Homeटॉप स्टोरीमहाराष्ट्रातले 2020 ते...

महाराष्ट्रातले 2020 ते 22पर्यंतचे कृषी पुरस्कार जाहीर!

महाराष्ट्रातल्या सन 2020, 2021 व 2022 करिता कृषी विभागामार्फत देण्यात येणारे शेतकरी व शेतीशी संबंधित संस्था यांचा सन्मान करणाऱ्या शासकीय पुरस्कारांची काल घोषणा करण्यात आली. त्या संदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

राज्य शासनाच्या कृषी व कृषी संलग्न क्षेत्र तसेच फलोत्पादन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शेतकरी व तत्सम संस्थांना डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार, वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार, जिजामाता कृषिभूषण पुरस्कार, कृषिभूषण (सेंद्रिय शेती) पुरस्कार, वसंतराव नाईक शेती मित्र पुरस्कार, युवा शेतकरी पुरस्कार, उद्यान पंडित पुरस्कार, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार (आदिवासी व सर्वसाधारण गट), पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषिरत्न पुरस्कार (मंत्रालय स्तर) असे विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.

सन 2020पासून कोरोनाच्या संकटाच्या काळात या पुरस्कारांच्या वितरणात खंड पडला होता. दरम्यान धनंजय मुंडे यांनी कृषिमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यापासून या तीनही वर्षातील कृषी विभागाच्या पुरस्कारांचे वितरण करण्याबाबत ते आग्रही होते. त्यानुसार सन 2020, 2021 व 2022 मधील पुरस्कारांची विभागनिहाय घोषणा करण्यात आली आहे.

कृषी विभागाच्या विविध पुरस्कारांच्या सोबतीने प्रोत्साहनपर रक्कम दिली जाते, त्या रकमेतही कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी नुकतीच तब्बल चार पटीने वाढ केली आहे. लवकरच या पुरस्कारांचे शासन स्तरावर कार्यक्रम आयोजित करून वितरण करण्यात येणार असल्याचेही मुंडे यांनी सांगितले.

ही आहे पुरस्कार व पुरस्कार्थींची यादी-

Continue reading

रविवारी आनंद घ्या राधिका जोशी यांच्या गायनाचा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, १५ फेब्रुवारीला सायंकाळी पाच वाजता राधिका जोशी यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. उस्ताद खादिम हुसैन खाँ यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा कार्यक्रम होईल. यावेळी तबल्यावर प्रणव गुरव तर संवादिनीवर सौमित्र क्षीरसागर...

‘रानसावल्या’चे शनिवारी प्रकाशन

निसर्गप्रेमी आणि अभ्यासक श्रीरंग फडके यांनी लिहिलेल्या ‘रानसावल्या’, या पुस्तकाचे प्रकाशन येत्या शनिवारी, १४ फेब्रुवारीला गोरेगाव पूर्व येथील नंदादीप विद्यालयातील डॉ. भानुबेन नानावटी कलाघर येथे होत आहे. संध्याकाळी पाच वाजता होणाऱ्या या कार्यक्रमासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या सहाय्यक आयुक्त...

भायखळ्याच्या भोसले उद्यानात आजपासून ‘मुंबई पुष्पोत्सव’!

मुंबई महापालिका आणि वृक्ष प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने भायखळ्याच्या येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयात आजपासून रविवार, ८ फेब्रुवारीपर्यंत उद्यानविद्या प्रदर्शन अर्थात ‘मुंबई पुष्पोत्सव’ आयोजित करण्यात येणार आहे. उद्घाटनानंतर आज रात्री ८ वाजेपर्यंत पुष्पोत्सव सर्वांसाठी खुला राहील....
Skip to content