Homeएनसर्कलट्रक केबिनमध्ये एअर...

ट्रक केबिनमध्ये एअर कंडिशन सिस्टम अनिवार्य!

दिनांक 1 ऑक्टोबर 2025पासून निर्मित एन 2 आणि एन 3 श्रेणीच्या मोटर वाहनांच्या केबिन्समध्ये एअर कंडिशन सिस्टम स्थापित करणे बंधनकारक करण्यासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने नुकतीच एक अधिसूचना जारी केली आहे.

वातानुकूलन यंत्रणेसह स्थापित केबिनची चाचणी, वेळोवेळी सुधारणा करण्यात आलेल्या IS 14618: 2022, नुसार होईल.

अधिसूचनेनुसार 1 ऑक्टोबर, 2025 रोजी किंवा नंतर एन 2 आणि एन 3 श्रेणीचे कोणतेही ड्राइव-अवे चेसिस (अपूर्ण स्वरूपातील इंजिन क्षमता 25 सीसी असलेले वाहन) स्वरूपात उत्पादित केलेल्या वाहनात, उत्पादक IS 14618:2022 नुसार वातानुकूलन प्रणालीचा मंजूर संचाचा प्रकार पुरवेल.

वाहतूक मंत्रालयाने 10 जुलै  2023 रोजी मसुदा अधिसूचना जारी करून संबंधितांकडून सूचना मागवल्या होत्या.

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content