Homeकल्चर +पार्ले महोत्सवात वरिष्ठ...

पार्ले महोत्सवात वरिष्ठ नागरिकांनीही जिंकली रसिकांची मने!

पार्ले महोत्सवामध्ये क्रीडा स्पर्धांमध्ये जशी चुरस दिसून येत आहे तशीच गायनाच्या स्पर्धांनीही रसिकांनी मने जिंकली. यात विशेषतः वरिष्ठ नागरिकांचा सहभाग लक्षणीय ठरला. ६० वर्षांवरील गटात सुहास कुलकर्णी तर ७५ वर्षांवरील वयोगटात विश्वास डोंगरे, कांचन गुप्ते, जगदीश मुदलीयार, अरुण मानसाबदार यांनी बाजी मारत रसिकांवर आपल्या गायनाची भुरळ पाडली.

लहानांपासून ते  वरिष्ठ नागरिकांपर्यंत मिळणारा प्रतिसाद, त्यांचा सहभाग भरघोस असून त्यांना पार्ले महोत्सवाचे मिळालेले व्यासपीठ हे अत्यंत समाधानाची बाब आहे. महोत्सवात सर्व वयोगटांचा सहभाग त्यामुळे अधोरेखित होत असून हा त्यांचाच महोत्सव असल्याचे महोत्सवाचे मुख्य आयोजक आमदार पराग अळवणी यांनी सांगितले.

विविध गटातील गायन स्पर्धेतील निकाल- पहिले तीन विजेते–

वयोगट ५ ते १० वर्षे – मराठी गायन – तनिषा रेगे, योगिनी सामंत, अर्नेश खऱे. हिंदी गायन – योगिनी सामंत, अर्भी भालेराव, आरव संगोई.

वयोगट ११ ते १६ वर्षे – मराठी गायन – हर्षवर्धन गोरे, अमृती धुमे, मधुरा माशनकर, हिंदी गायन – अमृता धुमे, हर्षवर्धन गोरे, मधुरा माशनकर. उत्तेजनार्थ – सृष्टी शर्मा आणि अथर्व जोशी

वयोगट १७ ते ३० वर्षे – मराठी गायन – गौरी मिश्रा, सायरी गद्रे, चिन्मय काळे, हिंदी गायन – गौरी मिश्रा, चिन्मय काळे, सायली गद्रे

वयोगट ३१ ते ४५ वर्षे – मराठी गायन – अजय दाते, विनायक कुलकर्णी,

हिंदी गायन – अजय दाते, अद्वैत नेने, रिना बागवे,

वयोगट ४६ ते ५९ वर्षे – मराठी गायन – नूतन बापट, दीपा शिरोडकर, मनिष शिरोडकर, हिंदी गायन – दीपा शिरोडकर, मनिष शिरोडकर, संदीप गोगटे,

वयोगट ६० ते ७४ वर्षे – विजेते सुहास कुलकर्णी, वयोगट ७५ वर्षांवरील – मराठी गायन – विश्वास डोंगरे, कांचन गुप्ते, हिंदी गायन – जगदीश मुदलीयार, अरुण मानसाबदार.

स्पर्धेचे परीक्षण अर्चना गोरे, अश्विनी शेंड्ये, प्राजक्ता रानडे, मंदार आपटे, ऋषिकेश कामेरकर यांनी केले.

दरम्यान कराओके स्पर्धेलाही गायकांचा विशेष प्रतिसाद मिळाला. या स्पर्धा महिला आणि पुरुष गटात झाल्या. त्यातील विजेते असे –

पुरुष गट – प्रथम – चिन्मय काळे, द्वितीय – आदित्य तांबुस्कर, तृतीय – सतीश धुरी, उत्तेजनार्थ – मनिष शिरोडकर,

महिला गट – प्रथम – गौरी मिश्रा, द्वितीय – आस्था हळदणकर, तृतीय – सृष्टी शर्मा, उत्तेजनार्थ – विद्या आईल.

दुहेरी गटातील विजेते – गौरी मिश्रा आणि अजय दाते, दिपा शिरोडकर आणि मनिष शिरोडकर. विशेष प्रोत्साहन पुरस्कार – धनुष यादव, गीता खानोलकर, कांचन गुप्ते, सर्वोत्कृष्ट सादरीकरण – सायली गद्रे.

या स्पर्धेचे परीक्षण चिंतामणी सोहोनी, जयंत पिंगुळकर, मधुरा देशपांडे यांनी केले.

Continue reading

तुतीकोरिन बंदरात 5 कोटींचे चिनी फटाके जप्त!

दीपावलीपूर्वी फटाक्यांची बेकायदेशीर आयात रोखण्याच्या प्रयत्नात करण्यात आलेल्या कारवाईत, महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) 'ऑपरेशन फायर ट्रेल' या मोहिमेत, तुतीकोरिन बंदरात चाळीस फुटाचे दोन कंटेनर पकडले. या कंटेनरमध्ये 83,520 चिनी फटाके असल्याचे आढळून आले. अभियांत्रिकी वस्तू म्हणून ते पाठवण्यात येत होते. जप्त करण्यात आलेल्या मालाची...

महाराष्ट्रात भरदिवाळीत अवकाळी पावसाची शक्यता

भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) दिलेल्या माहितीनुसार, आग्नेय अरबी समुद्र आणि केरळ-कर्नाटक किनाऱ्यावरील लक्षद्वीप क्षेत्रात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले आहे. पुढील 24 तासांत ते पश्चिम-वायव्येकडे म्हणजेच बंगालच्या उपसागरावर सरकण्याची आणि कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतरित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रात...

मुंबईच्या समुद्रात लवकरच दिसणार कॅन्डेलाची बोट!

स्वीडनमध्ये जलवाहतुकीसाठी वापरण्यात येणारी पी १२ ही बोट लवकरच मुंबईत दाखल होणार असून, त्यामुळे राज्यातील जलवाहतुकीच्या क्षेत्रात आधुनिकतेचा नवा अध्याय सुरू होणार असल्याची माहिती महाराष्ट्राचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी दिली. नितेश राणे नुकतेच स्वीडनच्या दौऱ्यावर...
Skip to content