Homeबॅक पेजहाऊसिंगडॉटकॉम करणार इझीलोनमध्‍ये...

हाऊसिंगडॉटकॉम करणार इझीलोनमध्‍ये गुंतवणूक!

हाऊसिंगडॉटकॉम या भारतातील अग्रगण्‍य डिजिटल रिअल इस्‍टेट प्‍लॅटफॉर्मने गृहकर्ज प्रवासाचे डिजिटायझेशन करण्‍यावर लक्ष केंद्रित करणारी फिनटेक स्‍टार्ट-अप इझीलोनमध्‍ये धोरणात्‍मक गुंतवणूक करण्‍याचे ठरवले आहे. विशिष्‍ट गुंतवणूक रक्‍कमेबाबत अद्याप खुलासा करण्‍यात आला नसला तरी या सहयोगाचा भारतातील सर्वात मोठा डिजिटल गृहकर्ज उत्‍पत्ती प्‍लॅटफॉर्म निर्माण करण्‍याकरिता हाऊसिंगडॉटकॉमच्‍या योजनांसाठी पाया रचण्‍याचा मनसुबा आहे.

हाऊसिंग

हाऊसिंगडॉटकॉम या भारतातील अग्रगण्‍य डिजिटल रिअल इस्‍टेट प्‍लॅटफॉर्मने गृहकर्ज प्रवासाचे डिजिटायझेशन करण्‍यावर लक्ष केंद्रित करणारी फिनटेक स्‍टार्ट-अप इझीलोन मध्‍ये धोरणात्‍मक गुंतवणूक करण्‍याचे ठरवले आहे. विशिष्‍ट गुंतवणूक रक्‍कमेबाबत अद्याप खुलासा करण्‍यात आला नसला तरी या सहयोगाचा भारतातील सर्वात मोठा डिजिटल गृहकर्ज उत्‍पत्ती प्‍लॅटफॉर्म निर्माण करण्‍याकरिता हाऊसिंगडॉटकॉमच्‍या योजनांसाठी पाया रचण्‍याचा मनसुबा आहे.

हाऊसिंगडॉटकॉम, प्रोपटायगरडॉटकॉम व मकानडॉटकॉमचे ग्रुप सीईओ ध्रुव अग्रवाल म्‍हणाले की, हाऊसिंगडॉटकॉम ग्राहकांना रिअल इस्‍टेट सेवांची व्‍यापक श्रेणी प्रदान करण्‍याप्रती कटिबद्ध आहे आणि इझीलोनसोबतचा हा सहयोग त्‍या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल आहे. तारण डिजिटल रिअल इस्‍टेट क्षेत्रात ऑर्गनिक विस्‍तारीकरण आहेत, ज्‍याला आमच्‍या व्‍यासपीठावर असलेल्‍या व्‍यापक प्रमाणातील ग्राहकवर्गाचे पाठबळ आहे.

ते पुढे म्‍हणाले, तंत्रज्ञान सुधारणा आणि भारत सरकारची कर्ज विभागात डिजिटायझेशनप्रती कटिबद्धता आगामी वर्षांमध्‍ये गृहकर्ज क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणतील. आम्‍ही या क्रांतीमध्‍ये अग्रस्‍थानी असण्‍याप्रती कटिबद्ध आहोत.

हा सहयोग हाऊसिंगडॉटकॉमच्‍या बाजारपेठ-अग्रणी डिजिटल उपस्थितीचा फायदा घेण्‍यासाठी, तसेच ब्रोकर्स व विकासकांच्‍या त्‍यांच्‍या प्रख्‍यात नेटवर्कपर्यंत तारण उत्‍पादनांची पोहोच वाढवण्‍यासाठी करण्‍यात आला आहे. कंपनीने निवेदनामध्‍ये म्‍हटले की, हा सहयोग आमच्‍या विक्रेता ग्राहकांसाठी मूल्‍याची भर करण्‍यासोबत आमच्‍या व्‍यासपीठावर वापरकर्त्‍यांचा सहभाग देखील वाढवतो, तसेच महसूल निर्मितीमध्‍ये वाढ करण्‍यासाठी मार्गदर्शन करतो.

Continue reading

इराणचे प्रमुख खामेनेई ठार, पुत्र मोजतबा उत्तराधिकारी!

गेल्या काही दिवसांपासून तोंडी असलेला अमेरिका-इराण संघर्ष आता प्रत्यक्षात उतरला. काल सकाळी अमेरिका आणि इस्त्रायलने संयुक्त कारवाई करत इराणच्या सर्व प्रमुख ठिकाणांवर बॉम्बहल्ले केले. इराणच्या सहा शहरांवर हल्ले करण्यात आले. यात इराणचे प्रमुख नेते तसेच परमाणू केंद्रांना लक्ष्य करण्यात...

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...
Skip to content