Sunday, September 8, 2024
Homeडेली पल्सनक्षलवादी हिंसाचाराच्या घटनांमध्ये...

नक्षलवादी हिंसाचाराच्या घटनांमध्ये गेल्या 4 वर्षांत 36%ने घट!

नक्षली हिंसाचाराच्या घटनांमध्ये वर्ष 2018च्या आकडेवारीच्या तुलनेत 2022मध्ये 36%ची लक्षणीय घट झाली आहे. नक्षलवादी हिंसाचारात मृत्युमुखी पडणाऱ्या सुरक्षा दल आणि नागरिकांच्या संख्येत 59% घट झाली आहे. गृहराज्यमंत्री  नित्यानंद राय यांनी काल लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.

नक्षली हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्या नागरीक / सुरक्षा दलातील व्यक्ती यांच्या कुटुंबाला सानुग्रह मदत, सुरक्षा दलांचे प्रशिक्षण आणि कार्यान्वयन गरजा, आत्मसर्पण केलेल्या एलडब्ल्यूई कॅडरचे पुनर्वसन, समुदाय स्तरावर पहारा, सुरक्षा दलातील कर्मचारी/नागरिकांना नक्षल्यांनी केलेल्या मालमत्तेच्या नुकसानीसाठी भरपाई, इत्यादी अंतर्गत नक्षलग्रस्त राज्यांना, क्षमतावृद्धीसाठी, सुरक्षा संबंधित खर्च (एसआरई) योजनेंतर्गत निधी दिला जातो. योजनेंतर्गत वर्ष 2018-19पासून नक्षलग्रस्त राज्यांना 1648.23 कोटी रुपये जारी करण्यात आले आहेत.

भारतीय राज्यघटनेच्या सातव्या अनुसूचीनुसार पोलीस आणि सार्वजनिक सुव्यवस्था हे विषय राज्य सरकारांकडे आहेत. तथापि नक्षलवादाने ग्रस्त राज्यांना त्यांच्या प्रयत्नांमध्ये भारत सरकार साहाय्य करते. नक्षली समस्येचे (एलडब्ल्यूई) समग्रपणे निराकरण करण्यासाठी, वर्ष 2015मध्ये राष्ट्रीय धोरण आणि कृती आराखडा मंजूर करण्यात आला. त्यात सुरक्षा संबंधित उपाय, विकास उपक्रम, स्थानिक समुदायांचे अधिकार आणि हक्क सुनिश्चित करणे इत्यादींचा समावेश असलेल्या बहुआयामी धोरणाची संकल्पना आहे.

सुरक्षेसंदर्भात केंद्र सरकार नक्षलवादाने ग्रस्त राज्य सरकारांना केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या बटालियन, प्रशिक्षण आणि सुरक्षा संबधी खर्च (एसआरई) आणि विशेष पायाभूत सुविधा योजना, यासारख्या योजनांच्या माध्यमातून निधीची तरतूद, राज्य पोलीस दलांच्या आधुनिकीकरणासाठी निधी, साधने आणि शस्त्रे, गुप्त माहितीचे आदानप्रदान, सुसज्ज पोलीस ठाण्यांचे बांधकाम अशा प्रकारचे साहाय्य करते. विकासाच्या संदर्भात, केंद्र सरकारने नक्षलग्रस्त भागात रस्ते बांधणे, मोबाईल टॉवर्स बसवणे, बँका, पोस्ट ऑफिसचे जाळे वाढवणे, आरोग्य आणि शिक्षण सुविधा यासह विविध उपाययोजना हाती घेतल्या.

विकासासंदर्भात, भारत सरकारच्या  प्रमुख योजनांसोबतच, नक्षल प्रभावित राज्यांमध्ये रस्त्यांच्या जाळ्याचा विस्तार, दूरसंचार कनेक्टिव्हिटी सुधारणे, कौशल्य विकास आणि आर्थिक समावेशन यावर विशेष भर देऊन अनेक विशिष्ट उपक्रम हाती घेण्यात आले आहेत.

Parameter/Year20182019202020212022Decrease in 2022 in comparison to 2018
Incidents(All LWE Affected States)833670665361*413*36%
148**118**
Chhattisgarh392263315188*246*22%
67**59**
Deaths(All LWE Affected States)2402021831479859%
(Civilians & Security Forces)Chhattisgarh153771111016160%

* डाव्या विचारसरणीच्या अतिरेक्यांनी घडवलेल्या घटना

** सुरक्षा दलांनी सुरू केलेल्या कारवाईच्या घटना

Continue reading

परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्राची बाजी!

गेले दोन वर्षं सातत्याने परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात क्रमांक 1वर असलेल्या महाराष्ट्रात 2024-2025, या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतसुद्धा सर्वाधिक गुंतवणूक आली आहे. एप्रिल ते जून 2024 या पहिल्या तिमाहीत एकूण 70,795 कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे. थोडक्यात सांगायचे...

उद्यापासून श्री गणेशोत्सव!

उद्यापासून गणेशोत्सव! गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या वातावरणामुळे भाविकांमध्ये आंनद आणि उत्साह संचारतो. श्री गणेशचतुर्थी हा हिंदूंचा मोठा सण आहे. श्री गणेश चतुर्थीला, तसेच श्री गणेशोत्सवाच्या दिवसांत गणेशतत्त्व नेहमीच्या...

अनुराधा पौडवाल यांची नवी भक्तीमय स्वरभेट अर्पण!

गणेशोत्सवाचे औचित्य साधून आदि शंकराचार्य रचित ‘गणेश पंचरत्न’ या गणपतीच्या श्लोककाव्याची स्वरभेट लोकप्रिय ज्येष्ठ पार्श्वगायिका पद्मश्री डॉ. अनुराधा पौडवाल यांनी कोट्यवधी भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या मुंबईतील श्री सिध्दीविनायक मंदिरात मंगळवारी सकाळी श्रींच्या चरणी अर्पण केली. श्री सिध्दीविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकर,...
error: Content is protected !!
Skip to content