Homeएनसर्कलइंडिया इंटरनेट गव्हर्नन्स...

इंडिया इंटरनेट गव्हर्नन्स फोरमची आज दिल्लीत बैठक

इंटरनेट गव्हर्नन्स फोरम (IGF) हा विविध हितधारकांचा समावेश असलेला एक मंच आहे, जो इंटरनेटशी संबंधित सार्वजनिक धोरणाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी  विविध गटांच्या प्रतिनिधींना एकत्र आणतो. इंडिया इंटरनेट गव्हर्नन्स फोरम 2023 (IIGF-2023) चे आयोजन प्रत्यक्ष आणि आभासी अशा दोन्ही माध्यमातून आज नवी दिल्लीतील प्रगती मैदान स्थित भारत मंडपम येथे होत आहे.

इंटरनेट

भारतासाठी एक सुरक्षित, विश्वासार्ह आणि लवचिक सायबर स्पेस उभारणे, भारताच्या विकासात्मक उद्दिष्टांसाठी नवोन्मेषाला चालना देणे, डिजिटल दरी दूर करणे आणि जागतिक डिजिटल प्रशासन आणि सहकार्यासाठी नेतृत्त्व यावरील भारताचा डिजिटल अजेंडा निश्चित करणे आदी मुद्द्यांचा सखोल अभ्यास करण्याचा हा एक प्रयत्न आहे. 2021 आणि 2022 मध्ये आयआयजीएफच्या पहिल्या दोन आवृत्त्या यशस्वीपणे आयोजित केल्यानंतर, आयआयजीएफची तिसरी आवृत्ती “मूव्हिंग फॉरवर्ड – कॅलिब्रेटिंग इंडियाज डिजिटल अजेंडा” या व्यापक संकल्पनेअंतर्गत आयोजित केली जात आहे.

सकाळी होणाऱ्या उदघाटन सत्राला  इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर उपस्थित राहणार आहेत.

इंडिया इंटरनेट गव्हर्नन्स फोरम हा संयुक्त राष्ट्र इंटरनेट गव्हर्नन्स फोरम (UN IGF) शी संबंधित उपक्रम आहे. इंटरनेट गव्हर्नन्स फोरम हा विविध हितधारकांचा समावेश असलेला एक मंच आहे जो इंटरनेटशी संबंधित सार्वजनिक धोरणाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी विविध गटांच्या प्रतिनिधींना एकत्र आणतो. 

इंटरनेट संधी अधिकाधिक प्रमाणात कशा वाढवायच्या आणि त्यातील संभाव्य धोके आणि आव्हानांना कसे सामोरे जायचे याबद्दल आयजीएफ सर्वांना अवगत करते. संयुक्त राष्ट्र इंटरनेट गव्हर्नन्स फोरमची भारतीय आवृत्ती इंडिया जीएफ किंवा आयआयजीएफ https://www.indiaigf.in. ची स्थापना 2021मध्ये करण्यात आली आणि त्याला सरकार, नागरी संस्था, उद्योग, तांत्रिक समुदाय, विचारवंत, उद्योग संघ यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विविध 14-सदस्यीय हितधारक समितीचा पाठिंबा आहे.

Continue reading

रोहिणी हट्टंगडी यांना भारताबाहेरचा पहिला पुरस्कार!

महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने आयोजित तिसऱ्या नाफा मराठी चित्रपट महोत्सव २०२६ची सुरुवात हॉलिवूडच्या ग्लॅमरला साजेशा दिमाखदार रेड कार्पेट सोहळ्याने झाली. कॅमेऱ्यांच्या लखलखत्या फ्लॅशमध्ये मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज तारे-तारकांच्या शानदार आगमनाने सॅन होजेतील वातावरण मराठमोळ्या उत्साहाने भारून गेले. या सोहळ्यात हिंदी-मराठी चित्रपटसृष्टी...

मुंबईत पालिका सुविधा केंद्रात जन्म-मृत्यू नोंदणीसाठी स्वतंत्र खिडकी

मुंबई महापालिका क्षेत्रातील जन्म व मृत्यूंची नोंदणी करण्यासाठी तसेच नोंदणीकृत जन्म व मृत्यू प्रमाणपत्रांतील आवश्यक दुरुस्त्या करण्यासाठी पालिकेच्या सर्व विभागीय कार्यालयातल्या नागरी सुविधा केंद्राच्या ठिकाणी स्वतंत्र खिडकी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. नागरिक सेवा केंद्रात ऑनलाईन सेवा विभागस्तरावर जन्म...

‘माझ्या सोन्या’तली अभिनेत्री ऐश्वर्या नक्की आहे तरी कोण?

मराठी आणि हिंदी मनोरंजनसृष्टीत वेगाने आपली ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्री, निर्माती आणि डिजिटल कंटेंट क्रिएटर ऐश्वर्या हरिशंकर सध्या चांगल्याच चर्चेत आहे. अमेरिकेतील डेट्रॉईट (मिशिगन) येथे जन्मलेल्या आणि पुण्यात वाढलेल्या ऐश्वर्याने अवघ्या २१व्या वर्षी अभिनय, चित्रपट निर्मिती आणि सोशल मीडिया...
Skip to content