यप्रयोगाचे यश सामावलेले आहे.

1960मध्ये साठोत्तर संगीत नाटकाला सर्वार्थानं संजीवनी देण्याचा काम एकहाती एका लेखकाने केलं आणि तेदेखील अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्याप्रमाणेच, एका अण्णासाहेबांनीच! अर्थात नाटककार, ज्येष्ठ पत्रकार अण्णा तथा विद्याधर गोखले यांनी. 26 मार्च 1963 रोजी या नाटकाचा पहिला प्रयोग झाला. आतापर्यंत या नाटकाचे 1200 प्रयोग झाले आहेत. राम मराठे ह्यांची गायकी समर्थपणे पुढे नेणारी युवा तडफदार गायक भाग्येश मराठे, प्राजक्ता मराठे तसेच सुधांशू सोमण, प्रिया देव, मकरंद पाध्ये इत्यादी कलाकार ह्यात असून सुमारे 4 तासांहून अधिक चालणारे हे नाटक आता सर्व नाट्यपदे, शिवाय काही बंदिशी रचना अशांसह तीन तासांच्या आत आटोपशीर करण्यात आलं आहे, असे नाटकाचे निर्माते आणि दिग्दर्शक व संगीत मार्गदर्शक, संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायक नट, पं. मुकुंद मराठे यांनी सांगितले.

अर्थातच पूर्वी ज्यांनी हे नाटक अनुभवलय असा रसिकवर्ग  प्रेक्षक डोळ्यासमोर होताच. त्यांना पुनःप्रत्यायचा आनंद देणे महत्त्वाचे होते. आश्रम संगीत, हवेली संगीत आणि दरबार संगीत अशा तीन अंकामध्ये याची विभागणी आहे. अधिक माहितीसाठी मनोरंजनद्वारा मोहनराव कुलकर्णी यांच्याशी 98226 03880 या क्रमांकावर संपर्क करावा.

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content