Homeमाय व्हॉईसभुजबळांनी सिद्ध केले,...

भुजबळांनी सिद्ध केले, ते आहेत चँम्पियन ऑफ ओबीसी कॉज!

महाराष्ट्राचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी तब्बल चाळीस मिनिटांचे भाषण करून मराठा आरक्षण देतानाच ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये, ही मागणी आज विधानसभेत केली. ती करताना मराठा समाजाला सरकारमध्ये, नोकऱ्यांमध्ये पुरेसे प्रतिनिधित्व मिळाल्याचेही आकडेवारीनिशी मांडले. बीडमध्ये आमदारांची घरे पेटवली जात असताना तुम्ही गेला असतात, तर मला बरे वाटले असते, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना सांगत छगन भुजबळांनी सिद्ध केले, ते आहेत चँम्पियन ऑफ ओबीसी कॉज…

भुजबळ यांनी चव्हाण यांना काही प्रश्न विचारले. मनोज जरांगे पाटील यांना कोणालाही गावबंदी करू नका, हे सांगायला गेलात का… नाही. भुजबळांना सातत्याने धमकावले जात असताना असे करू नका, हे तुम्ही जरांगे यांना सांगितलेत का… नाही. अमुक तारखेपर्यंत आरक्षण द्या, असे सरकारला धमकावू नका, असे जरांगे पाटील यांना सांगायला गेलात का… नाही. समाजात दहशत माजवू नका, जाळपोळ करू नका, हे सांगायला तुम्ही गेलात का… नाही.

चँम्पियन

सारथी, या मराठा समाजातील तरुणांना शिष्यृत्तीसह विविध उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी स्थापित संस्थेला राज्यात विविध शहरात एक रुपया लीजने जमिनी देऊन इमारती उभ्या केल्या जात आहेत. पण, महाज्योती संस्थेला जागा दिल्या जात नाहीत. महाराष्ट्रात सर्वाधिक संख्येने मुख्यमंत्री मराठा समाजातील झाले आणि त्यांचेच महाराष्ट्राच्या राजकारणातही वर्चस्व आहे, याकडेही भुजबळ यांनी लक्ष वेधले.

रानडुकरांचे करावे फ्यामिली प्लानिंग

भटक्या कुत्र्यांपासून होणाऱ्या त्रासाचा मुद्दा आमदार मनीषा चौधरी यांनी औचित्त्याच्या मुद्द्याद्वारे बुधवारी विधानसभेत उपस्थित केला. त्यांच्या मतदारसंघात मोकाट कुत्र्यांच्या त्रासामुळे अनेक रहिवासी त्रस्त झाले आहेत, असे सांगून त्या म्हणाल्या की, प्राण्यांबद्दल काम करणाऱ्या संस्थांना इतका कळवळा असेल तर त्यांनी आपल्या घरी या मोकाट कुत्र्यांना पाळावे. रानडुकरे आणि इतर जंगली प्राणी हरभरा पिकांचे नुकसान करत असून या जनावरांचे फँमिली प्लानिंग करावे, अशी मागणी हरीश पिंपळे यांनी केली.

Continue reading

मुख्यमंत्री फडणवीस यांनी रोहित पवारांना सुनावले!

महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघातामध्ये घातपात असला तर त्यात दोषी असलेल्या व्यक्तीला कोणत्याही थराला जाऊन दंडित करू, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत घोषणा केली आणि रोहित पवार यांच्या सर्व आरोपांना सविस्तर उत्तर दिले. अजित पवार...

आदित्य ठाकरेंना नितेश राणे देणार कोल्ड कॉफी!

नारायण राणे आणि त्यांचे मंत्री असलेले चिरंजीव नितेश राणे, हे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर कडवट शब्दात टीका करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. पण, विधानसभेत मंगळवारी कोकणाच्या प्रश्नांवरील चर्चेला उत्तर देताना नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांचे नाव घेत आदरयुक्त उल्लेख...

औचित्त्याची ऐशीतैशी…

मराठी भाषेमध्ये एखाद्या गोष्टीचे औचित्त्य काय आहे, असे विचारताना औचित्त्य, या शब्दाचा अर्थ माहीत असणे अभिप्रेत असते. राज्याच्या विधानसभेत कामकाज केले जाताना औचित्त्याचे मुद्दे म्हणून काही बाबी आमदारांना उपस्थित करता येतात आणि सरकारने त्यावर उचित कार्यवाही करणेही अपेक्षित असते....
Skip to content