Homeपब्लिक फिगरसोनू निगम यांना...

सोनू निगम यांना यंदाचा मोहम्मद रफी पुरस्कार

सत्तरीच्या दशकात आपल्या गीतांनी प्रेक्षकांना वेड लावणाऱ्या गीतकार संतोष आनंद यांना यावर्षीचा मोहम्मद रफी जीवनगौरव पुरस्कार तर तीन दशकांच्या कारकिर्दीत हिंदीसह अनेक भाषांमध्ये ५ हजारांहून अधिक गाण्यांना आवाज देणाऱ्या ख्यातनाम गायक सोनू निगम यांना मोहम्मद रफी पुरस्कार २०२३ देण्यात येणार असल्याची घोषणा मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड. आशिष शेलार यांनी आज केली.

मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड. आशिष शेलार यांच्या स्पंदन या संस्थेतर्फे मोहम्मद रफी यांच्या वाढदिवसादिवशी त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी एका संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ कलावंताला जीवन गौरव व  मोहम्मद रफी पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. पुरस्काराचे हे 17वे वर्ष असून एक लाख रू धनादेश, स्मृतीचिन्ह आणि शाल श्रीफळ असे जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप असून, ५१ हजार रू. रोख आणि मानचिन्ह असे रफी पुरस्काराचे स्वरूप आहे.

मोहम्मद रफी यांचे कुटुंबीय आमदार ॲड. आशिष शेलार यांच्या वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघात वास्तव्यास असून त्यांच्या उपस्थितीत दरवर्षी हा पुरस्काराचा शानदार सोहळा रंगशारदा येथे पार पडतो.  मोहम्मद रफी यांच्या सोबत काम केलेल्या अनेक मान्यवरांना या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आल्याने उत्तरोत्तर या पुरस्काराची प्रतिष्ठा वाढत गेली. यावर्षी गीतकार संतोष आनंद आणि गायक सोनू निगम यांना पुरस्कार जाहीर करताना आपल्याला आनंद होतो आहे, असे सांगताना आमदार ॲड. आशिष शेलार म्हणाले की, कितीतरी अर्थपूर्ण आणि सुपरहिट गाणी लिहिणारे आणि  त्याकाळी नावाजलेले दोन फिल्मफेअर आणि प्रतिष्ठित यश भारती अवॉर्ड्स जिंकणारे  गीतकार संतोष आनंद यांचा प्रवास अत्यंत हृदयस्पर्शी आहे. त्यांना मोहम्मद रफी जीवनगौरव पुरस्काराने आणि उमदा गायक सोनू निगम यांना मोहम्मद रफी पुरस्काराने सन्मानित करण्यात आम्हाला अतिशय आनंद होत आहे. रफी साहेबांचा 99वा वाढदिवस. असून त्यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरु होत आहे या निमित्ताने या पुरस्काराचे एक वेगळे महत्त्व आहे.

वांद्रे पश्चिम रंगशारदा येथे २४ डिसेंबर रोजी दरवर्षी प्रमाणे हा पुरस्कार वितरण सोहळा संध्याकाळी ६.०० वा. सुरू होणार आहे. यावेळी प्रसाद महाडकर यांच्या जीवनगाणीतर्फे “फिर रफी” या बहारदार मैफिलीत ख्यातनाम गायक श्रीकांत नारायण हे मोहम्मह रफी यांची अजरामर गाणी सादर करणार आहेत. या कार्यक्रमाचे निवेदन संदीप कोकीळ करणार आहेत. हा कार्यक्रम विनामूल्य असून त्याच्या प्रवेशिका आमदार ॲड. आशिष शेलार यांच्या कार्यालयात उपलब्ध आहेत.  

यापूर्वी संगीतकार आनंदजी, गायक अमीत कुमार यांच्यासह ज्येष्ठ गायिका आशा भोसले, सुरेश वाडकर, शमशाद बेगम, संगीतकार रवी, शैलेंद्र सिंग, नौशाद अली, पॅरेलाल, सुमन कल्याणपूर, अनुराधा पौडवाल, खय्याम, संगीतकार उषा खन्ना, गायक उदित नारायण या मान्यवर कलावंतासह ख्यातनाम निवेदक अमिन सयानी यांनांही या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

Continue reading

नेपाळमध्ये पुन्हा महापूर! ३५ जण बेपत्ता!!

नेपाळच्या आज सकाळी बूढी गंडकी नदीला आलेल्या महापूरामुळे गोरखा जिल्ह्याला तडाखा बसल्याचे समजते. या पुरात ३५ जण वाहून गेल्याचे वृत्त असून नेपाळ प्रशासन त्यांची माहिती गोळा करत असल्याचे सांगण्यात येत आहे. हा पूर इतका प्रचंड होता की त्यात या...

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील तज्ज्ञांना आता मिळणार दरमहा पावणेपाच लाख!

केंद्र शासनाने जारी केलेल्या सुधारित भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकांनुसार तज्ज्ञांच्या कामगिरीचे निकष, आरोग्य संस्थांमधील त्यांची उपलब्धता व उपयोग आणि अंमलबजावणीतील अडचणी विचारात घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियानाने अभियानातील तज्ज्ञांसाठी कामगिरीआधारित मानधनाची सुधारित रचना निश्चित केली आहे. सुधारित रचनेनुसार पूर्णवेळ स्त्रीरोगतज्ज्ञ,...

आज व उद्या मुंबईतल्या काही इमारतीत वाजणार सायरन

नवी दिल्लीतल्या नागरी संरक्षण विभागाचे महासंचालकांच्या निर्देशानुसार दूरसंचार विकास केंद्र (सी-डॉट), सी-डॉट परिसर, मेहरौली, नवी दिल्ली येथील पथकाच्यावतीने मुंबईत प्रोटोटाइप सायरन उपकरणाची चाचणी आज आणि उद्या म्हणजेच ८ व ९ ऑक्टोबरला करण्यात येत आहे. बृहन्मुंबई शहरातील जुने सचिवालय, जोड...
Skip to content