Homeहेल्थ इज वेल्थराज्यातल्या सर्व सरकारी...

राज्यातल्या सर्व सरकारी रक्तपेढ्यांमध्ये अलिकॉट मशिन!

राज्यातील सर्व ३१ सरकारी रक्तपेढ्यांमधे रक्ताच्या लहान पिशव्या तयार करणारे अलिकॉट मशिन बसण्यात येईल, अशी घोषणा आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी बुधवारी विधानसभेत केली. आमदार आशिष शेलार यांच्यासह अनेक आमदारांनी या संदर्भातील प्रश्न प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला होता.

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या ३१पैकी केळ ८ रक्तपेढ्यांमधे सध्या हे मशिन उपलब्ध आहे. तसेच, वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अखत्यारितील १४ रुग्णालयांपैकी केवळ तीन ठिकाणी हे मशिन उपलब्ध आहे, याकडे शेलार यांनी लक्ष वेधले होते. त्यावर उत्तर देताना मंत्री सावंत यांनी ही घोषणा केली. तसेच, सर्व रक्तपेढ्यांमधे मशिन बसवण्यासाठी लागणारी आर्थिक तरतूदही केली जाईल, अशी घोषणाही त्यांनी केली.

१० वर्षे जुन्या फाइलचे ट्रॅकिंग

देवयानी फरांदे यांनी त्यांच्या मतदारसंघातील रुग्णालयाचा प्रश्न उपस्थित करताना २०१३पासून प्रश्न प्रलंबित आहे, याकडे लक्ष वेधले. तसेच, या फाईलवर कोणता अधिकारी बसून होता, याची माहिती सभागृहाला देऊन त्याच्यावर कारवाई करणार का, असे विचारले. त्यावर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी या फाईलचा प्रवास २०१३पासूनचा आहे. त्यामुळे ती फाईल ट्रॅक करून त्याबद्दलची कारवाई केली जाईल, इतकेच उत्तर दिले.

अलिकॉट

मुंबईत ड्रग्जविक्रेत्यांचा सुळसुळाट

सुनील प्रभू यांनी मुंबई शहरामध्ये वाढत असलेल्या अंमली पदार्थाच्या, ड्रग्जच्या वाढत्या विक्रीबद्दलचा मुद्दा औचित्त्याच्या मुद्याद्वारे उपस्थित केला. हे ड्रगविक्रेते आणि त्यात सामील लोकांना पोलिसांची अजिबात भीती वाटत नाही आणि त्यांच्या जाचातून जनतेला मुक्त करण्यासाठी चोवीस तासात कारवाई करावी, अशी मागणी प्रभू यांनी केली. अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सरकारला या विषयाची गंभीर दखल घेण्याचे निर्देश दिले.

जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवरील तलावामध्ये हजारो मासे मृत होऊन दुर्गंधी पसरली आहे, याकडे रवींद्र वायकर यांनी लक्ष वेधले. दोन-तीन दिवसांपासून मासे मृत झाल्याने ही घाण काढण्याचे निर्देश दिले जावेत, अशी मागणी वायकर यांनी केली.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content