Homeमाय व्हॉईसविश्व मराठी संमेलनात...

विश्व मराठी संमेलनात ‘मराठी भाषेची वैश्विक व्याप्ती’ ही मध्यवर्ती संकल्पना 

 ‘मराठी भाषेची वैश्विक व्याप्ती’ अशी मध्यवर्ती संकल्पना ठरवून येत्या 27 ते 29 जानेवारी या कालावधीत विश्व मराठी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनात महाराष्ट्र आणि देशासह आंतरराष्ट्रीय स्तरावरून मराठी भाषेच्या संवर्धनासाठी काम करणाऱ्या भाषाप्रेमींना जास्तीतजास्त संख्येने समाविष्ट करून घ्यावे, अशी सूचना मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर यांनी केली.

नवी मुंबईतील सिडको प्रदर्शन केंद्र येथे आयोजित करण्यात येणाऱ्या विश्व मराठी संमेलनाच्या पूर्वतयारीचा केसरकर यांनी गुरूवारी आढावा घेतला. यावेळी उपसचिव हर्षवर्धन जाधव, अवर सचिव नितीन डंगारे, राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ. शामकांत देवरे, भाषा संचालक विजया डोनीकर, साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सचिव मिनाक्षी पाटील आदी उपस्थित होते.

केसरकर म्हणाले की, महाराष्ट्रासह देशात आणि परदेशातही मराठी भाषा जपणारे नागरीक मोठ्या संख्येने आहेत. या सर्वांना एकत्र येऊन संवाद साधता यावा, त्यातून भाषेच्या संवर्धनासाठीची देवाण-घेवाण व्हावी, मराठी भाषेच्या संवर्धनासाठी उपक्रम राबविता यावेत या उद्देशाने विश्व मराठी संमेलन उपयोगी सिद्ध होणार आहे. यादृष्टीने बृहन्महाराष्ट्र मंडळे तसेच परदेशातील मराठी भाषेशी संबंधित संस्थांशी संपर्क साधण्यात यावा. महाराष्ट्रातील अधिकाधिक भाषाप्रेमी नागरिक संमेलनात सहभागी होतील यासाठीदेखील प्रयत्न करण्यात यावेत.

या संमेलनात साहित्यिक, मराठी भाषेच्या योगदानासाठी विविध पुरस्कार प्राप्त व्यक्ती, मराठीपण जपणारे राजघराणे आदींसह विविध माध्यमांचे संपादक, विविध क्षेत्रांतील मराठी उद्योजक आदींनाही निमंत्रित करण्यात यावे, अशी सूचनादेखील मंत्रीमहोदयांनी केली.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content