Homeएनसर्कलस्‍लोवाकियासाठी व्हिसा हवाय?

स्‍लोवाकियासाठी व्हिसा हवाय?

बीएलएस इंटरनॅशनल सर्विसेस लि., या सरकारी व राजनयिक मिशन्‍ससाठी आऊटसोर्सिंग सेवांमध्‍ये अग्रेसर असलेल्या कंपनीने स्‍लोवाकियासाठी १८ देशांमधील ५४हून अधिक कार्यालयांसह विशेष ग्‍लोबल व्हिसा आऊटसोर्सिंग करारावर नुकतीच स्‍वाक्षरी केली आहे. इंडस्‍ट्री डेटानुसार २०२१मध्‍ये २.६४ दशलक्ष पर्यटकांनी स्‍लोवाकियाला भेट दिली आणि ट्रॅव्‍हल ट्रेण्‍ड्सनुसार ही आकडेवारी वाढण्‍याची अपेक्षा आहे.

बीएलएस इंटरनॅशनलच्‍या अपवादात्‍मक व्हिसा सेवा प्रदान करण्‍यामधील व्‍यापक अनुभवाने कंपनीला शेंगेन सदस्‍य देशांसोबत काम करण्‍याचा सन्‍मान मिळाला आहे. या नवीन करारासह बीएलएस इंटरनॅशनलला टूरिस्‍ट व बिझनेस व्हिसा सेवा यांच्‍यासह राष्‍ट्रीय व्हिसा सेवा प्रदान करण्‍याचीदेखील जबाबदारी देण्‍यात येईल. त्यामागे एकसंधी प्रवास व इमिग्रेशन प्रक्रियेची सुविधा देण्‍याचा मानस आहे.

बीएलएस इंटरनॅशनल सर्विसेस लि.चे संयुक्‍त व्‍यवस्‍थापकीय संचालक शिखर अग्रवाल म्‍हणाले की, आम्‍ही बीएलएस इंटरनॅशनलवर व्हिसा आऊटसोर्सिंग सहयोगी म्‍हणून विश्‍वास दाखवण्‍यासाठी स्‍लोवाकिया सरकारचे मन:पूर्वक आभार व्‍यक्‍त करतो. या सहयोगामधून सर्वोत्तमता आणि कार्यक्षम, विश्‍वसनीय व्हिसा सेवा प्रदान करण्‍यासाठी अविरत समर्पिततेप्रती आमची कटिबद्धता दिसून येते. मुलभूत शेंगेन तत्त्वांशी बांधील राहत आम्‍ही सर्वांसाठी व्हिसा अर्जप्रक्रिया अनुभव सुधारित करण्‍यास उत्‍सुक आहोत. त्याद्वारे नाविन्‍यता व ग्राहककेंद्रित सोल्‍यूशन्सच्‍या माध्‍यमातून नवीन उद्योग बेंचमार्क्‍स स्‍थापित करण्‍यात येत आहेत. स्‍लोवाकिया लक्षवेधक व संपन्‍न नवीन पर्यटनस्‍थळ म्‍हणून उदयास येत असताना, तसेच पर्यटन क्षेत्राच्‍या विकासाला मोठ्या प्रमाणात योगदान देत असताना आम्‍ही आमचे योगदान देण्‍यास उत्‍सुक आहोत.

उल्‍लेखनीय बाब म्‍हणजे ही उपलब्‍धी बीएसएल इंटरनॅशनलच्‍या शेंगेन देशांच्‍या पोर्टफोलिओमधील लक्षणीय भर आहे. कंपनीने शेंगेन सदस्‍य राज्‍ये जसे हंगेरी, पोर्तुगाल, पोलंड, स्‍पेन, जर्मनी व इटली यांच्‍यासोबत सहयोग केला असून व्हिसा व कॉन्‍स्युलर सेवांची व्‍यापक श्रेणी देत आहे. या उच्‍चभ्रू समूहामध्‍ये स्‍लोवाकियाचा समावेश सरकार व व्हिसा अर्जदारांसाठी विश्‍वसनीय सहयोगी म्‍हणून बीएलएस इंटरनॅशनलची उपस्थिती अधिक दृढ करतो.

Continue reading

मंगळवार-बुधवारी अंधेरी ते वांद्रे भागात विस्कळीत पाणीपुरवठा

मुंबई महापालिकेकडून जलवाहिनी अंशतः खंडित करण्याचे काम हाती घेण्यात येत असल्यामुळे मंगळवार, ११ ऑगस्‍टला सकाळी १० वाजल्यापासून बुधवार, १२ ऑगस्‍टला सकाळी १० वाजेपर्यंत के दक्षिण विभागात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असून एच पूर्व विभागाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. कमी दाबाने पाणी पुरवठा...

हुडकेश्वरमध्ये मुलीवर झालेल्या अत्याचाराची व्याप्ती वाढवा!

नागपूरमधील हुडकेश्वर पोलीसठाण्याच्या हद्दीत मुलीवर झालेल्या गंभीर अत्याचाराच्या प्रकरणाचा तपास केवळ एका आरोपीपुरता मर्यादित न ठेवता त्याची व्याप्ती वाढविण्यात यावी. आरोपीला प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष मदत करणारे, पीडितेवर दबाव किंवा दहशत निर्माण करणारे तसेच या प्रकरणामागे आणखी व्यक्ती अथवा एखादी...

रोहिणी हट्टंगडी यांना भारताबाहेरचा पहिला पुरस्कार!

महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने आयोजित तिसऱ्या नाफा मराठी चित्रपट महोत्सव २०२६ची सुरुवात हॉलिवूडच्या ग्लॅमरला साजेशा दिमाखदार रेड कार्पेट सोहळ्याने झाली. कॅमेऱ्यांच्या लखलखत्या फ्लॅशमध्ये मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज तारे-तारकांच्या शानदार आगमनाने सॅन होजेतील वातावरण मराठमोळ्या उत्साहाने भारून गेले. या सोहळ्यात हिंदी-मराठी चित्रपटसृष्टी...
Skip to content