Homeपब्लिक फिगरतथाकथित पीएपी घोटाळ्यात...

तथाकथित पीएपी घोटाळ्यात शरद पवारांचे बंधू प्रतापराव?

मुंबई महापालिकेच्या ठाकरे सरकारच्या रुपये 20 कोटींच्या पीएपी (PAP) घोटाळ्यात आता शरद पवार परिवाराचे नावही पुढे आले आहे. भांडूप येथील 1903 सदनिकेचे कॉन्ट्रॅक्ट चोरडिया बिल्डरच्या पुणे येथील न्यू वल्ड लँडमार्क एल.एल.पी.ला देण्यात आले आहे. न्यू वल्ड लँडमार्क एल.एल.पी. कंपनीने यासाठी शरद पवार यांचे बंधू प्रतापराव पवार यांच्या निओ स्टार इन्फ्रा प्रोजेक्ट्स प्रा. लि. कंपनीसोबत केला आहे. ही जागा प्रताप पवार यांच्या याच कंपनीची आहे. त्याच्यासोबत या सदनिका बांधण्यासाठीचे डेव्हलपमेंट राईट, करार चोरडिया समुहाच्या न्यू वल्ड लँडमार्क एल.एल.पी. कंपनीने केले आहेत, असा आरोप भारतीय जनता पार्टीचे नेते डॉ. किरीट सोमैया यांनी काल एका पत्रकार परिषदेत केला.

1903 सदनिका महापालिका बाजारभावाने रु. 58 लाखांत एक सदनिका, याप्रमाणे घेणार आहे. या सदनिका बांधण्यासाठी जमीन व बांधकामाचा खर्च म्हणून 15 ते17 लाख खर्च होणार आहेत. म्हणजेच एका सदनिकेच्या मागे रुपये 40 लाख नफा शरद पवार यांचे बंधू प्रताप पवार यांची कंपनी व चोरडिया बिल्डर्सच्या न्यू वल्ड लँडमार्क एल.एल.पी कंपनीला मिळणार आहे. डॉ. सोमैया यांनी या घोटाळ्याचे सगळी कागदपत्रे, पुरावे पत्रकार परिषदेत सादर केले.

आश्चर्याची बाब अशी की प्रताप पवार यांच्या निओ स्टार इन्फ्रा प्रोजेक्ट प्रा. लि.चे शेअर कॅपिटल फक्त रुपये 1 लाख आहे. परंतु या कंपनीत 2021मध्ये 19 मार्च 2021 रोजी सिरम इन्स्टिट्यूटने रुपये 435 कोटी 6% व्याज या दराने वीस वर्षांसाठी या कंपनीत प्रेफरेन्स शेअर कॅपिटल म्हणून गुंतवले आहेत. या कंपनीने कोविडचे वॅक्सिन बनविले होते, हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे. रुपये 1 लाखांचे शेअर कॅपिटल प्रताप पवार व त्यांच्या पत्नीचे. त्यांच्यासमोर रुपये 435 कोटींची गुंतवणूक 6% दराने सिरम इन्स्टिट्यूट यांनी केली आहे, असा दावा सोमैया यांनी केला.

रुपये 100 कोटीच्या गुंतवणुकीच्या समोर रुपये 1000 कोटींचा भांडूप पीएपी घोटाळ्याचा फायदा / लूट चोरडिया यांच्या न्यू वल्ड लँडमार्क एल.एल.पी. कंपनीला करण्यात निओ स्टार इन्फ्रा प्रोजेक्ट्स कंपनीही सहभागी झाली आहे. या घोटाळ्याची चौकशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करावी, अशी मागणी डॉ. किरीट सोमैया यांनी आज पुन्हा केली आहे.

दरम्यान, किरीट सोमैया यांच्या या आरोपाविरूद्ध प्रतापराव पवार न्यायालयात मानहानीचा दावा करणार असल्याचे त्यांच्या गोटातून सांगण्यात आले.

Continue reading

नेपाळमध्ये पुन्हा महापूर! ३५ जण बेपत्ता!!

नेपाळच्या आज सकाळी बूढी गंडकी नदीला आलेल्या महापूरामुळे गोरखा जिल्ह्याला तडाखा बसल्याचे समजते. या पुरात ३५ जण वाहून गेल्याचे वृत्त असून नेपाळ प्रशासन त्यांची माहिती गोळा करत असल्याचे सांगण्यात येत आहे. हा पूर इतका प्रचंड होता की त्यात या...

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील तज्ज्ञांना आता मिळणार दरमहा पावणेपाच लाख!

केंद्र शासनाने जारी केलेल्या सुधारित भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकांनुसार तज्ज्ञांच्या कामगिरीचे निकष, आरोग्य संस्थांमधील त्यांची उपलब्धता व उपयोग आणि अंमलबजावणीतील अडचणी विचारात घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियानाने अभियानातील तज्ज्ञांसाठी कामगिरीआधारित मानधनाची सुधारित रचना निश्चित केली आहे. सुधारित रचनेनुसार पूर्णवेळ स्त्रीरोगतज्ज्ञ,...

आज व उद्या मुंबईतल्या काही इमारतीत वाजणार सायरन

नवी दिल्लीतल्या नागरी संरक्षण विभागाचे महासंचालकांच्या निर्देशानुसार दूरसंचार विकास केंद्र (सी-डॉट), सी-डॉट परिसर, मेहरौली, नवी दिल्ली येथील पथकाच्यावतीने मुंबईत प्रोटोटाइप सायरन उपकरणाची चाचणी आज आणि उद्या म्हणजेच ८ व ९ ऑक्टोबरला करण्यात येत आहे. बृहन्मुंबई शहरातील जुने सचिवालय, जोड...
Skip to content