Homeमाय व्हॉईसयावेळी डिसेंबरपर्यंत दाखल...

यावेळी डिसेंबरपर्यंत दाखल झाली 8 कोटींपेक्षा जास्त प्राप्तिकर विवरणपत्रं

दिनांक 31.12.2022पर्यंत दाखल 7.51 कोटी प्राप्तिकर विवरणपत्रांच्या तुलनेत मूल्यांकन वर्ष 2023-2024मध्ये 31.12.2023पर्यंत 8.18 कोटी विवरणपत्र दाखल झाल्याने प्राप्तिकर विभागाने प्राप्तिकर विवरणपत्र (आयटीआर) दाखल करून घेण्यात वाढ नोंदवत नवा विक्रम केला आहे. मूल्यांकन वर्ष  2022-23 मध्ये दाखल झालेल्या एकूण आयटीआर पेक्षा हे 9% जास्त आहे. या कालावधीत दाखल केलेल्या लेखापरीक्षण अहवाल आणि इतर फॉर्मची एकूण संख्या 1.60 कोटी आहे. मागील वर्षाच्या संबंधित कालावधीत 1.43 कोटी लेखापरीक्षण अहवाल आणि फॉर्म दाखल करण्यात आले होते.

असेदेखील दिसून आले आहे की मोठ्या संख्येने करदात्यांनी त्यांचे वार्षिक माहिती विवरण (एआयएस) आणि करदात्यांचा माहिती सारांश (टीआयएस) पाहून त्यांच्या आर्थिक व्यवहारांच्या डेटाची तुलना करून त्यांची विवरणपत्रे सादर केली आहेत. सर्व आयटीआरमध्ये डेटाचा एक महत्त्वपूर्ण भाग पगार, व्याज, लाभांश, वैयक्तिक माहिती, टीडीएस संबंधित माहितीसह करभरणा, भरपाई न झालेला तोटा, मॅट क्रेडिट इत्यादींशी संबंधित डेटाने भरलेला होता. या सुविधेचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला, परिणामी प्राप्तिकर विवरणपत्र सूरळीत आणि जलद दाखल झाली.

तसेच, या आर्थिक वर्ष 2023-2024दरम्यान, ओएलटीएएस देयक प्रणाली बदलून डिजिटल ई-पे करभरणा प्लॅटफॉर्म – टीआयएन 2.0 ई-फायलिंग पोर्टलवर पूर्णपणे कार्यान्वित करण्यात आला. यामुळे करांच्या ई-पेमेंटसाठी इंटरनेट बँकिंग, एनईएफटी/आरटीजीएस, ओटीसी, डेबिट कार्ड, पेमेंट गेटवे आणि यूपीआयसारखे वापरकर्ता-अनुकूल पर्याय सक्षम झाले. टीआयएन 2.0 प्लॅटफॉर्मने करदात्यांना करभरणा वेळेवर करण्यास सक्षम केले आहे ज्यामुळे आयटीआर दाखल करणे सोपे आणि जलद झाले आहे.

करदात्यांना त्यांचे आयटीआर आणि फॉर्म लवकर भरण्यास प्रोत्साहित करण्यासाठी, लक्ष्यित ई-मेल, एसएमएस आणि इतर सर्जनशील मोहिमांद्वारे 103.5 कोटींहून अधिक लोकांपर्यंत पोहोचता आले. अशा एकत्रित प्रयत्नांमुळे मूल्यांकन वर्ष 2023-24 च्या 31.12.2023पर्यंत 9% अधिक आयटीआर दाखल होत फलदायी परिणाम मिळाले. ई-फायलिंग हेल्पडेस्क चमूने सर्वाधिक आयटीआर दाखल होण्याच्या कालावधीत करदात्यांना सक्रियपणे पाठिंबा देत 31.12.2023 पर्यंत वर्षभरात करदात्यांच्या अंदाजे 27.37 लाख प्रश्नांची हाताळणी केली. इनबाउंड कॉल्स, आउटबाउंड कॉल्स, लाइव्ह चॅट्स, वेबएक्स आणि को-ब्राउझिंग सत्रांद्वारे करदात्यांना हेल्पडेस्ककडून सहाय्य प्रदान करण्यात आले. हेल्पडेस्क टीमने ऑनलाइन प्रतिसाद व्यवस्थापन (ओआरएम) द्वारे विभागाच्या एक्स (ट्विटर) हँडलवर प्राप्त झालेल्या प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी सक्रियपणे करदाते/ भागधारकांपर्यंत पोहोचून आणि त्यांना जवळपास रिअल-टाइम आधारावर विविध समस्यांसाठी मदत करून पाठबळ दिले.

प्राप्तिकर विभाग करदात्यांना विनंती करतो की, त्यांनी कोणतेही दूरगामी परिणाम टाळण्यासाठी प्राप्तिकर विवरणपत्र दाखल केल्यापासून 30 दिवसांच्या आत त्यांचे असत्यापित आयटीआर सत्यापित करावेत.

Continue reading

अखिलेश यादवचे बंधू प्रतिक यांचा संशयास्पद मृत्यू!

समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंग यादव यांचे लहान पुत्र तसेच समाजवादी पार्टीचे सध्याचे प्रमुख अखिलेश यादव यांचे लहान सावत्र बंधू प्रतिक यादव यांचे आज पहाटे वयाच्या ३८व्या वर्षी आकस्मिक निधन झाले. भारतीय जनता पार्टीच्या नेत्या...

जान्हवी मोरे स्मृती कॅरम स्पर्धेत स्वरा कदम, ओमकार वडर विजेते

डोंबिवली (पूर्व) येथील दत्तनगर उत्कर्ष मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय कॅरमपटू जान्हवी मोरे स्मृतिप्रीत्यर्थ १६ वर्षांखालील मुलां-मुलींच्या राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत अनुक्रमे कोल्हापूरच्या ओमकार वडर आणि रत्नागिरीच्या स्वरा कदमने विजेतेपदाचा मान मिळवला. शास्त्री हॉलमध्ये झालेल्या या स्पर्धेत ठाणे, मुंबई, मुंबई...

तृणमूलच्या विळख्यातून प. बंगाल बाहेर! आता कसोटी सुवेंधूंची!!

ममता बॅनर्जींचा पाठोपाठ दोन्ही विधानसभा निवडणुकीत सलग दोन वेळा पराभव करून देशात जायंट किलर ठरलेले सुवेंधू अधिकारी यांनी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून रविवारी शपथ घेतली आणि राज्यात नव्या पर्वाला सुरूवात झाली. ममता बॅनर्जीच्या पंधरा वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत सतत हिंसाचार,...
Skip to content